--000-- Important statement - Some of those who are calling themselves as my so-called friends on the basis of acquaintance which has happened in a short duration of past time, behaved with me in past in a manner which was crossing over the limits of friendship in that time, vexatious, objectionable even after the frequent admonitions given by me, so I do not consider them as my friends who crosses over the limits of friendship. So I am not duty-bound to publish or answer their comments which are given on any of my blogs, or to answer their email, or to accept their friend invite on any of the social website like facebook, or to answer their messages sent through the comment form on blog. So please take a kind note that if it will be found out that the abovementioned persons tried to contact with me directly or indirectly by any types of means mentioned before or through any other person by incuring him / her inbetween or by maknig fake profile through it or by any other means, through the blog or through any other medium or if it will be found out that they have done any type of act which is vexatious for me, then proper action will be taken on it. Also by all this incidence the decision is taken that the right of publishing all the suspicious seeming comments given on the blog and the right of answering any of the suspicious seeming messages coming through the comment form is reserved, readers please take a kind note of it. ----- 00000 ----- महत्त्वाचे निवेदन - भूतकाळातील थोडक्या कालावधीकरता झालेल्या माझ्या ओळखीच्या आधारावर स्वतःला माझे तथाकथित मित्र म्हणवून घेणार्‍या काही जणांनी पूर्वी मी वारंवार समज दिल्यानंतरही, माझ्याशी तत्कालीन पद्धतीच्या मैत्रीच्या मर्यादा ओलांडणारे, मनस्ताप देणारे, आक्षेपार्ह वर्तन केले, त्यामुळे अशा मैत्रीच्या मर्यादा ओलांडणार्‍यांना मी माझे मित्र मानत नाही. त्यामुळे माझ्या कोणत्याही ब्लॉगवर आलेल्या त्यांच्या कॉमेंट्स प्रकाशित करणे किंवा त्यांना उत्तर देणे, किंवा त्यांच्या इमेलला उत्तर देणे, किंवा त्यांच्या फेसबुकसारख्या कोणत्याही सोशल वेबसाईटवर आलेल्या फ्रेंड इन्व्हाईटला ऍक्सेप्ट करणे, किंवा त्यांनी ब्लॉगवरील कॉमेंट फॉर्मद्वारा पाठवलेल्या निरोपाला उत्तर देणे यासाठी मी बांधील नाही. त्यामुळे उपरोल्लेखित व्यक्तिंनी आधी उल्लेख केलेल्या कोणत्याही प्रकारे किंवा दुसर्‍या एखाद्या व्यक्तीला मध्ये घालून तिच्याद्वारे किंवा बनावट प्रोफाईल तयार करून त्याद्वारे किंवा इतर कोणत्याही प्रकारे, ब्लॉग किंवा इतर कोणत्याही माध्यमातून माझ्याशी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष प्रकारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याचे आढळल्यास किंवा मला मनस्ताप होईल अशा प्रकारचे कोणतेही कृत्य त्यांनी केल्याचे आढळल्यास, त्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी. तसेच या सर्व प्रकारामुळे ब्लॉगवर आलेल्या संशयास्पद वाटणार्‍या सर्व कॉमेंट्स प्रकाशित करण्याचे आणि कॉमेंट्स फॉर्मद्वारे आलेल्या संशयास्पद वाटणार्‍या कोणत्याही निरोपाला उत्तर देण्याचे अधिकार राखून ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी. --000--

Friday, November 13, 2015

प्रकाशित कथा - "लेखिकेच्या कळा" - अंक - 'आम्ही मराठी - दिपावली २०१३'

     'आम्ही मराठी' च्या २०१३ सालच्या दिवाळी अंकात माझी "लेखिकेच्या कळा" ही कथा प्रकाशित झाली होती. आता त्या अंकासाठी पाठवलेली माझी संपूर्ण कथा इथे ब्लॉगवर देत आहे.नोंद - ही कथा ब्लॉगवर टाकतांना अंकासाठी पाठवलेल्या पीडीएफ प्रतीतला कथेव्यतिरिक्त असलेला अनावश्यक मजकूर वगळून आणि फाँटमध्ये काही दुरुस्त्या करून, मग ही पीडीएफ प्रत तयार केली आहे.

महत्त्वाची नोंद - वाचकांना ह्या कथेची कॉपी - पेस्ट करण्याची परवानगी दिलेली नाही, मात्र कथा शेअर करता येईल, ही कथा शेअर करतांना तिच्या स्वरूपात कोणतेही बदल करण्याची परवानगी नाही, तसेच कथा शेअर करतांना लेखिकेला आणि अंकाला कथेचे श्रेय द्यायला विसरू नये, त्यासाठी कथेखाली लेखिकेचे नाव आणि अंकाचे नाव देऊन मगच कथा शेअर करावी, ह्याची कृपया नोंद घ्यावी.

Thursday, November 12, 2015

Rangoli made on the day of Laxmipujan in Diwali

     This year I have decided to make Rangoli by some different method. I felt it more easy to make Rangoli with materials like colours of Rangoli, one dish, circular lid of a bottle and an emptied refill of a pen as I do not have a regular practice of Rangoli making. Also Rangoli was made in very less time. I purposely made this Rangoli on plastic board so that it can be placed in any corner of the home. The yellow colour and blue colour in inner circle both got mixed in each other while making Rangoli from outer side to inner side, but I kept those mixed colour as it is and thus this Rangoli was ready with beautiful colour combination.


     I also made Rangoli in front of the home by that same method after completing the Rangoli in home. There I made a smaller Rangoli, as there is not enough space to make Rangoli in front of home.

  
     Rangoli made by this method looks very beautiful, when there are different colours available for Rangoli making.
  

दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी काढलेली रांगोळी

      मी यावर्षी दिवाळीत थोड्या वेगळ्या पद्धतीने रांगोळी काढायची ठरवली. रांगोळी काढायचा नियमित सराव नसल्याने रांगोळीचे रंग, एक ताटली, एका डबीचं गोलाकार झाकण आणि एक रिकामी झालेली पेनाची रिफील हे साहित्य घेऊन ही रांगोळी काढणं मला जास्त सोपं वाटलं. रांगोळीही झटपट काढून झाली. घरातल्या कोणत्याही कोपऱ्यात ठेवता यावी म्हणून मुद्दाम ही रांगोळी प्लॅस्टीकच्या बोर्डवर काढली. बाहेरून आतल्या बाजूला रांगोळी काढत असतांना आतल्या वर्तुळातला  पिवळा आणि निळा हे दोन्ही रंग एकमेकात मिसळले गेले, पण मी ते मिसळलेले रंग तसेच राहू दिले आणि ही सुंदर रंगसंगतीची रांगोळी तयार झाली.

  
     घरातली रांगोळी काढून झाल्यावर मी घरासमोरही त्याच पद्धतीने रांगोळी काढली. घरासमोर रांगोळी काढण्यासाठी पुरेशी जागा नसल्याने, तिथे लहानशी रांगोळी काढली.

  
     रांगोळीसाठी वेगवेगळे रंग उपलब्ध असतात, तेव्हा अशा पद्धतीने काढलेली रांगोळी फार छान दिसते.
       

Wednesday, November 11, 2015

Chirota in Sugar Syrup

Chirota in Sugar Syrup -

  
Ingredients -
For Dough of Chirota -
Maida (i.e. fine wheat flour) - 3 bowls (bowl of size 150 ml.)
salt - 1/4 teaspoon 
hot Ghee or hot oil - 3 tablespoon
water

For Sata (i.e. spreading paste) -
One and half teaspoon Ghee
corn flour - 3 teaspoon 

For Sugar Syrup -
Sugar completely filled in bowl having size of 250 ml.
250 ml. water
saffron or saffron syrup for taste (optional)
cardamom powder or cardamom syrup for taste (optional)

For frying -
Ghee or oil

Method -
 • Add salt and hot ghee / oil in Maida (i.e. fine wheat flour) and then by adding water to it knead it to a thick consistency dough. Keep that dough for at least an hour to soak well.
 • For making sata (i.e. spreading paste) add ghee and corn flour together and mix it well to make a paste.
 • For making sugar syrup add sugar into water and keep that vessel on flame for boiling to make syrup having two thread consistency (i.e. soft ball stage). (Later this syrup becomes thick after adding chirotas in it.) After turning off the flame add saffron and cardmom powder to it for flavor.
 • Then take well soaked dough of maida (i.e. fine wheat flour) and divide it into small balls having same size.
 • Then take one of the ball and roll it flat to make a thin roti, after that keep that roti in a dish and spread the sata (i.e. spreading paste) on it everywhere evenly.
 • Roll the second ball to make a thin roti. Then keep that second roti on the first roti in the dish on which sata (spreading paste) is applied already. Then apply sata (spreading paste) on second roti by spreading it everywhere evenly in the same manner.
 • Thus keep total five rotis on one another on each of which sata (spreading paste) is applied. Then apply sata (spreading paste) on the fifth roti by spreading it everywhere evenly in the same manner.
 • Then roll those five rotis together. While rolling it apply some sata (spreading paste) with each fold on the lower side of lowest roti on which sata was not applied before. Also close the end of of roll well applying spreading paste of sata.
 • Then cut that roll to make small pieces of it.
 • Then keep one piece on rolling board so that the spirals of rolls will come facing upper side and lower side on board and then flatten that piece with slight pressure of hands on flattening roller.
 • After flattening of the pieces is done, add ghee or oil in pan and keep the pan on low flame to heat it. After heating the ghee or oil well, put flattened pieces in it to fry the chirotas.
 • Fry the chirotas on low flame. While frying put the ghee /oil on chirota with the help of slotted spoon so that chirota fries properly spreading well. (When the flattened piece comes up after putting it in oil, at that time after slightly pressing it with slotted spoon for a minute so that it will not touch the bottom of pan but immerse completely in ghee / oil, the piece fries properly and the chirota spreads well.) While frying chirota turn the side of it and fry that side well after frying it's first side well. Thus fry the chirotas till it turn to slight pink colour.
 • Drain the ghee / oil from the fried chirota and put that hot chirota immediately in the sugar syrup, then immediately turn it's side with the help of slotted spoon in the sugar syrup, so that the sugar syrup enters in it well from all sides.
 • After putting the first chirota in sugar syrup, keep it in the syrup till the second chirota fries. Take out first chirota from syrup and keep it vertically in the sieve for draining of syrup, after putting the second fried chirota in sugar syrup. Thus fry all chirotas and put in the sugar syrup for some time and then take out of it, then keep them vertically in sieve for draining the syrup.
 • Serve the chirotas after cooling.
  
Note - Chirotas will be ready in short time, if there is one more person for help while making chirota.

पाकातले चिरोटे

पाकातले चिरोटे -

  
साहित्य - 
चिरोट्याच्या उंड्यासाठी -
३ वाट्या मैदा (१५० मि. ली. मापाची वाटी)
१/४ टीस्पून मीठ 
३ टेबलस्पून कडकडीत गरम केलेले साजूक तूप किंवा तेल 
पाणी 
   
साट्यासाठी -
दीड टीस्पून साजूक तूप
३ टीस्पून कॉर्न फ्लोअर 
  
पाक करण्यासाठी -
२५० मि. ली. मापाच्या भांड्यात मावेल एवढी साखर 
२५० मि. ली. पाणी 
स्वादासाठी केशर किंवा केशर सिरप (ऐच्छिक)
स्वादासाठी वेलचीपूड किंवा वेलची सिरप (ऐच्छिक)

तळण्यासाठी -
साजूक तूप किंवा तेल 

कृती -
 • मैद्यामध्ये चवीसाठी मीठ घालावे, कडकडीत गरम केलेले साजूक तूप किंवा तेल घालावे आणि पाणी घालून मैदा घट्ट भिजवावा. हा भिजवलेला मैद्याचा उंडा किमान तासभर चांगला मुरू द्यावा. 
 • साट्यासाठी साजूक तूप आणि कॉर्न फ्लोअर एकत्र करून चांगले फेटून घ्यावे.
 • पाकासाठी जेवढी साखर तेवढेच पाणी त्यात घालून भांडे आचेवर ठेवावे आणि दोन तारी पाक करावा. (हा पाक नंतर त्यात चिरोटे घातल्यावर घट्ट होत जातो.) आच बंद केल्यावर पाकात स्वादासाठी किंचित केशर आणि वेलचीपूड घालावी.
 • मग चांगला भिजलेला मैद्याचा उंडा घेऊन त्याचे सारख्या आकाराचे लहान लहान गोळे करून घ्यावे.
 • मग त्यातला एक गोळा घेऊन त्याची पातळ पोळी लाटून घ्यावी आणि ती एका ताटात ठेवून त्या पोळीवर साटा सगळीकडे लावून, एकसारखा पसरवून घ्यावा. 
 • दुसऱ्या गोळ्याचीही अशीच पातळ पोळी लाटून, ती आधी ताटात ठेवलेल्या पोळीवर ठेवावी आणि त्या दुसऱ्या पोळीलाही साटा सगळीकडे लावून, एकसारखा पसरवून घ्यावा.
 • अशाप्रकारे साटा लावलेल्या एकूण पाच पोळ्या एकावर एक ठेवाव्या आणि पाचव्या पोळीच्या वरच्या बाजूलाही साटा सगळीकडे लावून, एकसारखा पसरवून घ्यावा.
 • मग त्या पाच पोळ्यांची गुंडाळी करावी. गुंडाळी करतांना गुंडाळीच्या प्रत्येक घडीबरोबर पोळीच्या खालच्या साटा न लावलेल्या बाजूलाही थोडा साटा लावत जावा आणि गुंडाळीचं शेवटचं टोक साटा लावून नीट बंद करून घ्यावं.
 • मग त्या गुंडाळीचे सुरीने लहान लहान काप करून घ्यावे.
 • कापातल्या गुंडाळ्यांचा चक्राकार भाग खालच्या आणि वरच्या बाजूला येईल अशा प्रकारे तो काप पोळपाटावर ठेवावा आणि लाटण्याने हलक्या हाताने दाब देऊन तो काप लाटून घ्यावा. 
 • सगळे काप लाटून होत आले की मग कढईत साजूक तूप किंवा तेल घेऊन ते मंद आचेवर गरम होऊ द्यावं. तूप किंवा तेल नीट तापल्यावर त्यात लाटलेले काप सोडून चिरोटे तळून घ्यावे. 
 • चिरोटे मंद आचेवर तळून घ्यावे. तळतांना चिरोट्यावर झाऱ्याने तूप / तेल उडवावे म्हणजे चिरोटे नीट तळले जाऊन छान फुलतात. (काप तेलात सोडल्यावर तो जेव्हा वरती येतो, तेव्हा झाऱ्याने त्याला एखादं मिनिटभर अलगद दाबून त्याला कढईचा स्पर्श होणार नाही पण काप तुपाखाली / तेलाखाली संपूर्ण बुडेल असा राहू दिला तरी तो काप नीट तळला जाऊन चिरोटा चांगला फुलतो.) चिरोटा तळतांना त्याची एक बाजू नीट तळली गेली, की तो उलटवून दुसऱ्या बाजूनेही व्यवस्थित तळून घ्यावा. अशाप्रकारे किंचित गुलाबी रंगावर चिरोटे तळून घ्यावे.
 • तळलेल्या चिरोट्याचे तूप / तेल निथळवून घेऊन तो गरम चिरोटा लगेच साखरेच्या पाकात टाकावा आणि लगेच पाकातल्या झाऱ्याने त्याची बाजू उलटवून घ्यावी म्हणजे त्यात सगळीकडून व्यवस्थित पाक शिरतो.
 • पहिला चिरोटा पाकात टाकल्यावर दुसरा चिरोटा तळून होईपर्यंत पहिला चिरोटा पाकातच ठेवावा. दुसरा चिरोटा तळून पाकात टाकला, की पहिला चिरोटा पाकातून काढून चाळणीवर उभा निथळत ठेवावा. याप्रमाणे सगळे चिरोटे तळून, मग पाकातून काढून चाळणीत उभे करून, निथळू द्यावे. 
 • गार झालेले चिरोटे खायला द्यावे. 

टीप - चिरोटे करतांना मदतीला अजून एखादी व्यक्ती असेल, तर चिरोटे झटपट करून होतात.