भाग १, --- भाग २, --- भाग ३, --- भाग ४, --- भाग ५, --- भाग ६,
पुढे -
सकाळी जाग आली, तेव्हा हलणाऱ्या बोटीमुळे की काय, पण झोप पूर्ण झाल्यासारखी वाटत नव्हती. मला बोटीवरून सूर्योदय बघायचा होता, पण सगळं आवरण्याच्या गडबडीत सूर्योदय काही बघायला मिळाला नाही. त्यात गरम पाण्याची सोय नसल्याने, थंड पाण्यावरच भागवून आम्ही तयार होत होतो, तेवढ्यात बोट अचानक चालू झाली. बोट सकाळी आठ वाजता चालू व्हायच्या ऐवजी साडेसातच्या आधी चालू झाली, याचं नवल करत आम्ही घाईने आटोपून, आमचं सामान घेऊन बाहेर डेकवर आलो.
आमची बोट मोठ्या झपाट्याने साडेआठपर्यंत जेट्टीवर आलीसुद्धा आणि चक्क आमचा ड्रायव्हरही गाडी घेऊन तिथे हजर होता. आम्ही बोटीतून खाली उतरलो. समोर असलेलं मिनार डी लेकचं ऑफीस बंद दिसत होतं, आजूबाजूलाही सगळी सामसूम दिसत होती. बोटीवरच्या लोकांनी आमचं सामान आणून गाडीत चढवलं आणि आमचा निरोप घेतला. मग आमचा ड्रायव्हर हळूच म्हणाला, की आदल्या दिवशी बोटीवर ज्याने आमचं सामान चढवलं होतं, तो बोटीवरचा कुक आमच्या पाठीमागच्या बोटीत चढला होता आणि आम्ही जिथे उतरलो होतो, तिथेच त्याची बोट चालू होत असतांना तो पाण्यात पडून, बोटीच्या प्राॅपेलरमध्ये अडकून, गेला होता. त्यामुळे त्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी मिनार डी लेकचे सगळे व्यवहार बंद होते. आदल्या दिवशी आमची बोट चालू झाल्यावर काही मिनिटांतच ही दुर्दैवी घटना घडली होती. ती अनपेक्षित बातमी ऐकून आम्ही सुन्न झालो. बोटीवरच्या कर्मचाऱ्यांच्या विचित्र वागण्याचं कारण आता उलगडलं होतं. ती दुर्दैवी घटना घडली नसती, तर त्यांनी ठरल्याप्रमाणे साडेनऊ पर्यंत आम्हांला जेट्टीवर आणलं असतं.
त्या बातमीचा धक्का पचवत आम्ही गाडीत बसलो आणि कोवलमच्या दिशेने आमचा पुढचा प्रवास चालू झाला. वाटेत लागणाऱ्या कालव्यांवरून जाणाऱ्या पुलांपाशी पुष्कळशा ब्राह्मणी घारी भक्ष्यासाठी घिरट्या घालतांना दिसत होत्या. आता आम्हांला सततच्या प्रवासाने गाडीत नुसतं बसूनही पाठीला रग लागल्यासारखं होत होतं. त्यात त्या दिवशी आम्हांला तिथल्या उन्हाचा चटका जाणवत होता. गाडीत एसी चालू असतांनाही वातावरणातल्या उष्णतेमुळे एसीचा काहीच उपयोग होता नव्हता. एसी बंद करून गाडीच्या खिडक्या उघडून द्याव्यात म्हणजे तरी थोडी हवा येईल असं वाटत होतं. जसं ऊन वाढलं, तसं खिडकीतून आलेल्या उन्हाच्या कवडशाचाही त्वचेला चटका जाणवायला लागला. त्या उन्हामुळे गाडीतल्या एसीत जीव कोंदटल्यासारखं वाटून, अस्वस्थ होऊन आमच्यापैकी एका वयस्क व्यक्तीने टाॅयलेटची सोय असलेलं एखादं चांगलं हॉटेल पाहून तिथे गाडी थांबवायची ड्रायव्हरला सूचना केली.
दोनतीनदा गाडी हॉटेलपाशी थांबवण्याची सूचना केल्यावर मग अचानक ड्रायव्हरने एका पेट्रोल पंपापाशी गाडी थांबवली आणि ज्यांना टाॅयलेटला जायचं असेल, त्यांनी जाऊन यावं म्हणून त्याने सांगितलं. आता गाडी थांबवलीच आहे, म्हणून तिथे जाऊन पाहिलं, तर टाॅयलेटच्या पॅसेजमध्ये एका नळाचा पाईप फुटून त्याचं पाणी तुंबलं होतं. ड्रायव्हरला ते सांगितलं आणि त्याला आम्ही पुन्हा बजावलं, की त्या व्यक्तीला उन्हाचा त्रास होतोय आणि तिला अस्वस्थ वाटत असल्याने ज्यूस घेण्यासाठी म्हणून हॉटेलपाशी गाडी थांबवायची आहे. तरी ड्रायव्हरने त्याचा हेका चालवत शहरातली सगळी चांगली दिसणारी हॉटेल्स मागे टाकली आणि शहराबाहेरच्या एका हॉटेलच्या पुष्कळ पुढे नेऊन गाडी उभी केली. 'सकाळी विशिष्ट वेळेच्या आत त्या शहराबाहेर पडलो नसतो, तर मालवाहतूकीच्या ट्रॅफीकमध्ये आपण अडकलो असतो,' असं कारण त्याने लगेच पुढे केलं.
गाडीपासून त्या हॉटेलपर्यंतचं अंतर भर उन्हातून पार करत आम्ही त्या हॉटेलमध्ये पोहोचलो. त्या हॉटेलच्या मेनूकार्डावर ज्यूस होतं, पण त्यावेळी हॉटेलमध्ये ज्यूस मिळणार नव्हतं, तिथे फ्रुटी, स्लाईस अशी पेयंही नव्हती. फक्त हॉटेलच्या आत सावलीत बसल्याने ज्या व्यक्तीला बरं वाटत नव्हतं, तिला जरा बरं वाटलं होतं इतकंच! "आता हॉटेलमध्ये आलोच आहोत तर इथे एक मिरिंडाची बाटली विकत घ्यावी (पुढे प्रवासात उपयोगी पडेल या हेतूने) आणि शेजारीच असलेल्या ज्यूसच्या दुकानात जाऊन ज्यूस घ्यावं," असं मी इतरांना सुचवत होते, ते आमच्या ड्रायव्हरने ऐकलं. अचानक एकाएकी त्याची ट्यूब पेटल्यासारखा तो हॉटेलच्या मालकाला म्हणाला, की "या सगळ्यांना उन्हाचा त्रास होतोय, यांना शेजारच्या दुकानात जाण्याचा त्रास सोसवणारा नाही, म्हणून यांना ज्यूस आणून इथेच द्या." ते ऐकून मला हसावं की रडावं ते कळेना. भर उन्हातून पण मोकळ्या हवेतून लांबवर चालत आम्ही इथपर्यंत आलो होतो, आता चार पावलं तीही सावलीतलीच चालून शेजारच्या दुकानात जाणं काही त्या व्यक्तीला कठीण नव्हतं. जेव्हा गाडीतल्या एसीमुळे आणि बंदीस्त खिडक्यांमुळे त्या व्यक्तीचा जीव कोंदटल्यासारखा झाला होता, तेव्हा ही तत्परता दाखवून गाडी लगेच एखाद्या हॉटेलपाशी थांबवली असती, तर जास्त बरं झालं असतं. असो. ड्रायव्हरच्या सूचनेप्रमाणे हॉटेलच्या मालकाने तत्परता दाखवत लगेच शेजारच्या दुकानातून सगळ्यांसाठी ज्यूसची ऑर्डर दिली. अर्थात त्या तत्परतेचा त्याने बिलात जास्तीचा चार्जही लावला, ही गोष्ट वेगळी!
तिथून पुढे निघाल्यावर दुपारी दीडच्या सुमाराला आम्ही एका हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबलो. ते हॉटेल दिसायला चांगलं स्वच्छ, चकचकीत होतं, तिथे लोकांची गर्दीही होती, आम्ही त्या हॉटेलच्या पहिल्या मजल्यावर जेवायला गेलो. बरेचसे लोक तिथली थाळी घेतांना दिसत होते. थाळी मोठी होती, तीनचार भाज्या, जाड तांदुळाचा भात, साध्या तांदुळाचा भात, सांबार अशा भरगच्च मेनूने भरलेली दिसत होती. त्या दिवशी उन्हाच्या काहिलीमुळे आम्ही सगळेच हैराण झालो होतो, त्यामुळे काही जेवावसंही वाटत नव्हतं. आम्हांला कोणालाच एवढी भरगच्च थाळी घेण्याची इच्छा नसल्याने, आम्ही टोमॅटो सूप, मटार पनीरची भाजी आणि पोळ्या एवढंच मागवायचं ठरवलं. टोमॅटो सूप प्यायल्याने जरा तहान भागल्यासारखं वाटेल, असा विचार आम्ही केला होता. आमच्यासमोर टोमॅटो सूप आलं आणि ते पिऊन पाहिल्याबरोबर सगळ्यांना उचक्या लागायला लागल्या, टोमॅटो सूपमध्ये भरपूर मिरपूड घातली होती, त्यामुळे सगळ्यांची तोंडं भाजली होती. नंतर भाजी आणि पोळ्या आल्या, पोळ्या पापडासारख्या पातळ आणि जेमतेम शेकलेल्या होत्या, भाजीही मसालेदार असल्याने सणसणीत लागत होती. कशीबशी पुढ्यात आलेली एक पोळी खाऊन मी माझं जेवण संपवलं. बाकीच्यांच्या जेवणाचेही असेच हाल झाले होते. जेवण झाल्यावर निदान आईसक्रीम खाऊन पोळलेलं तोंड शांत करावं असा विचार करत आम्ही आईसक्रीम मागवलं, तर त्या हॉटेलमध्ये आईसक्रीम ठेवलं जात नव्हतं, असं कळलं.
हॉटेलमधून बाहेर पडून आम्ही तिथे जवळच असलेल्या एका जनरल स्टोअर्समध्ये गेलो, तिथे आईसक्रीम विकायला ठेवलेलं होतं. तिथल्या एका स्थानिक कंपनीचे आईसक्रीमचे कप विकत घेऊन आम्ही गाडीपाशी आलो. सगळ्यांचं आईसक्रीम खाऊन होत आल्यावर एका आईसक्रीमच्या कपाच्या तळाशी केस निघाला. मी आईसक्रीममध्ये केस निघालेला पहिल्यांदाच बघत होते. दुकानदाराकडे तक्रार केल्यानंतर त्याने अर्थातच, "आईसक्रीम खायच्या आधी केस निघाल्याचं सांगायला हवं होतं, आता आईसक्रीम खाऊन झाल्यावर तुमच्या तक्रारीचा काही उपयोग नाही." असं सांगत हात वर केले. आम्हांला पुढे प्रवास करायचा असल्याने, त्याच्याशी जास्त वाद न घालता आम्ही पुढे निघालो.
वाटेत एक टोलनाका लागला, त्या टोलनाक्यावर टोल वसूल करायला सगळ्या स्त्रिया बसल्या होत्या. असं दृश्य महाराष्ट्रात कधी दिसेल, याचा विचार करत आम्ही पुढे निघालो. महाराष्ट्रातल्या प्रगतीच्या गप्पा करणाऱ्या राजकारण्यांनी केरळमधल्या या गोष्टीची आवर्जून दखल घेतली पाहिजे, असं मला वाटून गेलं.
पुढे प्रवासात आम्हांला 'कोलाम'च्या नावाची पाटी दिसली, तेव्हा कोवलम जवळ आलं, असा आमचा गैरसमज झाला. पण लगेच ड्रायव्हरने 'कोलाम' आणि 'कोवलम' ही दोन वेगळी ठिकाणं आहेत, असं सांगत आमचा गैरसमज दूर केला. तोपर्यंत वातावरणातली उन्हाची काहिलीही जरा कमी झाली होती. अजून तासाभराचा प्रवास करून आम्ही कोवलममध्ये आलो.
कोवलममध्ये 'कासवुमालिका' नावाच्या दुकानासमोर गाडी थांबवत ड्रायव्हरने, "इथे तुम्हांला हव्या असतील, तर साड्या खरेदी करता येतील." अशी सूचना दिली. आम्ही गाडीतून उतरून दुकानात गेलो. तिथे साड्यांची खरेदी चालू असतांना, महाराष्ट्रातून आलेल्या प्रवाशांचा एक गट दिसला. त्यांच्यापैकी काहीजण त्र्यंबकेश्वरहून आले होते, त्यांच्याशी बोलतांना त्यांच्या आणि आमच्या काही कॉमन ओळखी निघाल्या, मग गप्पा चालू झाल्या. साड्यांची खरेदी झाल्यावर तिथल्या विक्रेतीने सांगितलं, की वरच्या मजल्यावर पुरूषांचे कपडे विकायला ठेवलेले आहेत. मग आम्ही वरच्या मजल्यावर गेलो, त्र्यंबकेश्वरचा ग्रुपही तिथे वरती आला होता. तिथे त्या सगळ्यांना शर्ट दाखवायला एकदोनच विक्रेत्या होत्या, त्या प्रत्येकाने पसंत केलेल्या खोक्यातला शर्ट काढून, त्याच्या टाचण्या, पिना काढून तो शर्ट ट्रायल करता देत होत्या, ट्रायल झाल्यावर पुन्हा त्या शर्टाची घडी घालून तो जसाच्या तसा खोक्यात ठेवत होत्या. आमच्यादेखत त्यांनी किमान पन्नासेक शर्ट उघडून, पुन्हा घडी घालून ठेवले. विक्रेत्या कमी असल्याने साहजिकच स्त्रियांच्या साडीखरेदीपेक्षा, पुरुषांच्या खरेदीला जास्त वेळ लागला. खरेदी झाल्यावर आम्ही गाडीत बसून आमच्या हॉटेलकडे निघालो.
'समुद्रतीरम' नावाचं आमचं हॉटेल समुद्रकिनाऱ्यासमोरच्या छोट्या टेकाडावर वसलं होतं. समुद्रकिनाऱ्याजवळच्या रस्त्यावरून जात आमची गाडी त्या छोट्या टेकाडाचा चढ चढायला लागली. हॉटेलच्या पोर्चमध्ये गाडी थांबली, आम्ही खाली उतरलो, हॉटेलच्या कर्मचाऱ्याने आमचं सामान उतरवून घेतलं आणि टेकाडाखालच्या मोकळ्या जागेत गाडी पार्क करण्यासाठी ड्रायव्हर निघून गेला. आम्ही रिसेप्शनवर जाऊन तिथले फॉर्म भरून दिले आणि त्या हॉटेलमध्ये सायबर कॅफेची सोय आहे का, याची चौकशी केली. आमच्या परतीच्या विमानासाठी आमचं वेब चेक इन करून आम्हांला आमच्या सीट्स आरक्षित करायच्या होत्या. पण त्या हॉटेलमध्ये सायबर कॅफेची सोय नव्हती. हॉटेलमध्ये वायफायची सोय होती आणि ते आम्हांला आवश्यक त्या कागदपत्रांची प्रिंटआऊट काढून द्यायला तयार होते. पण कोणाच्या मोबाइलवरून वेब चेक इन करायचं झालं, तर नियमाप्रमाणे आम्हांला अजून चोवीस तास थांबावं लागणार होतं.
आमचं बोलणं होत असतांनाच हॉटेलचा एक कर्मचारी आमच्यासाठी वेलकम ड्रिंक म्हणून काळ्या द्राक्षांचं ज्यूस घेऊन आला. ते ज्यूस चवीला थोडं आंबट असलं, तरी उन्हाच्या काहिलीने त्रस्त झालेल्या आम्हांला ज्यूस पिऊन बरं वाटलं होतं. आमच्या खोल्या दुसऱ्या मजल्यावर होत्या आणि हॉटेलला लिफ्ट नव्हती. जिना चढून आम्ही वरती गेलो. आमच्या खोल्यांसमोरच्या पॅसेजच्या खिडक्यांच्या काचांवर केरळमधल्या वेगवेगळ्या ठिकाणांचे आकर्षक फोटो लावलेले होते. आमच्या प्रत्येकाच्या खोल्या प्रशस्त होत्या. खोल्यांच्या एका बाजूला मोठ्या फ्रेंच विंडो पद्धतीच्या सरकणाऱ्या काचा लावलेल्या होत्या, त्या काचांपलिकडे गॅलरी होती. गॅलरीतून खालच्या पहिल्या मजल्यावर असलेला स्विमिंगपूल, हॉटेलची हद्द संपल्यावरचा पुढचा टेकाडाचा उतरणीचा परिसर, त्याच्यापुढचा समुद्रतीर, त्याच्यापुढे थेट क्षितिजापर्यंत पसरलेला अथांग निळा सागर हे सगळं दिसत होतं. ते दृश्य मनाला आल्हाद देत होतं. आम्ही तिथे आल्यानंतर थोड्याच वेळात आम्हांला तिथे खालच्या स्विमिंगपूलच्या जवळ येऊन बसलेल्या एका मोराने दर्शन दिलं.
जरा वेळ आम्ही आपापल्या खोल्यांमध्ये विसावलो. आमच्या प्रत्येकाच्या खोलीत बेड आणि इतर फर्निचरव्यतिरिक्त एक छोटा फ्रीज, टीव्ही, फोन आणि एसीची सोय होती. टाॅयलेट प्रशस्त होतं, त्यात चोवीस तास गरम पाण्याची सोय होती, नळांना भरपूर पाणी होतं आणि तिथे टाॅवेल, साबण, शांपू, माॅईश्चरायझर आणि शाॅवर कॅप्स असं सगळं ठेवलेलं होतं. थोडी विश्रांती झाल्यानंतर फ्रेश होऊन आमच्यापैकी काहीजण समुद्रकिनाऱ्यावर फिरायला निघाले, काहीजण हॉटेलवर थांबले. दुपारी नीट जेवण न झाल्याने आणि उन्हाच्या तडाख्यामुळे मला पित्त झालं होतं, त्यामुळे मी हॉटेलवरच थांबले. पित्तावर घरगुती औषधं घेऊन मी गॅलरीत बसून आसपासचा परिसर न्याहाळण्यात वेळ घालवला.
आमचा चहा आला तेव्हा त्या माणसाकडे आम्ही खोलीतला टीव्ही लागत नाही आणि एसीचा रिमोट चालत नाही म्हणून तक्रार केली. त्याने दुसरा माणूस पाठवला. त्या दुसऱ्या माणसाने आम्हांला तो टीव्ही व्हिडिओ मोडमध्ये नेऊन कसा चालू करायचा ते दाखवलं. एसीच्या रिमोट मधले सेल बहुधा बदलायला आल्याने, तो चालत नव्हता, मग त्या माणसाने, 'मी खाली जाऊन मुख्य ऑफिसमधून तुमचा एसी सेट करून देतो, तुम्ही मात्र रिमोटवरून एसीची सेटींग्ज बदलण्याचा प्रयत्न करू नका.' असं सांगत आमचा एसी सेट करून दिला.
थोड्या वेळाने नेहमीपेक्षा जरा लवकरच आम्ही जेवायला गेलो. आधी मी जेवायचं नाही असं ठरवलं होतं, पण त्या हॉटेलच्या वातावरणात थोडं बरं वाटल्याने, मी दहीभात खाऊ शकेन असं मला वाटलं. बाकीच्यांचं काय मागवावं हे निश्चित ठरत नव्हतं म्हणून आम्ही आधी फक्त दही आणि भाताचीच ऑर्डर दिली. ते ऐकून वेटर म्हणाला, की तुम्ही टोमॅटो सूप घ्या. त्याला आमचा दुपारचा अनुभव सांगितल्यावर तो म्हणाला, की त्यांच्या सूपमध्ये मिरपूड घातली जात नाही. मग आम्ही टोमॅटो सूप मागवलं आणि त्याच्या जोडीला गोड असतो म्हणून नवरतन कुर्मा आणि पोळ्या मागवल्या. मग परत त्या वेटरने आम्हांला पापड आणि सॅलड घेण्याचा आग्रह केला, म्हणून आम्ही तेही मागवलं. वास्तविक आमचे ह्या जेवणाचे पैसे बुकींगच्या वेळीच भरलेले असल्याने, आम्ही जितके कमी पदार्थ मागवले होते, तितका हॉटेलचा फायदाच होता, पण इथल्या वाढप्यांना बहुधा ग्राहकांचं पूर्ण समाधान कसं होईल, हे पाहण्याचं प्रशिक्षण दिलेलं दिसत होतं. हे 'सोपानम हेरिटेज' मध्ये आम्हांला आलेल्या अनुभवाच्या पूर्ण विपरीत होतं. असो.
वेटरने सांगितल्याप्रमाणे टोमॅटो सूप खरोखर सौम्य चवीचं होतं. इतरांबरोबर मीही टोमॅटो सूप घेतलं. मग थोडा दही भात खाल्ला आणि पित्तावर गोळी घेतली. तोपर्यंत बाकीचे मला सांगायला लागले, की तू इतरही पदार्थ खाऊन बघ. मी त्यांच्या आग्रहामुळे बाकीचेही थोडेथोडे पदार्थ खाऊन पाहिले, त्यांची चव खरोखर चांगली होती. मग मी अगदी पोटभर नाही, तरी बऱ्यापैकी कधी जेवले ते माझं मलाच कळलं नाही. आमचं जेवण झाल्यावर वेटरने पुन्हा आम्हांला सर्वांना आईसक्रीम हवं आहे का, म्हणून आवर्जून विचारलं आणि आम्हांला आईसक्रीम आणून दिलं.
जेवण झाल्यावर आम्ही सगळे वरती आलो. आमच्या सगळ्यांच्या बोलण्यात एक गोष्ट वारंवार येत होती, की 'या हॉटेलमध्ये आम्हांला विलक्षण प्रसन्न आणि शांत वाटत होतं.' त्यानंतर बाकीचे सगळे गप्पा मारत बसले होते, मला मात्र गोळीच्या प्रभावामुळे ताबडतोब एकदम शांत झोप लागली होती.

![]() |
ब्रेकफास्टची तयारी |
सकाळच्या कोवळ्या उन्हात बॅकवाॅटरचं दृश्य खूप आल्हाददायक दिसत होतं. आम्ही थोडावेळ बाहेरचं दृश्य बघण्यात रमलो नाही, तोच पावणेआठच्या सुमारास चहा आणि त्याच्याबरोबर ब्रेकफास्टही आला. ते पाहून मला अजूनच आश्चर्य वाटलं, कारण आदल्या दिवशी आम्हांला आमच्या ड्रायव्हरने सांगितलं होतं, की बोटीतून जेट्टीवर उतरल्यावर साडेनऊ वाजता तिथे आमचा ब्रेकफास्ट होईल. पण जास्त विचार न करता आम्ही चहा घ्यायला सुरूवात केली. ब्रेकफास्टसाठी आम्हांला जाड छोटे डोसे, चटणी आणि सांबार एवढं आणून दिलेलं होतं. सगळ्यांचे डोसे खाऊन होत आले असतांना चटणी संपली म्हणून वाढप्याला अजून चटणी आणायला सांगितल्यावर, त्याने "चटणी संपली. एवढीच चटणी केली होती." असं उत्तर दिलं आणि पुढे काही न बोलता तो निघून गेला. या सगळ्या गडबडीत आमच्या हाऊसबोटीच्या पॅकेजमध्ये समावेश असलेली अननस, पपई अशी फळं (जी मधल्या पॅसेजमध्ये बेसिनजवळ रचून ठेवली होती) आम्हांला दिली गेली नव्हती. ती जाणीवपूर्वक दिली गेली नव्हती, की त्या दिवसाच्या एकंदर गडबडीत दिली गेली नव्हती हे कळू शकलं नाही.
ब्रेकफास्ट झाल्यावर आम्ही पुन्हा बाहेर दिसणारं दृश्य बघायला लागलो. तेवढ्यात कर्मचाऱ्यांमधला जो मुख्य होता, त्याने आम्हांला आमचा फीडबॅक लिहिण्यासाठी एक फाॅर्म दिला. आमचा फीडबॅक लिहून झाल्यावर आम्ही तो फाॅर्म त्याला परत दिला आणि त्यात काय सूचना लिहिल्या आहेत, हे त्याला सांगायला लागलो. पण त्याचं आमच्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं, त्याने झटकन तो फाॅर्म खिशात ठेवून दिला आणि तो चालकाशी मल्याळी भाषेत काहीतरी बोलायला लागला. आदल्या दिवशीची त्याची वागणूक आणि आताची त्याची वागणूक यात कमालीचा फरक होता.
आमची बोट मोठ्या झपाट्याने साडेआठपर्यंत जेट्टीवर आलीसुद्धा आणि चक्क आमचा ड्रायव्हरही गाडी घेऊन तिथे हजर होता. आम्ही बोटीतून खाली उतरलो. समोर असलेलं मिनार डी लेकचं ऑफीस बंद दिसत होतं, आजूबाजूलाही सगळी सामसूम दिसत होती. बोटीवरच्या लोकांनी आमचं सामान आणून गाडीत चढवलं आणि आमचा निरोप घेतला. मग आमचा ड्रायव्हर हळूच म्हणाला, की आदल्या दिवशी बोटीवर ज्याने आमचं सामान चढवलं होतं, तो बोटीवरचा कुक आमच्या पाठीमागच्या बोटीत चढला होता आणि आम्ही जिथे उतरलो होतो, तिथेच त्याची बोट चालू होत असतांना तो पाण्यात पडून, बोटीच्या प्राॅपेलरमध्ये अडकून, गेला होता. त्यामुळे त्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी मिनार डी लेकचे सगळे व्यवहार बंद होते. आदल्या दिवशी आमची बोट चालू झाल्यावर काही मिनिटांतच ही दुर्दैवी घटना घडली होती. ती अनपेक्षित बातमी ऐकून आम्ही सुन्न झालो. बोटीवरच्या कर्मचाऱ्यांच्या विचित्र वागण्याचं कारण आता उलगडलं होतं. ती दुर्दैवी घटना घडली नसती, तर त्यांनी ठरल्याप्रमाणे साडेनऊ पर्यंत आम्हांला जेट्टीवर आणलं असतं.
त्या बातमीचा धक्का पचवत आम्ही गाडीत बसलो आणि कोवलमच्या दिशेने आमचा पुढचा प्रवास चालू झाला. वाटेत लागणाऱ्या कालव्यांवरून जाणाऱ्या पुलांपाशी पुष्कळशा ब्राह्मणी घारी भक्ष्यासाठी घिरट्या घालतांना दिसत होत्या. आता आम्हांला सततच्या प्रवासाने गाडीत नुसतं बसूनही पाठीला रग लागल्यासारखं होत होतं. त्यात त्या दिवशी आम्हांला तिथल्या उन्हाचा चटका जाणवत होता. गाडीत एसी चालू असतांनाही वातावरणातल्या उष्णतेमुळे एसीचा काहीच उपयोग होता नव्हता. एसी बंद करून गाडीच्या खिडक्या उघडून द्याव्यात म्हणजे तरी थोडी हवा येईल असं वाटत होतं. जसं ऊन वाढलं, तसं खिडकीतून आलेल्या उन्हाच्या कवडशाचाही त्वचेला चटका जाणवायला लागला. त्या उन्हामुळे गाडीतल्या एसीत जीव कोंदटल्यासारखं वाटून, अस्वस्थ होऊन आमच्यापैकी एका वयस्क व्यक्तीने टाॅयलेटची सोय असलेलं एखादं चांगलं हॉटेल पाहून तिथे गाडी थांबवायची ड्रायव्हरला सूचना केली.
दोनतीनदा गाडी हॉटेलपाशी थांबवण्याची सूचना केल्यावर मग अचानक ड्रायव्हरने एका पेट्रोल पंपापाशी गाडी थांबवली आणि ज्यांना टाॅयलेटला जायचं असेल, त्यांनी जाऊन यावं म्हणून त्याने सांगितलं. आता गाडी थांबवलीच आहे, म्हणून तिथे जाऊन पाहिलं, तर टाॅयलेटच्या पॅसेजमध्ये एका नळाचा पाईप फुटून त्याचं पाणी तुंबलं होतं. ड्रायव्हरला ते सांगितलं आणि त्याला आम्ही पुन्हा बजावलं, की त्या व्यक्तीला उन्हाचा त्रास होतोय आणि तिला अस्वस्थ वाटत असल्याने ज्यूस घेण्यासाठी म्हणून हॉटेलपाशी गाडी थांबवायची आहे. तरी ड्रायव्हरने त्याचा हेका चालवत शहरातली सगळी चांगली दिसणारी हॉटेल्स मागे टाकली आणि शहराबाहेरच्या एका हॉटेलच्या पुष्कळ पुढे नेऊन गाडी उभी केली. 'सकाळी विशिष्ट वेळेच्या आत त्या शहराबाहेर पडलो नसतो, तर मालवाहतूकीच्या ट्रॅफीकमध्ये आपण अडकलो असतो,' असं कारण त्याने लगेच पुढे केलं.
गाडीपासून त्या हॉटेलपर्यंतचं अंतर भर उन्हातून पार करत आम्ही त्या हॉटेलमध्ये पोहोचलो. त्या हॉटेलच्या मेनूकार्डावर ज्यूस होतं, पण त्यावेळी हॉटेलमध्ये ज्यूस मिळणार नव्हतं, तिथे फ्रुटी, स्लाईस अशी पेयंही नव्हती. फक्त हॉटेलच्या आत सावलीत बसल्याने ज्या व्यक्तीला बरं वाटत नव्हतं, तिला जरा बरं वाटलं होतं इतकंच! "आता हॉटेलमध्ये आलोच आहोत तर इथे एक मिरिंडाची बाटली विकत घ्यावी (पुढे प्रवासात उपयोगी पडेल या हेतूने) आणि शेजारीच असलेल्या ज्यूसच्या दुकानात जाऊन ज्यूस घ्यावं," असं मी इतरांना सुचवत होते, ते आमच्या ड्रायव्हरने ऐकलं. अचानक एकाएकी त्याची ट्यूब पेटल्यासारखा तो हॉटेलच्या मालकाला म्हणाला, की "या सगळ्यांना उन्हाचा त्रास होतोय, यांना शेजारच्या दुकानात जाण्याचा त्रास सोसवणारा नाही, म्हणून यांना ज्यूस आणून इथेच द्या." ते ऐकून मला हसावं की रडावं ते कळेना. भर उन्हातून पण मोकळ्या हवेतून लांबवर चालत आम्ही इथपर्यंत आलो होतो, आता चार पावलं तीही सावलीतलीच चालून शेजारच्या दुकानात जाणं काही त्या व्यक्तीला कठीण नव्हतं. जेव्हा गाडीतल्या एसीमुळे आणि बंदीस्त खिडक्यांमुळे त्या व्यक्तीचा जीव कोंदटल्यासारखा झाला होता, तेव्हा ही तत्परता दाखवून गाडी लगेच एखाद्या हॉटेलपाशी थांबवली असती, तर जास्त बरं झालं असतं. असो. ड्रायव्हरच्या सूचनेप्रमाणे हॉटेलच्या मालकाने तत्परता दाखवत लगेच शेजारच्या दुकानातून सगळ्यांसाठी ज्यूसची ऑर्डर दिली. अर्थात त्या तत्परतेचा त्याने बिलात जास्तीचा चार्जही लावला, ही गोष्ट वेगळी!
तिथून पुढे निघाल्यावर दुपारी दीडच्या सुमाराला आम्ही एका हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबलो. ते हॉटेल दिसायला चांगलं स्वच्छ, चकचकीत होतं, तिथे लोकांची गर्दीही होती, आम्ही त्या हॉटेलच्या पहिल्या मजल्यावर जेवायला गेलो. बरेचसे लोक तिथली थाळी घेतांना दिसत होते. थाळी मोठी होती, तीनचार भाज्या, जाड तांदुळाचा भात, साध्या तांदुळाचा भात, सांबार अशा भरगच्च मेनूने भरलेली दिसत होती. त्या दिवशी उन्हाच्या काहिलीमुळे आम्ही सगळेच हैराण झालो होतो, त्यामुळे काही जेवावसंही वाटत नव्हतं. आम्हांला कोणालाच एवढी भरगच्च थाळी घेण्याची इच्छा नसल्याने, आम्ही टोमॅटो सूप, मटार पनीरची भाजी आणि पोळ्या एवढंच मागवायचं ठरवलं. टोमॅटो सूप प्यायल्याने जरा तहान भागल्यासारखं वाटेल, असा विचार आम्ही केला होता. आमच्यासमोर टोमॅटो सूप आलं आणि ते पिऊन पाहिल्याबरोबर सगळ्यांना उचक्या लागायला लागल्या, टोमॅटो सूपमध्ये भरपूर मिरपूड घातली होती, त्यामुळे सगळ्यांची तोंडं भाजली होती. नंतर भाजी आणि पोळ्या आल्या, पोळ्या पापडासारख्या पातळ आणि जेमतेम शेकलेल्या होत्या, भाजीही मसालेदार असल्याने सणसणीत लागत होती. कशीबशी पुढ्यात आलेली एक पोळी खाऊन मी माझं जेवण संपवलं. बाकीच्यांच्या जेवणाचेही असेच हाल झाले होते. जेवण झाल्यावर निदान आईसक्रीम खाऊन पोळलेलं तोंड शांत करावं असा विचार करत आम्ही आईसक्रीम मागवलं, तर त्या हॉटेलमध्ये आईसक्रीम ठेवलं जात नव्हतं, असं कळलं.
हॉटेलमधून बाहेर पडून आम्ही तिथे जवळच असलेल्या एका जनरल स्टोअर्समध्ये गेलो, तिथे आईसक्रीम विकायला ठेवलेलं होतं. तिथल्या एका स्थानिक कंपनीचे आईसक्रीमचे कप विकत घेऊन आम्ही गाडीपाशी आलो. सगळ्यांचं आईसक्रीम खाऊन होत आल्यावर एका आईसक्रीमच्या कपाच्या तळाशी केस निघाला. मी आईसक्रीममध्ये केस निघालेला पहिल्यांदाच बघत होते. दुकानदाराकडे तक्रार केल्यानंतर त्याने अर्थातच, "आईसक्रीम खायच्या आधी केस निघाल्याचं सांगायला हवं होतं, आता आईसक्रीम खाऊन झाल्यावर तुमच्या तक्रारीचा काही उपयोग नाही." असं सांगत हात वर केले. आम्हांला पुढे प्रवास करायचा असल्याने, त्याच्याशी जास्त वाद न घालता आम्ही पुढे निघालो.
वाटेत एक टोलनाका लागला, त्या टोलनाक्यावर टोल वसूल करायला सगळ्या स्त्रिया बसल्या होत्या. असं दृश्य महाराष्ट्रात कधी दिसेल, याचा विचार करत आम्ही पुढे निघालो. महाराष्ट्रातल्या प्रगतीच्या गप्पा करणाऱ्या राजकारण्यांनी केरळमधल्या या गोष्टीची आवर्जून दखल घेतली पाहिजे, असं मला वाटून गेलं.
पुढे प्रवासात आम्हांला 'कोलाम'च्या नावाची पाटी दिसली, तेव्हा कोवलम जवळ आलं, असा आमचा गैरसमज झाला. पण लगेच ड्रायव्हरने 'कोलाम' आणि 'कोवलम' ही दोन वेगळी ठिकाणं आहेत, असं सांगत आमचा गैरसमज दूर केला. तोपर्यंत वातावरणातली उन्हाची काहिलीही जरा कमी झाली होती. अजून तासाभराचा प्रवास करून आम्ही कोवलममध्ये आलो.
कोवलममध्ये 'कासवुमालिका' नावाच्या दुकानासमोर गाडी थांबवत ड्रायव्हरने, "इथे तुम्हांला हव्या असतील, तर साड्या खरेदी करता येतील." अशी सूचना दिली. आम्ही गाडीतून उतरून दुकानात गेलो. तिथे साड्यांची खरेदी चालू असतांना, महाराष्ट्रातून आलेल्या प्रवाशांचा एक गट दिसला. त्यांच्यापैकी काहीजण त्र्यंबकेश्वरहून आले होते, त्यांच्याशी बोलतांना त्यांच्या आणि आमच्या काही कॉमन ओळखी निघाल्या, मग गप्पा चालू झाल्या. साड्यांची खरेदी झाल्यावर तिथल्या विक्रेतीने सांगितलं, की वरच्या मजल्यावर पुरूषांचे कपडे विकायला ठेवलेले आहेत. मग आम्ही वरच्या मजल्यावर गेलो, त्र्यंबकेश्वरचा ग्रुपही तिथे वरती आला होता. तिथे त्या सगळ्यांना शर्ट दाखवायला एकदोनच विक्रेत्या होत्या, त्या प्रत्येकाने पसंत केलेल्या खोक्यातला शर्ट काढून, त्याच्या टाचण्या, पिना काढून तो शर्ट ट्रायल करता देत होत्या, ट्रायल झाल्यावर पुन्हा त्या शर्टाची घडी घालून तो जसाच्या तसा खोक्यात ठेवत होत्या. आमच्यादेखत त्यांनी किमान पन्नासेक शर्ट उघडून, पुन्हा घडी घालून ठेवले. विक्रेत्या कमी असल्याने साहजिकच स्त्रियांच्या साडीखरेदीपेक्षा, पुरुषांच्या खरेदीला जास्त वेळ लागला. खरेदी झाल्यावर आम्ही गाडीत बसून आमच्या हॉटेलकडे निघालो.
'समुद्रतीरम' नावाचं आमचं हॉटेल समुद्रकिनाऱ्यासमोरच्या छोट्या टेकाडावर वसलं होतं. समुद्रकिनाऱ्याजवळच्या रस्त्यावरून जात आमची गाडी त्या छोट्या टेकाडाचा चढ चढायला लागली. हॉटेलच्या पोर्चमध्ये गाडी थांबली, आम्ही खाली उतरलो, हॉटेलच्या कर्मचाऱ्याने आमचं सामान उतरवून घेतलं आणि टेकाडाखालच्या मोकळ्या जागेत गाडी पार्क करण्यासाठी ड्रायव्हर निघून गेला. आम्ही रिसेप्शनवर जाऊन तिथले फॉर्म भरून दिले आणि त्या हॉटेलमध्ये सायबर कॅफेची सोय आहे का, याची चौकशी केली. आमच्या परतीच्या विमानासाठी आमचं वेब चेक इन करून आम्हांला आमच्या सीट्स आरक्षित करायच्या होत्या. पण त्या हॉटेलमध्ये सायबर कॅफेची सोय नव्हती. हॉटेलमध्ये वायफायची सोय होती आणि ते आम्हांला आवश्यक त्या कागदपत्रांची प्रिंटआऊट काढून द्यायला तयार होते. पण कोणाच्या मोबाइलवरून वेब चेक इन करायचं झालं, तर नियमाप्रमाणे आम्हांला अजून चोवीस तास थांबावं लागणार होतं.
आमचं बोलणं होत असतांनाच हॉटेलचा एक कर्मचारी आमच्यासाठी वेलकम ड्रिंक म्हणून काळ्या द्राक्षांचं ज्यूस घेऊन आला. ते ज्यूस चवीला थोडं आंबट असलं, तरी उन्हाच्या काहिलीने त्रस्त झालेल्या आम्हांला ज्यूस पिऊन बरं वाटलं होतं. आमच्या खोल्या दुसऱ्या मजल्यावर होत्या आणि हॉटेलला लिफ्ट नव्हती. जिना चढून आम्ही वरती गेलो. आमच्या खोल्यांसमोरच्या पॅसेजच्या खिडक्यांच्या काचांवर केरळमधल्या वेगवेगळ्या ठिकाणांचे आकर्षक फोटो लावलेले होते. आमच्या प्रत्येकाच्या खोल्या प्रशस्त होत्या. खोल्यांच्या एका बाजूला मोठ्या फ्रेंच विंडो पद्धतीच्या सरकणाऱ्या काचा लावलेल्या होत्या, त्या काचांपलिकडे गॅलरी होती. गॅलरीतून खालच्या पहिल्या मजल्यावर असलेला स्विमिंगपूल, हॉटेलची हद्द संपल्यावरचा पुढचा टेकाडाचा उतरणीचा परिसर, त्याच्यापुढचा समुद्रतीर, त्याच्यापुढे थेट क्षितिजापर्यंत पसरलेला अथांग निळा सागर हे सगळं दिसत होतं. ते दृश्य मनाला आल्हाद देत होतं. आम्ही तिथे आल्यानंतर थोड्याच वेळात आम्हांला तिथे खालच्या स्विमिंगपूलच्या जवळ येऊन बसलेल्या एका मोराने दर्शन दिलं.
जरा वेळ आम्ही आपापल्या खोल्यांमध्ये विसावलो. आमच्या प्रत्येकाच्या खोलीत बेड आणि इतर फर्निचरव्यतिरिक्त एक छोटा फ्रीज, टीव्ही, फोन आणि एसीची सोय होती. टाॅयलेट प्रशस्त होतं, त्यात चोवीस तास गरम पाण्याची सोय होती, नळांना भरपूर पाणी होतं आणि तिथे टाॅवेल, साबण, शांपू, माॅईश्चरायझर आणि शाॅवर कॅप्स असं सगळं ठेवलेलं होतं. थोडी विश्रांती झाल्यानंतर फ्रेश होऊन आमच्यापैकी काहीजण समुद्रकिनाऱ्यावर फिरायला निघाले, काहीजण हॉटेलवर थांबले. दुपारी नीट जेवण न झाल्याने आणि उन्हाच्या तडाख्यामुळे मला पित्त झालं होतं, त्यामुळे मी हॉटेलवरच थांबले. पित्तावर घरगुती औषधं घेऊन मी गॅलरीत बसून आसपासचा परिसर न्याहाळण्यात वेळ घालवला.
![]() |
सूर्यास्ताच्या वेळी समुद्रकिनाऱ्यावर जमलेली गर्दी |
![]() |
कोवलमचा स्वच्छ समुद्रकिनारा, निळाशार समुद्र आणि आकाशातली रंगांची उधळण - सारं कसं अगदी नेत्रसुखद आणि प्रसन्न वाटत होतं! |
अंधार पडायला लागल्यावर फिरायला गेलेले परत आले आणि आम्ही सगळ्यांनी एका खोलीत एकत्र बसून आमच्यासाठी चहा मागवला. जे बाहेर फिरायला गेले होते, त्यांनी तिथल्या एका दुकानदाराकडून डाळीचे वडे विकत घेऊन खाल्ले होते. त्यांना वडे आवडल्याने, त्यांनी आमच्यासाठीही ते वडे आणले होते. मला पित्त झाल्याने, मी ते वडे खावेत की न खावेत ह्याचा विचार करत होते, पण शेवटी वडे खावेत या विचाराने उचल खाल्ली आणि मी ते वडे खाल्ले. वड्यांची चव खरंच खूप छान होती. मला बाहेर फिरायला गेलेल्यांकडून एक बातमी कळली होती, वड्याच्या दुकानापासून जवळच आमच्या जाण्यायेण्याच्या रस्त्यावर एक सायबर कॅफे होता.
आमचा चहा आला तेव्हा त्या माणसाकडे आम्ही खोलीतला टीव्ही लागत नाही आणि एसीचा रिमोट चालत नाही म्हणून तक्रार केली. त्याने दुसरा माणूस पाठवला. त्या दुसऱ्या माणसाने आम्हांला तो टीव्ही व्हिडिओ मोडमध्ये नेऊन कसा चालू करायचा ते दाखवलं. एसीच्या रिमोट मधले सेल बहुधा बदलायला आल्याने, तो चालत नव्हता, मग त्या माणसाने, 'मी खाली जाऊन मुख्य ऑफिसमधून तुमचा एसी सेट करून देतो, तुम्ही मात्र रिमोटवरून एसीची सेटींग्ज बदलण्याचा प्रयत्न करू नका.' असं सांगत आमचा एसी सेट करून दिला.
थोड्या वेळाने नेहमीपेक्षा जरा लवकरच आम्ही जेवायला गेलो. आधी मी जेवायचं नाही असं ठरवलं होतं, पण त्या हॉटेलच्या वातावरणात थोडं बरं वाटल्याने, मी दहीभात खाऊ शकेन असं मला वाटलं. बाकीच्यांचं काय मागवावं हे निश्चित ठरत नव्हतं म्हणून आम्ही आधी फक्त दही आणि भाताचीच ऑर्डर दिली. ते ऐकून वेटर म्हणाला, की तुम्ही टोमॅटो सूप घ्या. त्याला आमचा दुपारचा अनुभव सांगितल्यावर तो म्हणाला, की त्यांच्या सूपमध्ये मिरपूड घातली जात नाही. मग आम्ही टोमॅटो सूप मागवलं आणि त्याच्या जोडीला गोड असतो म्हणून नवरतन कुर्मा आणि पोळ्या मागवल्या. मग परत त्या वेटरने आम्हांला पापड आणि सॅलड घेण्याचा आग्रह केला, म्हणून आम्ही तेही मागवलं. वास्तविक आमचे ह्या जेवणाचे पैसे बुकींगच्या वेळीच भरलेले असल्याने, आम्ही जितके कमी पदार्थ मागवले होते, तितका हॉटेलचा फायदाच होता, पण इथल्या वाढप्यांना बहुधा ग्राहकांचं पूर्ण समाधान कसं होईल, हे पाहण्याचं प्रशिक्षण दिलेलं दिसत होतं. हे 'सोपानम हेरिटेज' मध्ये आम्हांला आलेल्या अनुभवाच्या पूर्ण विपरीत होतं. असो.
वेटरने सांगितल्याप्रमाणे टोमॅटो सूप खरोखर सौम्य चवीचं होतं. इतरांबरोबर मीही टोमॅटो सूप घेतलं. मग थोडा दही भात खाल्ला आणि पित्तावर गोळी घेतली. तोपर्यंत बाकीचे मला सांगायला लागले, की तू इतरही पदार्थ खाऊन बघ. मी त्यांच्या आग्रहामुळे बाकीचेही थोडेथोडे पदार्थ खाऊन पाहिले, त्यांची चव खरोखर चांगली होती. मग मी अगदी पोटभर नाही, तरी बऱ्यापैकी कधी जेवले ते माझं मलाच कळलं नाही. आमचं जेवण झाल्यावर वेटरने पुन्हा आम्हांला सर्वांना आईसक्रीम हवं आहे का, म्हणून आवर्जून विचारलं आणि आम्हांला आईसक्रीम आणून दिलं.
जेवण झाल्यावर आम्ही सगळे वरती आलो. आमच्या सगळ्यांच्या बोलण्यात एक गोष्ट वारंवार येत होती, की 'या हॉटेलमध्ये आम्हांला विलक्षण प्रसन्न आणि शांत वाटत होतं.' त्यानंतर बाकीचे सगळे गप्पा मारत बसले होते, मला मात्र गोळीच्या प्रभावामुळे ताबडतोब एकदम शांत झोप लागली होती.
ReplyDeleteCongratulations! Your blog post was selected for Tangy Tuesday Picks edition on September 29, 2015 at BlogAdda.
Please find it here: http://blog.blogadda.com/2015/09/29/tangy-tuesday-picks-september-29-2015
Thank you Team BlogAdda for selecting my post!
Delete