--000-- Important statement - Some of those who are calling themselves as my so-called friends on the basis of acquaintance which has happened in a short duration of past time, behaved with me in past in a manner which was crossing over the limits of friendship in that time, vexatious, objectionable even after the frequent admonitions given by me, so I do not consider them as my friends who crosses over the limits of friendship. So I am not duty-bound to publish or answer their comments which are given on any of my blogs, or to answer their email, or to accept their friend invite on any of the social website like facebook, or to answer their messages sent through the comment form on blog. So please take a kind note that if it will be found out that the abovementioned persons tried to contact with me directly or indirectly by any types of means mentioned before or through any other person by incuring him / her inbetween or by maknig fake profile through it or by any other means, through the blog or through any other medium or if it will be found out that they have done any type of act which is vexatious for me, then proper action will be taken on it. Also by all this incidence the decision is taken that the right of publishing all the suspicious seeming comments given on the blog and the right of answering any of the suspicious seeming messages coming through the comment form is reserved, readers please take a kind note of it. ----- 00000 ----- महत्त्वाचे निवेदन - भूतकाळातील थोडक्या कालावधीकरता झालेल्या माझ्या ओळखीच्या आधारावर स्वतःला माझे तथाकथित मित्र म्हणवून घेणार्‍या काही जणांनी पूर्वी मी वारंवार समज दिल्यानंतरही, माझ्याशी तत्कालीन पद्धतीच्या मैत्रीच्या मर्यादा ओलांडणारे, मनस्ताप देणारे, आक्षेपार्ह वर्तन केले, त्यामुळे अशा मैत्रीच्या मर्यादा ओलांडणार्‍यांना मी माझे मित्र मानत नाही. त्यामुळे माझ्या कोणत्याही ब्लॉगवर आलेल्या त्यांच्या कॉमेंट्स प्रकाशित करणे किंवा त्यांना उत्तर देणे, किंवा त्यांच्या इमेलला उत्तर देणे, किंवा त्यांच्या फेसबुकसारख्या कोणत्याही सोशल वेबसाईटवर आलेल्या फ्रेंड इन्व्हाईटला ऍक्सेप्ट करणे, किंवा त्यांनी ब्लॉगवरील कॉमेंट फॉर्मद्वारा पाठवलेल्या निरोपाला उत्तर देणे यासाठी मी बांधील नाही. त्यामुळे उपरोल्लेखित व्यक्तिंनी आधी उल्लेख केलेल्या कोणत्याही प्रकारे किंवा दुसर्‍या एखाद्या व्यक्तीला मध्ये घालून तिच्याद्वारे किंवा बनावट प्रोफाईल तयार करून त्याद्वारे किंवा इतर कोणत्याही प्रकारे, ब्लॉग किंवा इतर कोणत्याही माध्यमातून माझ्याशी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष प्रकारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याचे आढळल्यास किंवा मला मनस्ताप होईल अशा प्रकारचे कोणतेही कृत्य त्यांनी केल्याचे आढळल्यास, त्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी. तसेच या सर्व प्रकारामुळे ब्लॉगवर आलेल्या संशयास्पद वाटणार्‍या सर्व कॉमेंट्स प्रकाशित करण्याचे आणि कॉमेंट्स फॉर्मद्वारे आलेल्या संशयास्पद वाटणार्‍या कोणत्याही निरोपाला उत्तर देण्याचे अधिकार राखून ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी. --000--

Sunday, September 13, 2015

केरळ ट्रीप - काही अनुभव - भाग ६ - अलेप्पी - हाऊसबोटीतला अनुभव

पुढे -

     दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही लवकर आटोपून तयार झालो होतो, पण साडेसात वाजून गेले होते, तरी आम्हांला कबूल केल्याप्रमाणे चहा मिळाला नव्हता. रिसेप्शनवर कोणी नव्हतं. त्यात मी आदल्या दिवशी दुसऱ्या खोलीत चार्ज करण्यासाठी दिलेले कॅॅमेऱ्याचे सेल चार्ज झाले नव्हते, त्या सेलच्या चार्जरचा इंडिकेटर दिवाच लागत नव्हता. माझ्या खोलीतल्या प्लगला तो चार्जर जोडल्यावरही त्याचा दिवा लागत नव्हता, मात्र त्या प्लगवर मोबाईल चार्ज होत होते, त्यामुळे बहुधा सेलचा चार्जर बिघडला असावा, असा निष्कर्ष काढून मी तो चार्जर आणि कॅॅमेरा सामानात पॅक करून ठेवून दिला. (त्यामुळे या प्रवास वर्णनातल्या काही भागात आमच्या ग्रुपमधल्या बाकीच्या लोकांनी काढलेले फोटो मला वापरावे लागले; ते फोटो माझ्या कॉपीराईटसह वापरण्याची परवानगी त्यांनी दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानते.)  

     पावणेआठ वाजून गेल्यावर आम्हांला चहा मिळाला आणि मग पाठोपाठ ब्रेड, बटर, जाम देण्यात आलं. आम्ही झटपट चहा घेऊन आणि ब्रेड खाऊन निघालो, तरी चेक आऊट करून, आमचं सामान गाडीत भरून तिथून निघेपर्यंत साडेआठ झाले होते. आदल्या रात्री जी कार खाली आली होती, तिच्या ड्रायव्हरने ती कार वर नेण्याचा प्रयत्न केला होता, पण त्या तीव्र चढावर ती कार वरती चढेना, त्यामुळे रस्त्यात ती कशीबशी एका बाजूला लावून ठेवलेली होती. ती कार कशी वरती नेली जाणार होती कोणास ठाऊक? असो. आमची जीप वरती चढत असतांना त्यातलं सामान खालच्या बाजूला आमच्या दिशेने घसरून येत होतं, एकीकडे ते सामान सांभाळायचं आणि दुसरीकडे जीपच्या पाठच्या उघड्या दरवाजातून आपण स्वतः पडू नये म्हणून जीपमधल्या हँडलला गच्च धरून ठेवायचं अशी आमची कसरत चालली होती. शेवटी एकदाचे आम्ही मुख्य रस्त्यावरच्या आमच्या गाडीपाशी पोहोचलो आणि ग्लेनमोअर हॉटेलचा मुक्काम संपला एकदाचा म्हणून हुश्श केलं.

     हॉटेलच्या जीपमधलं आमचं सामान आमच्या गाडीत टाकून आम्ही गाडीत बसलो आणि अलेप्पीच्या दिशेने आमचा प्रवास सुरू केला. अलेप्पीला जातांना आम्ही मुन्नारला ज्या मार्गाने आलो, त्याच मार्गाने परत जाणार होतो. आता गाडीतला एसी पुन्हा चालू झाला होता. परत जातांना वाटेत आम्हांला येतांना जो धबधबा लागला होता, तो दिसला. ड्रायव्हर आता तिथे गाडी थांबवेल आणि आम्हांला गाडीतून उतरून फोटो काढू देईल असं आम्हांला वाटलं. पण उशीर झाला आहे अशी सबब पुढे करत ड्रायव्हरने फक्त गाडीतूनच फोटो काढू दिले आणि आम्ही एखाददुसरा फोटो काढतोय न काढतोय तोपर्यंत त्याने लगेच गाडी चालू केलीही. खरंतर आम्हांला तासभर उशीर झालेलाच होता, त्यात अजून पाचसात मिनिटांचा उशीर झाल्याने विशेष फरक पडणार नव्हता, पण ड्रायव्हरला मात्र तसं वाटत नव्हतं.

ड्रायव्हरने गाडी न थांबवल्यामुळे अखेर आम्हांला आधी मुन्नारला जातांना काढलेल्या धबधब्याच्या अर्धवट फोटोवरच समाधान मानावं लागलं.
   
     मुन्नारहून निघतांना आमचा ब्रेकफास्ट नीट न झाल्याने अलेप्पीला जाण्यापूर्वी वाटेत कुठेतरी ब्रेकफास्टसाठी गाडी थांबवण्याची आम्ही ड्रायव्हरला सूचना केली, ती मात्र त्याने ऐकली. वाटेत एका हॉटेलपाशी त्याने गाडी थांबवली. हॉटेलमध्ये फार वेळ घालवायचा नाही, म्हणून आम्ही वडा सांबारची ऑर्डर दिली, तर तिथल्या मुलाने आमच्यासमोर थंडगार मेदूवडे आणि चटणी आणून ठेवली. त्यांच्या हॉटेलमध्ये वड्याबरोबर सांबार देण्याची पद्धत नव्हती, हे पाहून आश्चर्य वाटलं. मेदूवडे खाऊन आम्ही अलेप्पीच्या दिशेने निघालो.

     अलेप्पी जवळ आल्यावर तिथली काही घरं अगदी कालव्यालगत असलेली दिसली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती घरं तुलनेने खालच्या पातळीवर होती आणि भिंतीचा बांध घातलेल्या कालव्यातली पाण्याची पातळी मात्र त्याच्यापेक्षा जास्त होती. ते दृश्य पाहून 'पावसाळ्यात कालव्यातलं पाणी भिंत ओलांडून ह्या घरात शिरत असेल का?' असा प्रश्न मनात उभा राहिला. तिथून पुढे जातांना ड्रायव्हरने मुख्य कालव्याचा रस्ता सोडून अरूंद गल्लीबोळांमधून गाडी न्यायला सुरूवात केली आणि शेवटी एकावेळी जेमतेम एकच गाडी जाऊ शकेल अशा रस्त्याने आमची गाडी 'मिनार डी लेक' नावाच्या बोट टूर एजन्सीच्या ऑफिससमोर येऊन थांबली. ऑफिससमोरच मिनार डी लेकची प्रायव्हेट जेट्टी होती. तिथे काही हाऊसबोटी पाण्यात उभ्या होत्या. एव्हाना साडेअकरा वाजले होते.

     मिनार डी लेकच्या लहानशा ऑफीसमध्ये सगळ्यांनी उगीचच गर्दी करायला कशाला जायचं या विचाराने मी ऑफीसच्या बाहेरच थांबले होते. तिथे समोरून एक बाई येतांना दिसल्या, त्या मिनार डी लेकच्या मालकीणबाई आहेत म्हणून ड्रायव्हरने आमची ओळख करून दिली. मालकीणबाईंचा वेष अतिशय साधा होता, त्यांच्याकडे पाहून 'ह्या इथल्या एजन्सीत काम करणाऱ्या कोणी महिला कर्मचारी असाव्यात,' असाच कोणाचाही समज झाला असता. त्या इतक्या मोठ्या एजन्सीच्या मालक आहेत याचा डामडौल त्यांच्या वागणुकीत दिसून येत नव्हता, पण त्यांच्याशी बोलतांना त्यांच्या बोलण्यातला अधिकार मात्र जाणवत होता. माझ्याशी बोलून मालकीणबाई ऑफीसमध्ये गेल्या, आमच्या ग्रुपच्या कागदपत्रांची पूर्तता झाल्यावर त्या स्वतः आम्हांला आमच्या हाऊसबोटीत सोडण्यासाठी आल्या.

जेट्टीवर पाहिलेली पहिली हाऊसबोट
  
जेट्टीवरून दिसणारं दृश्य
    
     एव्हाना आमची हाऊसबोट तिथे येऊन धक्क्यापाशी उभी राहिली होती. आम्ही एकेक करून हाऊसबोटीत चढलो. 'हाऊसबोटीतल्या सगळ्या खोल्या बघून घ्या,' असं म्हणत  मालकीणबाईंनी स्वतः मला बोटीतल्या सगळ्या खोल्या दाखवल्या. ऑफीसमध्ये आमच्या ग्रुपचं नेमकं काय बोलणं झालंय, हे मला माहिती नसल्याने, मी वरचेवर नजर टाकून खोल्या पाहिल्या आणि सगळं ठीक आहे म्हणून माझी पसंती दर्शवली. मग मालकीणबाईंनी डेकवर येत आम्हांला 'ही बोट तुमच्या घरासारखीच समजा आणि चपलाबूट डेकवर एका ठिकाणी ठेवा,' अशी सूचना देत आमचा निरोप घेतला. एव्हाना बोटीवरच्या कर्मचाऱ्यांनी आमचं सामान बोटीवर चढवलं होतं आणि पावणेबाराच्या सुमारास बोट चालू केली होती.

आमची हाऊसबोट चालू झाली आणि आजूबाजूला असा नजारा दिसायला लागला.
   
     आम्ही आमचं सामान आपापल्या खोल्यांमध्ये ठेवलं. आमच्या खोल्यांमध्ये डबलबेड, सामान ठेवण्यासाठी एका कोपऱ्यात एक लाकडी कपाट, एक छोटं टेबल, आरसा आणि बेडपाशी दोन्ही भिंतींजवळच्या कोपऱ्यात ठोकलेली एकेक फळी असं मर्यादीत फर्निचर होतं. त्याशिवाय प्रत्येक खोलीत एसी होता, पंखाही होता, डासांचा त्रास होऊ नये म्हणून आॅलआऊट ठेवलेलं होतं आणि खोलीला अॅटॅॅच असलेलं छोटं टाॅयलेट होतं. टाॅयलेटमध्ये शॉवर होता, पण गरम पाण्याची सोय नव्हती. खोल्या पाहतांना सुरूवातीला लक्षात आलं नव्हतं, पण प्रत्येक खोलीतलं बेडवर ठेवलेलं ब्लँकेट आकाराने अगदीच लहान होतं आणि फक्त एकाच खोलीत एकच साबण देण्यात आला होता. आमच्या सगळ्यांकडे प्रवासात गरज पडली तर म्हणून छोटे साबण जवळ ठेवलेले असल्याने आमची अडचण झाली नाही. आमच्या खोल्यांबाहेर असलेल्या पॅसेजमध्ये एक कॉमन बेसिन होतं, तिथे मात्र लिक्विड हँडवॉशची मोठी बाटली ठेवलेली होती. पॅसेजच्या एका बाजूला हाऊसबोटीतलं किचन होतं आणि दुसऱ्या बाजूला आम्हांला बसण्यासाठी डेक होता. डेकवर मध्ये डायनिंग टेबल होतं, डेकच्या कडेला बसण्यासाठी कुशन लावलेल्या सीट्स होत्या. रात्री सिनेमा बघायचा असल्यास व्हिडीओची सोय होती. आम्ही सामान आत ठेवून डेकवर आलो आणि बाहेर दिसणारं दृश्य बघायला लागलो.

     आमची बोट जसजशी कालव्यातल्या त्या पाण्यातून पुढे सरकायला लागली, तशा कालव्यातल्या बाकीच्या हाऊसबोटीही दिसायला लागल्या. प्रत्येक हाऊसबोटीला नारळाच्या झावळ्यांपासून बनवलेल्या चटयांनी निरनिराळ्या पद्धतीने शाकारून वेगवेगळं स्वरूप दिलेलं होतं. अशा पद्धतीने सजवलेली प्रत्येक हाऊसबोट बघण्याजोगी होती. बहुतेक हाऊसबोटींमध्ये दोन, तीन किंवा चार बेडरूमची सोय दिसत होती. काही हाऊसबोटी दुमजली होत्या, त्यातल्या काहींचा वरचा अर्धा डेक ओपन होता.

आमच्या हाऊसबोटीशी स्पर्धा करणारी ही हाऊसबोट!
  
     बोटींच्या डेकवर बसलेले प्रवासी समोरच्या बोटीतल्या लोकांना हात हलवून प्रतिसाद देत होते, काहीजण बोटींचे फोटो काढत होते. आमच्या हाऊसबोटीतही काहीजण उत्साहाने फोटो काढत होते. मी मात्र माझ्या कॅॅमेऱ्यात सेल नाहीत, म्हणून शांत बसले होते, कितीतरी चांगले शॉट्स मी गमावले होते. आता आम्ही हळूहळू बॅकवाॅटरच्या मुख्य प्रवाहाच्या दिशेने चाललो होतो. बॅकवाॅटरच्या काठावर नारळांच्या झाडांच्या बनात, हिरवाईने नटलेल्या जमिनीवर उभी असलेली हॉटेल्स आणि घरं दिसत होती. हिरव्या पार्श्वभूमीवर बॅकवाॅटरच्या पाण्यात चालणाऱ्या हाऊसबोटींचं दृश्य मनाला सुखावत होतं. आम्ही ते बघण्यात गुंग असतांना बोटीवरच्या कर्मचाऱ्यांपैकी एकाने आम्हांला वेलकम ड्रिंक म्हणून एक शीतपेय आणून दिलं. शीतपेयाचा आस्वाद घेऊन आम्ही पुन्हा आजूबाजूचं दृश्य पाहण्यात मग्न झालो.

    
  

     दुपारी पावणेदोनच्या सुमारास बोटीच्या चालकाने आमची बोट एका ठिकाणी काठापाशी थांबवली आणि तिथल्या झाडाला बोटीवरची दोरी गुंडाळून ठेवली. आमचं जेवण व्हायचं होतं, त्यासाठी बहुधा बोट थांबवली होती. आमचं जेवण येईपर्यंत आम्ही बोटीच्या डेकवर लावलेल्या सर्व सूचना काळजीपूर्वक वाचून काढल्या. त्या सूचनांनुसार 'आमची बोट सकाळी साडेदहा ते संध्याकाळी साडेपाच या वेळातच चालू राहणार होती, त्यानंतर संध्याकाळी मासेमारीचे ट्राॅलर्स चालत असल्याने आमची बोट एका ठिकाणी थांबवून ठेवण्यात येणार होती. सकाळी आठ वाजता जेट्टीकडे परतण्यासाठी बोट पुन्हा चालू होणार होती.' तिथे अजून एक महत्त्वाची सूचना लिहिलेली होती, ती म्हणजे 'बोटीवरचं पाणी, वीज इत्यादी साधनं मर्यादीत असल्याने आवश्यकता असेल, तेव्हाच त्यांचा वापर करावा. नळ नीट बंद करावेत. खोलीत कोणी नसतांना उगीचच त्या खोलीतले लाईट, पंखे चालू ठेवू नयेत.' त्याशिवाय तिथे 'लाईफ जॅकेटचा वापर कसा करावा' याचं सचित्र प्रात्यक्षिकही लावलेलं होतं.

जेवणासाठी बोटीने थांबा घेतला, तेव्हा आभाळ असं भरून आलं होतं.
             
     त्या सूचना वाचून होईपर्यंत आमच्या जेवणाची मांडामांड चालू झाली होती. जेवणासाठी काचेच्या डीश, काचेचे बाऊल वापरलेले होते. दाल, भात, फ्रेंचबीन्सची भाजी, कोबीची भाजी, पोळी, पापड, सॅलड, दही असे सगळे पदार्थ आणून वाढले गेले. आम्ही आधी हाऊसबोटीवरच्या जेवणाबद्दल तक्रारी ऐकल्या होत्या, पण आम्हांला वाढलेलं जेवण समाधानकारक होतं. आम्ही जेवत असतांनाच आकाशात एक वीज चमकलेली दिसली आणि पाठोपाठ हलकासा पाऊस पडायला सुरूवात झाली. पावसाचा जोर वाढायला लागला, तसं बोटीवरच्या कर्मचाऱ्यांनी डेकभोवती गुंडाळलेले जाड कापडाचे पडदे खाली सोडले. पण पावसाचा जोर वाढला होता, जोरात विजा कडकडायला लागल्या होत्या. आमची बोट तशी मोकळ्या आभाळाखाली असल्याने एखादी वीज बोटीवर कोसळली तर काय या विचाराने आमच्या जीवाचं पाणीपाणी होत होतं. बॅकवाॅटरचं पाणी किती खोल आहे, हेही आम्हांला माहिती नव्हतं. विजांच्या भीतीने सगळ्यांनी आपापले मोबाईल फोन बंद करून ठेवले होते. मध्येच कुठेतरी वीज कोसळल्यासारखा आवाज आला. काहीशा धास्तीत आम्ही आमची जेवणं उरकली, पण पाऊस अजून थांबला नव्हता.

     आमची जेवणं झाली, तरी बोटीवरच्या कर्मचाऱ्यांची जेवणं अजून व्हायची होती. त्यांची जेवणं होईपर्यंत विजा चमकणं कमी झालं. आमची बोट चालू झाल्यावर पाऊसही हळूहळू निवळला. आमची बोट आता एखाद्या सरोवरासारख्या भासणाऱ्या बॅकवाॅटरच्या प्रवाहात आली होती, तिथे अधूनमधून दिसणाऱ्या जलपर्णीच्या झुडुपांमुळेच ते बॅकवाॅटर आहे, हे कळत होतं, नाहीतर तो प्रवाह समुद्राचा आहे, असाच आभास होत होता. माझ्याकडे फोटो काढायला कॅमेरा नसल्याने नुसतं बसून आजूबाजूचं दृश्य पाहण्यापेक्षा त्याच्यासोबत आयपाॅडवर गाणी ऐकावीत या विचाराने मी पर्समध्ये आयपाॅड शोधायला लागले, पण आयपाॅड सापडेना. 'तो चुकून कोणाच्या तरी बॅगेत ठेवला गेला असेल,' अशी माझी समजूत काढत बाकीच्यांनी 'बोट थांबल्यावर आयपाॅड शोधू' असं सांगत मला स्वस्थ बसण्याचा सल्ला दिला. मी काहीशा अस्वस्थ मनस्थितीतच स्वस्थ बसले.

बोट चालू झाल्यावरही काहीवेळ असा हलका पाऊस पडतच होता!
    
अफाट समुद्रासारख्या भासणाऱ्या बॅकवाॅटरमधली ही छोटीशी होडी
     
     म्हांला पाण्यात मध्येच काही सीगलसारखे पक्षी दिसत होते. आमच्या त्या प्रवासात आम्हांला प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या काही बोटी दिसल्या, तिथल्या बसवाहतुकीपेक्षाही त्या प्रवासी बोटींचं तिकीट स्वस्त होतं. तिथून पुढे शेतीची बेटं असलेल्या नयनरम्य भागात आमची बोट गेली आणि त्या बेटांच्या जवळून प्रवास करत बोटीने मार्ग बदलला. आता बोट पुन्हा काठावरच्या वस्तीजवळून जात होती. संध्याकाळी साडेचारच्या सुमाराला आम्हांला चहा आणि तांदुळाच्या पिठात तळलेली कांद्याची भजी दिली गेली. चहा देणाऱ्या कर्मचाऱ्याने आम्हांला वाचण्यासाठी एक पत्रक डायनिंग टेबलवर ठेवलं, संध्याकाळी कोणाला मसाज करून घ्यायचा असेल, तर त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या मसाजचे दर त्या पत्रकावर दिलेले होते. मसाजसाठी छोट्या बोटीतून दुसरीकडे नेलं जातं, असं समजलं, पण आम्हांला कोणाला त्यात रस नसल्याने आम्ही त्यासाठी नकार दिला.

    
     
      
प्रवासी वाहतूक करणारी बोट
    
     आमची बोट काठावरच्या वस्तीजवळून जात असल्याने पुन्हा आम्हांला काठावरची नारळाची झाडं, हिरवीगार बनं, त्यात लपलेली घरं दिसायला लागली होती. मध्येच वरच्या बाजूने गेलेल्या लांबलचक तारा दिसत होत्या, त्या तारांवर बसलेले खंड्या पक्षी पाण्यात सूर मारून मासे पकडत आपलं दर्शन देत होते. पावणेसहा वाजेपर्यंत बोट चालकाने आमची बोट काठाजवळ आणून एका ठिकाणी उभी केली. तिथे आजूबाजूला इतरही बऱ्याच बोटी उभ्या केलेल्या दिसत होत्या, तो बोटींचा नेहमीचा थांबा असावा. काठावर आमच्या बोटींपासून जेमतेम चारपाच फूट अंतरावर काही घरं होती, ती बोटीच्या पॅसेजमधून दिसत होती. त्या घरांपासून अगदी जवळ बोट उभी केल्यामुळे आम्हांला काही प्रायव्हसी उरली नाही, असंच वाटत होतं.

     बोट थांबल्यावर आम्ही आपापल्या खोल्यांमध्ये जाऊन आयपाॅड शोधायला लागलो. सगळ्यांच्या बॅगा पूर्ण उचकून पाहूनही आयपाॅड काही कुठे सापडला नाही. सगळं सामान मात्र पुन्हा नव्याने पॅक करावं लागलं. नीट खात्री करून घ्यावी म्हणून मी हॉटेलमध्येही फोन करून पाहिले, पण सगळी फोनाफोनी झाल्यावर तिथूनही नकारच मिळाला. आता हे निश्चित झालं होतं, की आदल्या दिवशी मला एखादी छोटी वस्तू खाली पडल्याचा जो आवाज आला होता, तो आवाज माझ्या आयपाॅडचाच होता, पण तेव्हा शोधूनही मला काय पडलं आहे, ते नेमकं कुठे पडलं आहे हे कळलं नव्हतं. आता कळून काही उपयोग नव्हता. नाही म्हंटलं, तरी मला आयपाॅड हरवल्याची हळहळ वाटलीच. मला तशी गाणी ऐकायची फारशी आवड नसल्याने मी तो आयपाॅड जास्त वापरलाही नव्हता. या ट्रीपमध्येही तो दोनतीनदाच वापरला गेला होता. (आता मात्र तो आयपाॅड हरवला हे एका अर्थी बरंच झालं, असं वाटतंय.)

     सगळं सामान लावून झाल्यावर जरावेळ आम्ही शांतपणे नुसतेच खोलीत बसलो होतो. असं नुसतंच बसून राहण्याचा आम्हांला कंटाळा आला होता. खरंतर हाऊसबोटीत रात्री मुक्काम करायच्या ऐवजी दिवसभर बोटीतून फिरून संध्याकाळी एखाद्या हॉटेलमध्ये मुक्काम केला असता, तर आजूबाजूला फिरता तरी आलं असतं आणि मला तेच जास्त सोयीस्कर वाटत होतं. आता नुसतंच बसून राहण्याऐवजी व्हिडिओवर एखादा सिनेमा बघावा असा विचार करून मी बोटीच्या चालकाला त्याबद्दल विचारलं. तो म्हणाला, की "तुम्हांला सिनेमा बघायचा असेल, तर बघा, पण त्यामुळे बोटीवर डास येतील." मला त्याच्या बोलण्यातलं गांभीर्य कळलं नाही, त्यामुळे मी त्याला सिनेमा लावून द्यायला सांगितलं आणि सगळ्यांना सिनेमा बघण्यासाठी बोलवून आणलं. त्यासाठी आम्ही आमच्या खोल्यांची दारं लावून आलो होतो.

     त्या माणसाने आधी डेकवरचे सगळे पडदे खाली ओढले आणि शक्य तितका डेक झाकून घेतला, तरी चालकाच्या बाजूचा डेकचा भाग उघडाच होता. मग आम्ही तिथे असलेल्या सिनेमांच्या सीडीज पाहिल्या. बहुतेक सगळ्या सीडीज मल्याळी सिनेमांच्या होत्या. एका सीडीवर 'हिंदी मूव्ही' इतकंच लिहिलेलं दिसलं, पण सिनेमाचं नाव लिहिलेलं नव्हतं. ती सीडी लावण्याआधी आम्ही आमच्याकडच्या यूएसबीवरचा सिनेमा त्या व्हिडिओ प्लेयरवर लागतोय का, ते पाहिलं, पण त्या फाॅरमॅॅटमधला सिनेमा तिथल्या व्हिडिओ प्लेयरवर लागत नव्हता. त्यामुळे नाईलाजाने हिंदी मूव्ही असा उल्लेख केलेली सीडी आम्हांला लावावी लागली. अक्षय कुमार, जॉनी लिव्हर, श्रेयस तळपदे इत्यादी नटांनी काम केलेला तो तथाकथित विनोदी सिनेमा इतका वाईट होता, की दुसरा काही पर्याय नाही म्हणून नाइलाजाने आम्ही त्या सिनेमाने आमची करमणूक करून घेत होतो.

     सिनेमा चालू झाल्यावर थोड्याच वेळात टीव्ही स्क्रीनच्या प्रकाशाने आकर्षित होऊन अनेक छोटे छोटे डास बोटीवर यायला लागले. डास येणार याचा अंदाज असल्याने आणि हवेत गारवा असल्याने आम्ही सगळेजण आधीच व्यवस्थित स्वेटर घालून, शाली घेऊन बसलो होतो, त्यामुळे आम्हांला डास चावले नाहीत, पण कानाभोवती सतत डासांची गुणगुण जाणवत होती. थोड्या वेळाने असंख्य डासांनी आमच्यासमोरचं डायनिंग टेबल भरून गेलं, वरच्या दिव्यावरही डासांचा थवा बसलेला दिसत होता. तिकडे किचनमध्ये रात्रीच्या जेवणाची तयारी चालू होती. थोड्याच वेळात त्यांचा माणूस जेवण घेऊन येतो, म्हणून सांगायला आला. इकडे डायनिंग टेबल तर सगळं डासांनी भरून गेलेलं होतं, ते अतिशय किळसवाणं वाटत होतं. मग आम्ही एका खोलीतलं आॅलऊट आणून तिथे असलेल्या एका रिकाम्या प्लगमध्ये लावलं. काही मिनिटांत बरेचसे डास पळून गेले.

     डास कमी झाले आणि वाढपी जेवण घेऊन आला. रात्रीच्या जेवणात फक्त दाल, भात, दोन भाज्या आणि पोळी यांचाच समावेश होता. आॅलऊट लावल्यानंतरही जे चिवट डास पळून गेले नव्हते, ते डास आता जेवणाभोवती फिरायला लागले होते. जेवतांना ताटात डास येऊ नये याची काळजी घेत आम्ही पटापट जेवण आटोपलं.

     जेवण झाल्यावर थोडा वेळ आम्ही सिनेमा पाहिला असेल, तेवढ्यात अचानक लाईट गेले. रात्रीच्या वेळचा हा वीजप्रवाह बहुधा काठावरून घेतलेला असावा, कारण आसपासच्या सगळ्याच बोटींवरचे लाईट गेले होते. आमच्या बोटीवर लगेच जनरेटरचा विद्युतपुरवठा सुरू झाला. आमच्यापैकी काहीजणांना अजूनही राहिलेला सिनेमा बघायचा होता, पण एकतर पावसाळी वातावरण, त्यामुळे किती वेळ लाईट बंद राहतील याचा अंदाज नाही, म्हणून उगीच जनरेटरची वीज वाया न घालवता आपापल्या खोल्यांमध्ये जाऊन (नेहमीपेक्षा लवकरच) झोपायचा निर्णय आम्ही घेतला.

     आमच्या खोल्यांमधले एसी बोटीवरच्या कर्मचाऱ्यांकडून ऑपरेट होत होते. ते एसी कमी टेंपरेचर आणि जास्त ब्लास्टवर सेट केलेले होते. खरंतर हवेत गारवा असल्याने खोलीतले एसी लावले नसते तरी चाललं असतं, पण ते आमच्या हातात नव्हतं. त्यात रात्री केव्हाही लाईट जातील, तेव्हा जनरेटरवर चालणारे पंखे चालू असू द्यावे, म्हणून खोलीतले पंखेही लावले होते. त्या गारव्यात खोलीतलं लहान आकाराचं ब्लँकेट अगदीच अपुरं वाटत होतं आणि आम्हांला आमचे स्वेटर, शाल याचा वापर करावा लागला होता. मध्येच आलेल्या पाण्याच्या एखाद्या लाटेमुळे बोट हेलकावत होती.

No comments:

Post a Comment