चकलीची भाजणी
साहित्य -
- तांदूळ - २ कप (२५० मि.ली. आकाराचा मेजरिंग कप)
- चणाडाळ - १ कप
- बिनसालीची उडीदडाळ - १/२ कप
- बिनसालीची मूगडाळ - १/४ कप
- पोहे (पातळ किंवा जाड पोहे) - १ वाटी (१५० मि.ली. आकाराची वाटी)
- साबुदाणा - १/२ वाटी
- धणे - १/२ वाटी
- जिरे - १/४ वाटी
कृती -
- तांदूळ आणि डाळी हे सगळे स्वतंत्रपणे धुवून सावलीत वाळवून घ्यावेत. (पुरेसा वेळ नसेल, तर आम्ही हे साहित्य न धुता तसेच भाजणीसाठी वापरतो.)
- तांदूळ, डाळी, साबुदाणे आणि धणे, जिरे हे सगळे स्वतंत्रपणे मंद आचेवर भाजून घ्यावे. भाजतांना धान्य, साबुदाणे आणि डाळींचा रंग जरासा बदलतो. तांदूळ पांढरेशुभ्र होतात, साबुदाणा जरा पारदर्शक होतो, डाळींचा रंग जरा बदलून त्यातले काही दाणे लालसर होतात इतपतच हे साहित्य भाजावे. त्यापेक्षा जास्त भाजल्यास चकल्या जास्त तेल पितात.
- भाजल्यानंतर वरील सर्व साहित्य एकत्र करून ते चांगले गार होऊ द्यावे.
- गार झालेले हे चकलीच्या भाजणीचे साहित्य दळून घ्यावे आणि चकली करण्यासाठी वापरावे.
No comments:
Post a Comment