मी गेली काही वर्षं एकच मोबाईल क्रमांक वापरत होते, या काळात माझ्या मोबाईलची मॉडेल्स बदलली गेली, मात्र माझ्या मोबाईलचा सर्व्हिस प्रोव्हायडर आणि मोबाईलचा क्रमांक हे दोन्ही न बदलता, होते तेच कायम राहिले. बाकीच्या लोकांचे मोबाईल क्रमांक आणि मोबाईल सर्व्हिस प्रोव्हायडर हे दोन्ही सारखे सारखे बदलत असतांना मी मात्र माझ्या आहे त्या मोबाईल क्रमांकावर आणि मोबाईल सर्व्हिसवर समाधान मानून त्यात कधी बदल करण्याचा विचार सुद्धा मनात आणला नव्हता. पण नुकतंच मोबाईलचं नवीन मॉडेल घेतल्यानंतर माझ्या लक्षात आलं, की काही तांत्रिक अडचणींमुळे मला माझ्या मोबाईलचा क्रमांकच बदलावा लागणार आहे. 'आता नवीन मोबाईल क्रमांक घ्यायचा, तर त्याबरोबरच सर्व्हिस प्रोव्हायडर का बदलू नये? तो आता बदललाच पाहिजे,' असा आग्रहही मला केला गेला. शेवटी जो अगदी सुलभपणे उपलब्ध झाला, तो नवीन मोबाईल क्रमांक मी दुसऱ्या एक सर्व्हिस प्रोव्हायडरकडून घेतला. त्यामुळे आता माझा मोबाईल क्रमांक कायमचा बदलला गेला आहे. माझा आधीचा क्रमांक आता वापरात राहणार नाही.
मी ज्यांच्याशी कायम संपर्कात असते ते आणि जे माझ्याशी संपर्क साधतात अशा बहुतेकांना मी माझा बदललेला मोबाईल क्रमांक कळवलेला आहे. पण त्याव्यतिरिक्त या ब्लॉगचे काही वाचक, काही ब्लॉगर आणि इतर काहीजण यांनाही मी माझा आधीचा मोबाईल क्रमांक दिलेला होता, त्यापैकी काहीजणांनी एखादा अपवाद वगळला, तर माझ्याशी मोबाईलवर कधीच संपर्क साधला नाही आणि मीही त्यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधला नाही, अशा सर्व लोकांनी कृपया नोंद घ्यावी, की माझा मोबाईल क्रमांक आता बदलला आहे आणि माझा आधीचा मोबाईल क्रमांक आता वापरात राहणार नाही, तरी माझा आधीचा मोबाईल तुमच्या यादीतून काढून टाकावा. आवश्यकता भासल्यास माझ्या सोशल वेबसाईटवर असलेल्या प्रोफाईलचा उपयोग करून तुम्हांला माझ्याशी संपर्क साधता येईल.
धन्यवाद!
No comments:
Post a Comment