१० नोव्हेंबर २०१४ ते १७ नोव्हेंबर २०१४ या कालावधीत आम्ही काही मोजके लोक केरळला जाणार होतो. या ट्रीपची आखणी ट्रॅव्हल एजन्सी चालवणाऱ्या आमच्या एका मैत्रिणीने केली होती. खरंतर मला दुसऱ्याच ठिकाणी ट्रीपला जायचं होतं, पण ती ठिकाणं रद्द करून आमच्या मैत्रिणीने ही केरळ ट्रीप आखून दिली होती. ट्रीपला येणाऱ्या काही जणांची वयं आणि प्रकृती याचा विचार करून, 'प्रवासात फारशी ठिकाणं पहायला मिळाली नाहीत तरी चालेल, पण प्रवास आरामशीर व्हायला हवा,' असं आम्ही ठरवलं होतं. त्यामुळे आमच्या मैत्रिणीने, काही मोजकीच ठिकाणं ट्रीपसाठी निवडली होती.
प्रवासाशी संबंधित असलेल्या एका वेबसाईटतर्फे मला एक डिस्काऊंट व्हाऊचर मिळालं होतं, त्याचा वापर करून या ट्रीपसाठी मुंबईहून कोचीला जाणाऱ्या आणि त्रिवेंद्रमहून मुंबईत येणाऱ्या विमानाच्या तिकिटांचं बुकींग मी केलं होतं. तसंच मुन्नारमधल्या एका हॉटेलचं बुकिंगही मीच केलं होतं. या हॉटेलच्या पॅकेजमध्ये फक्त सकाळच्या ब्रेकफास्टचा समावेश होता.
इतर सर्व ठिकाणचं बुकींग आमच्या मैत्रिणीने केलं होतं. तिने बुक केलेल्या हॉटेलच्या पॅकेजमध्ये रात्रीच्या जेवणाचा आणि सकाळच्या ब्रेकफास्टचा समावेश होता. त्याशिवाय तिने केरळच्या पूर्ण प्रवासात फिरण्यासाठी 'कोको केरला' या ट्रॅव्हल कंपनीची एक गाडी आमच्यासाठी बुक केलेली होती. त्या गाडीचा ड्रायव्हर आम्हांला नेण्यासाठी कोचीच्या विमानतळावर येणार होता.
या प्रवासासाठी आम्हांला आमच्या मैत्रिणीने काही सूचना केल्या होत्या, 'मंदिरात जातांना लुंगी किंवा धोतर नेसून वरती उपरणं घेतल्याशिवाय पुरुषांना मंदिरात प्रवेश मिळणार नाही. तसंच स्त्रियांनाही साडी किंवा मुंडू परिधान केल्याशिवाय मंदिरात प्रवेश मिळणार नाही. मंदिरात मोबाईल किंवा पैशाचं चामड्याचं पाकीट, कंबरेचे चामड्याचे बेल्ट इत्यादी घेऊन जाता येणार नाही. केरळला तुम्हांला थंडी जाणवेल, म्हणून पुरेसे स्वेटर आणि शाली जवळ बाळगा. हाऊसबोटीतल्या मुक्कामात डासांचा त्रास जाणवतो, म्हणून तुमच्या बरोबर डासांसाठीच्या मॅट्स आणि मशीन घेऊन जा. हाऊसबोटीतलं जेवण ठीक नसल्याच्या कधीकधी तक्रारी येतात, तरी तिथे खाण्यासाठी काही पदार्थ सोबत ठेवा.' इत्यादी इत्यादी. आम्ही तिच्या सूचनांप्रमाणे प्रवासाची सगळी तयारी केली.
या ट्रीपसाठी आम्हांला १० नोव्हेंबरला सकाळी मुंबईहून कोचीला जाणारं विमान पकडायचं होतं. आमचं विमान सकाळी ज्या वेळेला निघणार होतं, त्यापेक्षा थोडं उशीरा जाणारं विमान आम्ही निवडलं असतं, तरी चाललं असतं, पण असं थोडं उशीरा निघणारं कोणतंच विमान नसल्याने आम्हांला लवकर निघणारं हे विमान निवडावं लागलं होतं. त्यामुळे विमान पकडण्यासाठी आम्हांला पहाटे पाच वाजताच घराबाहेर पडावं लागलं होतं. त्यात काही कारणामुळे सामान पॅक करतांना आदल्या रात्री उशीरापर्यंत जागावं लागल्यामुळे, आदल्या रात्री आमची नीट झोप झाली नव्हती. टॅक्सीने विमानतळावर जातांना वाटेतला रस्ता अतिशय खराब असल्याने आम्हांला सारखे धक्के बसत होते आणि टॅक्सीत झोप काढण्याच्या आमच्या बेताला सुरुंग लागला होता. विमानतळावर गेल्यावर तिथल्या वातावरणातली एकंदर गजबज पाहून, तिथे आम्हांला झोप येणं शक्य नव्हतं, त्यामुळे विमानतळावर इकडेतिकडे फिरण्यात आम्ही सगळा वेळ घालवला.

![]() |
विमानतळावरचा गांधीजींचा पुतळा |
आमचं स्पाईसजेटचं विमान अगदी वेळेत होतं आणि त्याची वेळ झाल्याबरोबर प्रवाशांना विमानात सोडायला सुरूवात झाली होती. आमच्या सीट्स आम्ही वेब चेक इन करून आधीच आरक्षित केलेल्या होत्या, पण आमच्याआधी विमानात शिरलेल्या एका वृद्ध गुजराती महिलेने आमच्यापैकी एकाच्या खिडकीजवळच्या सीटवर बसून घेतलं होतं. ती सीट आमच्यापैकी एकाची आहे हे बोर्डींग पास दाखवून सांगितल्यावर त्या महिलेच्या शेजारी बसलेला तिचा नवरा पटकन उठून स्वतःच्या सीटवर जाऊन बसला, मात्र ती महिला काही त्या सीटवरून उठली नाही आणि स्वतःच्या सीटकडे बोट दाखवत, "बेसी जावो," असं म्हणत ती त्या सीटवर जाणीवपूर्वक बसून राहिली. ज्याची सीट होती, त्याला समोर महिला आहे आणि त्यात ती वयाने वृद्ध आहे हे पाहून वाद न घालता, स्त्रीदाक्षिण्य दाखवत नाईलाजाने दुसऱ्या सीटवर बसायला लागलं. नंतर ती महिला त्याला स्वतःचं कार्ड देत, "मलबार हिलला आमचा बंगला आहे, कधी तिथे आलास तर चहा प्यायला ये आमच्या बंगल्यावर." असं तोंडदेखलं आमंत्रण द्यायला विसरली नाही. त्या महिलेच्या परिवाराचा केरळमध्ये बिझनेस होता आणि तिचा जवळचा नातेवाईक एका राजकीय पक्षाशी संबंधित होता, हे आम्हांला नंतर कळलं. ट्रेनमध्ये किंवा बसमध्ये सीटवर दुसरीच व्यक्ती बसण्याचे असे प्रकार होतात हे आमच्या सवयीचं होतं, पण विमानातही असा अनुभव यावा हे अनपेक्षित होतं. त्यामुळे विमानात ब्रेकफास्टसाठी आधी निवडलेल्या खाद्यपदार्थांऐवजी दुसरेच खाद्यपदार्थ ज्याची सीट बदललेली होती, त्याच्या वाट्याला आले.
या सगळ्या गोंधळानंतर अखेर एकदाचं आमचं विमान कोचीला पोहोचलं आणि तेही वेळेआधी. विमानातून उतरून सामान घेण्यासाठी आम्ही सरकत्या बेल्टपाशी आलो. बऱ्याच वेळाने त्यावर आमचं सामान आलं. आमचं सामान घेऊन आम्ही विमानतळाबाहेर आलो, त्यावेळी दुपारी अकरा साडेअकराची वेळ असली, तरी तिथलं ऊन आणि हवेतला उकाडा चांगलाच जाणवत होता. विमानतळाबाहेर आमच्या गाडीचा ड्रायव्हर आमच्या नावाचा बोर्ड हातात घेऊन उभा होता.
ड्रायव्हरने आमचं सामान गाडीत ठेवलं आणि आम्ही गाडीत बसलो. गाडीत एसी चालू केलेला होता, गाडीतल्या सीट्स आरामदायक होत्या. गाडी हॉटेलच्या दिशेने निघाली आणि आम्ही खिडकीतून आजूबाजूची हिरवाई बघू लागलो. रस्त्याच्या कडेला सुपारीची झाडं लावलेली दिसत होती, काही शोभेच्या झाडांची फुलं लक्ष वेधून घेत होती. अधूनमधून रस्त्यावरून जाणारे लुंगीधारी पुरुष दिसत होते, आता पुढच्या संपूर्ण प्रवासात आम्हांला असे लुंगी किंवा मुंडू नेसलेले पुरुष वारंवार दिसणार होते. स्त्रिया मात्र बहुतेक करून पंजाबी ड्रेसमध्ये वावरतांना दिसत होत्या. मधूनच आमच्या गाडीच्या बाजूने एखादी एस्टी बस जातांना दिसत होती. या बसच्या खिडकीला वरखाली करता येतील अशी झापं होती, ऊन असल्याने काही खिडक्यांची झापं खाली ओढलेली दिसत होती. काही रिक्षांनाही दरवाजे लावलेले दिसले.
दुपारी एकच्या सुमारास आम्ही आमच्या हॉटेलवर पोहोचलो. ड्रायव्हरने आम्हांला सांगितलं, की "तुम्ही हॉटेलवर जाऊन फ्रेश होऊन, जेवण करून घ्या. मी अडीच वाजता तुम्हांला साईट्स बघण्याकरता घेऊन जाईन."
'द क्लासिक फोर्ट' नावाच्या त्या बिझनेस क्लास हॉटेलची इमारत बाहेरून अतिशय छान दिसत होती. चेक इनचे सोपस्कार पार पाडून आम्ही लिफ्टने वरच्या मजल्यावर गेलो. तिथून 'सी' आकाराच्या कॉरीडॉरमधून आमच्या खोल्यापर्यंत जातांना, कॉरीडॉरमधल्या मंद दिव्यांमुळे कॉरीडॉर काहीसं अंधारं वाटत होतं आणि तिथल्या लेमनग्रासच्या वासाच्या रूम फ्रेशनरचा तीव्र वास एकदम नाकात घुसत होता. खोल्या मात्र स्वच्छ आणि प्रशस्त होत्या, खोलीत बेड आणि इतर फर्निचरव्यतिरिक्त एक छोटा फ्रीज, टीव्ही, फोन आणि एसीची सोय होती. टाॅयलेट प्रशस्त होतं, त्यात चोवीस तास गरम पाण्याची सोय होती, नळांना भरपूर पाणी होतं आणि तिथे टाॅवेल, साबण, शांपू, माॅईश्चरायझर आणि शाॅवर कॅप्स असं सगळं ठेवलेलं होतं.
खोलीच्या खिडकीचा पडदा ओढून बाहेर पाहिल्यावर मात्र आमचा अपेक्षाभंग झाला, तिथून हॉटेलच्या स्टाफला येजा करण्यासाठी ठेवलेला जिना आणि एका कौलारु घराची मागची बाजू दिसत होती. एसीचा तीव्र ब्लास्ट आणि पंखा दोन्ही चालू असल्याने खोलीत थंडी वाजत होती. पण एसीचा ब्लास्ट कमी केला, तर एसीच्या झोताबाहेर गेल्यावर उकाडा जाणवत होता. त्यामुळे खोलीतला एसी चालू ठेवून शाल किंवा स्वेटरचा वापर करावा लागणार होता.
खोलीत सामान ठेवून, फ्रेश होऊन आम्ही जेवायला खालच्या डायनिंग हॉलमध्ये गेलो आणि आमच्यासाठी व्हेजमीलच्या थाळ्या मागवल्या. जेवण यायला जरा वेळ लागला, पटकन कामं व्हायला ती काही मुंबई नव्हती, तिथली कामं तिकडच्या संथ गतीप्रमाणे चालत होती. थोड्या वेळाने आमच्या थाळ्या आल्या, त्यात तीनचार प्रकारच्या भाज्या, दाल, सार, दही, पोळी आणि (केरळमध्ये वापरल्या जाणाऱ्या जाड तांदळाचा) भात असे पदार्थ होते. बहुतेक भाज्या, सार इत्यादी पदार्थ खोबरेल तेलाचा वापर करून बनवलेले होते आणि भाज्यांमध्ये मुक्त हस्ताने ओल्या खोबऱ्याचा वापर केलेला होता, त्यामुळे पदार्थांना एक वेगळीच चव आली होती.
जेवण झाल्यावर तिथल्या वेटरने आम्हांला व्हेजमीलच्या थाळीऐवजी दुसऱ्या कोणाचं तरी फीशमीलच्या थाळीचं बिल आणून दिलं, तेवढं सोडलं तर बाकी स्टाफची सर्व्हीस चांगली होती. बिलाचा गोंधळ निस्तरून व्हेजमीलचं नवं बिल घेऊन ते पेड करण्यात अजून वेळ गेला. अडीच वाजून गेले होते, साईटसीईंगला जाण्याची वेळ झाली होती, पण आमच्यापैकी कोणाचीच नीट झोप झाली नसल्याने कोणालाच साईटसीईंगला जायचा उत्साह नव्हता. म्हणून आम्ही 'अडीचच्या ऐवजी साडेतीनला निघून एखादंच महत्त्वाचं प्रेक्षणीय स्थळ बघायचं,' असं ठरवलं आणि त्याप्रमाणे ड्रायव्हरला फोन केला, पण ड्रायव्हर आधीच तयार होऊन आलेला होता. तो म्हणाला की, "एकदीड तासात तुमची इथली सगळी ठिकाणं बघून होतील, फार वेळ लागणार नाही. तुम्ही उशीरा निघालात तर पाचच्या नंतर इथली ठिकाणं बंद होतात, त्यामुळे तुम्हांला काही बघायला मिळणार नाही." ड्रायव्हरच्या आग्रहामुळे थोड्या नाईलाजानेच आम्ही साईटसीईंगला निघालो.
ड्रायव्हरने आम्हांला आधी ज्युईश सिनेगाॅगजवळ असलेल्या अँटीक शाॅपच्या बाजाराजवळ सोडलं. त्याने आम्हांला बजावलं, "इथल्या अँटीक शाॅपमध्ये सगळ्या वस्तू महाग मिळतात. त्यामुळे इथे काही खरेदी करू नका." मग आम्ही अँटीक शाॅपच्या त्या बाजारातून फिरत फिरत ज्युईश सिनेगाॅगमध्ये पोहोचलो. तिथे आत जाण्यासाठी प्रवेशशुल्क भरावं लागत होतं. आत एका बाजूच्या लहानशा खोलीत त्यांचा इतिहास दर्शवणारी चित्रं रंगवलेली होती आणि त्याच्या पुढे त्यांचं मुख्य प्रार्थनास्थान होतं. त्या दिवशी तिथे काही शाळांच्या ट्रीप्स आलेल्या असल्याने चित्रांच्या खोलीत मुलांची इतकी गर्दी होती, की आम्हांला ती चित्रंही नीट बघायला मिळाली नाहीत. प्रार्थनेच्या खोलीत गाभारासदृश असं जे काही होतं, ते पडद्याने झाकून ठेवलेलं होतं, त्याच्यावरचा पडदा आठवड्यातल्या काही ठराविक दिवशीच उघडतो असं आम्हांला कळलं. त्यामुळे हे ज्युईश सिनेगाॅग पाहिलं नसतं, तरी चाललं असतं, असं आम्हांला वाटून गेलं.
![]() |
अँटीक शॉपमधला गणपती - १ |
तिथून थोड्याच अंतरावर डच पॅलेस होता. त्या राजवाड्यात एक छोटं म्युझियम होतं, त्याचं प्रवेश शुल्क भरून आम्ही ते म्युझियम पाहिलं. तिथून आम्हांला ड्रायव्हरने तिथल्या सांता क्रूझ बॅसिलिका चर्चकडे नेलं, पण तिथली शाळा सुटण्याची वेळ झालेली असल्याने, तिथे गाडी न थांबवता त्याने आम्हांला चायनिज फिशिंग नेट्स बघण्यासाठी समुद्रकिनाऱ्याजवळ नेलं. आम्ही सगळेच शाकाहारी असल्याने आम्हांला माशांचा वास सहन होत नव्हता म्हणून केरळातली ती पारंपारिक पद्धतीने जाळी वापरून केली जाणारी मासेमारी बघण्यात रस वाटत नव्हता. पण ड्रायव्हरने खूपच आग्रह केल्याने आम्ही गाडीतून उतरून तिकडे गेलो. आमच्या प्रवासाच्या यादीत दिलेली सगळी ठिकाणं आम्ही बघितलीच पाहिजेत यावर त्या ड्रायव्हरचा कटाक्ष होता. माशांचा वास सहन होत नसल्याने आम्ही लांबूनच ती जाळी पाहिली आणि आमचा मोर्चा तिथे जवळच असलेल्या एका साडीविक्रीकेंद्राकडे वळवला.
![]() |
चायनिज फिशिंग नेट्स |
दुकानात खरेदी करून काही मिनिटांत आम्ही तिथून बाहेर पडलो. आता आम्हांला दुपारचा चहा घेण्याची आवश्यकता भासत होती. गाडीने समुद्रकिनाऱ्याजवळ येतांना आम्हांला वाटेत चहाकॉफी विकणाऱ्या छोट्या टपऱ्या दिसल्या होत्या, त्यांच्यासमोर बाकं मांडून बसण्याची सोयही केलेली होती. तिथेच चहा घेऊ असं ठरवून ड्रायव्हरला तसं सांगितल्यावर तो म्हणाला, "तुम्हांला बीचवर चांगला चहा मिळेल. आपण तिथे जाऊ."
ड्रायव्हरने गाडी बीचजवळ नेऊन उभी केली. आम्ही फक्त चहा पिण्यासाठी म्हणून गाडीतून खाली उतरलो. पण तिथे समुद्रावरून छान वारा येत होता, त्यामुळे जरा तरतरी येऊन आम्ही थोडं पुढे जाऊन पाहिलं, तर बीचवर लोकांची फारशी गर्दी नव्हती. चहाची किंवा इतर कोणतीच दुकानं तिथे दिसत नव्हती. फक्त बासऱ्या, फुगे आणि शहाळे विकणारे काही फेरीवाले तिथे दिसत होते. तेवढ्यात सायकलवरून एक चहावाला तिथे आला. त्याच्याकडचा चहा कसा बनवलेला असेल, या विचाराने आम्हांला त्याच्याकडचा चहा घ्यावासा वाटत नव्हता. पण दुसरीकडे कुठेच चहा प्यायची सोय दिसत नसल्याने, आम्ही त्याच्याकडचा चहा घेतला. चहावाल्याने, 'कुठून आलात? कुठे जाणार?' वगैरे प्रश्न विचारत आमची चौकशी केली. त्याच्या बोलण्यात मात्र अगत्य जाणवत होतं. चहा पिऊन झाल्यावर थोडा वेळ बीचवर घालवून आम्ही परत गाडीकडे आलो.
![]() |
कोची बीच - इतके कसले कागद तिथे पडलेले दिसत होते कोणास ठाऊक? |
![]() |
बीचवर निवांतपणे जिव्हाळ्याच्या गप्पा मारणारे बासरीविक्रेते |
![]() |
बीचपलिकडचं हिरवाईत लपलेलं घर |
![]() |
बीचवरून दिसणारा मावळतीचा सूर्य |
![]() |
दगडांनी बांधून काढलेला बीचचा काही भाग |
तिथून ड्रायव्हरने गाडी परत सांता क्रूझ बॅसिलिका चर्चकडे नेल्यावर मात्र आम्ही कोणीच खाली उतरायला तयार नव्हतो. सगळ्यांच्या डोळ्यांवर झोप होती. मग ड्रायव्हरने गाडी आमच्या हॉटेलकडे वळवली. गाडी हॉटेलपर्यंत जाण्याआधी गाडीतच आमचे डोळे झोपेने मिटायला लागले होते. आम्ही हॉटेलवर गेल्यावर, सरळ आपापल्या खोल्यांमध्ये जाऊन जेवणाच्या वेळेपर्यंत झोप काढली.
रात्री जेवणासाठी आम्ही मिक्स भाजी आणि रोटी (दोन्ही पंजाबी पद्धतीचे), कॅबेज फ्राय, पुलाव इत्यादी पदार्थ मागवले. त्यापैकी कॅबेज फ्राय ही भाजी असेल, असं आम्हांला वाटलं होतं, पण प्रत्यक्षात ती कोबीची आणि कांद्याची तांदुळाच्या पिठात केलेली भजी होती. या सगळ्या पदार्थांची चवही दुपारप्रमाणेच थोडीशी वेगळी पण ठीक होती. जेवण झाल्यावर तिथल्या वेटरने आम्हांला कोणत्या फ्लेवरचं आईसक्रीम हवं आहे, ते विचारून त्याप्रमाणे प्रत्येकाला हवं ते आईसक्रीम आणून दिलं.
No comments:
Post a Comment