--000-- Important statement - Some of those who are calling themselves as my so-called friends on the basis of acquaintance which has happened in a short duration of past time, behaved with me in past in a manner which was crossing over the limits of friendship in that time, vexatious, objectionable even after the frequent admonitions given by me, so I do not consider them as my friends who crosses over the limits of friendship. So I am not duty-bound to publish or answer their comments which are given on any of my blogs, or to answer their email, or to accept their friend invite on any of the social website like facebook, or to answer their messages sent through the comment form on blog. So please take a kind note that if it will be found out that the abovementioned persons tried to contact with me directly or indirectly by any types of means mentioned before or through any other person by incuring him / her inbetween or by maknig fake profile through it or by any other means, through the blog or through any other medium or if it will be found out that they have done any type of act which is vexatious for me, then proper action will be taken on it. Also by all this incidence the decision is taken that the right of publishing all the suspicious seeming comments given on the blog and the right of answering any of the suspicious seeming messages coming through the comment form is reserved, readers please take a kind note of it. ----- 00000 ----- महत्त्वाचे निवेदन - भूतकाळातील थोडक्या कालावधीकरता झालेल्या माझ्या ओळखीच्या आधारावर स्वतःला माझे तथाकथित मित्र म्हणवून घेणार्‍या काही जणांनी पूर्वी मी वारंवार समज दिल्यानंतरही, माझ्याशी तत्कालीन पद्धतीच्या मैत्रीच्या मर्यादा ओलांडणारे, मनस्ताप देणारे, आक्षेपार्ह वर्तन केले, त्यामुळे अशा मैत्रीच्या मर्यादा ओलांडणार्‍यांना मी माझे मित्र मानत नाही. त्यामुळे माझ्या कोणत्याही ब्लॉगवर आलेल्या त्यांच्या कॉमेंट्स प्रकाशित करणे किंवा त्यांना उत्तर देणे, किंवा त्यांच्या इमेलला उत्तर देणे, किंवा त्यांच्या फेसबुकसारख्या कोणत्याही सोशल वेबसाईटवर आलेल्या फ्रेंड इन्व्हाईटला ऍक्सेप्ट करणे, किंवा त्यांनी ब्लॉगवरील कॉमेंट फॉर्मद्वारा पाठवलेल्या निरोपाला उत्तर देणे यासाठी मी बांधील नाही. त्यामुळे उपरोल्लेखित व्यक्तिंनी आधी उल्लेख केलेल्या कोणत्याही प्रकारे किंवा दुसर्‍या एखाद्या व्यक्तीला मध्ये घालून तिच्याद्वारे किंवा बनावट प्रोफाईल तयार करून त्याद्वारे किंवा इतर कोणत्याही प्रकारे, ब्लॉग किंवा इतर कोणत्याही माध्यमातून माझ्याशी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष प्रकारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याचे आढळल्यास किंवा मला मनस्ताप होईल अशा प्रकारचे कोणतेही कृत्य त्यांनी केल्याचे आढळल्यास, त्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी. तसेच या सर्व प्रकारामुळे ब्लॉगवर आलेल्या संशयास्पद वाटणार्‍या सर्व कॉमेंट्स प्रकाशित करण्याचे आणि कॉमेंट्स फॉर्मद्वारे आलेल्या संशयास्पद वाटणार्‍या कोणत्याही निरोपाला उत्तर देण्याचे अधिकार राखून ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी. --000--

Monday, September 9, 2013

Wednesday, August 21, 2013

दिसेल का कधी मला ते?

     तीनचार दिवसांपूर्वी कॉम्प्युटरसमोर बसून इंटरनेटवर माहिती धुंडाळत असतांना, अचानक डोळ्यांच्या कोपर्‍यातून जाणवलेल्या कसल्याशा हालचालीमुळे माझं लक्ष खिडकीबाहेर वेधलं गेलं. गॅलरीतल्या बॉक्स ग्रीलमध्ये लावलेल्या गुलाबी जास्वंदाच्या फांद्यांची हालचाल होत होती. खिडकीला लावलेल्या अर्धपारदर्शक पडद्यामुळे मला नीट दिसत नव्हतं, पण इतकं लक्षात आलं, की एक छोटा पक्षी जास्वंदाच्या फांदीवर बसला होता, त्याच्या हालचालीने जास्वंदाच्या फांद्या हलत होत्या.

     छोटे पक्षी, मधमाशा, फुलपाखरं असे प्राणी या गुलाबी जास्वंदाकडे आकर्षित होतात, हे मला माहित होतं. ह्या झाडावर चिमण्या यायच्या, अधूनमधून शिंपी पक्षी यायचा आणि क्वचित सूर्यपक्षीही (सनबर्ड) आलेला दिसायचा. त्यातही गेल्या काही दिवसांत शिंपी पक्षी बर्‍याचवेळी त्या झाडावर बसलेला दिसायचा. आत्ताही मी माझ्या जागेवर बसल्याबसल्या जास्वंदाच्या फांदीवरच्या त्या पक्ष्याला निरखून पाहिल्यावर मला लक्षात आलं, की तो शिंपी पक्षी होता आणि बराचवेळ तो त्या झाडावर काहीतरी करत होता. मला वाटलं, तो बहुतेक झाडावर असलेल्या किडामुंग्यांना शोधून खात असावा. 

     पण बराचवेळ झाला तरी तो पक्षी तिथेच बसून काहीतरी करत होता. शेवटी अनिवार उत्सुकतेने मी उठले आणि गॅलरीच्या दाराजवळ जाऊन बघायला लागले. माझी चाहूल लागल्यावर तो पटकन उडून गेला आणि मी, तो कुठे आजूबाजूला बसलेला दिसतोय का, हे पाहण्यासाठी गॅलरीत गेले. तो पक्षी तिथे आजूबाजूला कुठेच नव्हता, पण जास्वंदाच्या लांबलचक फांद्यांना ज्या नायलॉनच्या दोर्‍यांनी ग्रीलला बांधून ठेवलं होतं, त्या दोर्‍यांची वीण उसवलेली दिसत होती. 

     त्या शिंप्याला घरटं बांधण्यासाठी दोरा हवा होता अणि त्यासाठी त्याचे हे सगळे उद्योग चालले होते. पण जी दोरी तो उसवू पाहत होता, त्या दोरीची गाठ सोडवून तिच्यातला त्याला हवा तेवढ्या लांबीचा दोरा घेऊन जाण्यासाठी त्याचं सगळं आयुष्य गेलं असतं, तरी त्याला ते जमलं नसतं. पण तो पक्षी मात्र तो दोरा उसवण्याचा वेडेपणा करतच राहणार होता. काहीतरी उपाय शोधायला हवा होता.

     झाडाला जी नायलॉनची दोरी बांधलेली होती, ती कागदी पिशव्यांना हॅंडल म्हणून वापरल्या जाणार्‍या दोर्‍यांपैकी होती. तशा अजून पाचसहा दोर्‍या घरात पडलेल्या होत्या. मग मी त्यातली एक दोरी घेतली अणि ती उसवली. ती दहाबारा इंचांची दोरी उसवल्यावर आठदहा फूट लांबीची झाली, तरी त्यातले बारीक धागे वेगळे झालेले नव्हते. मग मी त्या दोरीचे चारपाच इंच लांबीचे छोटे तुकडे कापले. ते तुकडे हाताने पिंजून त्यातले धागे जरा वेगळे केले आणि ते पिंजलेले तुकडे झाडाच्या फांदीवर लटकवून दिले.

     पुढचे काही दिवस काहीच घडलं नाही. पण आज पुन्हा शिंपी त्या झाडावर आलेला दिसला, कोणाची तरी चाहूल लागल्याने तो पटकन उडून गेला आणि बागेतल्या झाडावर बसला. थोडा वेळ तो त्या झाडावर बसला होता, मग तिथूनही उडून गेला. पण त्या बागेतल्या झाडाच्या फांदीवर मी कापलेला नायलॉनच्या दोरीचा तुकडा लटकलेला दिसत होता. शिंप्याने तो तुकडा अजून जास्त पिंजला होता. त्याला त्यातला एकच धागा वेगळा काढून हवा असावा आणि इतक्या कमी वेळात तो धागा वेगळा करणं त्याला शक्य झालं नसावं, पण आख्खी नायलॉनची दोरी उसवण्यापेक्षा तो छोटा तुकडा उसवणं त्याला नक्कीच जास्त सोपं जाईल. जितक्या लवकर त्याला धागा मिळेल, तितक्या लवकर तो त्याचं घरटं बांधू शकेल.

     शिंप्याचं घरटं कुठेतरी झाडाच्या उंचावरच्या पानात बांधलं जाईल. मी इतकी वर्षं शिंपी पक्षी बघते आहे, पण अजून मला त्याचं घरटं बघायला मिळालेलं नाही. यानिमित्ताने तरी त्याचं घरटं बघायला मिळावं हीच इच्छा आहे!

Wednesday, August 14, 2013

Fragrant Memories

       Few days ago suddenly my attention was sought by a fragrance spread in surroundings. That fragrance was familiar to me. That mild fragrance was getting used to do splash. It's smell was mind pleasing and the shape of it's bottle was also characteristic. One by one memories from my past were awakened by that fragrance and I lost in it.

     There was Spider lily's plant in our garden during my childhood. At evening time of four thirty to five I was plucking that lily's buds and bringing them in home and putting them in glass filled with water. After some time the petals of those buds were started separating and those buds were blooming spreading fragrance.

  
     The second smell that became familiar to me at early childhood was that of Dill (Shopa). Earlier the Dill (Shopa) water was given to justborn babies, the smell of it and that of baby powder was feeling nice. That time we had a container of scented powder which was given as a gift by someone. The scent of that powder was so strong, that just by that smell my head was started to aching. Just like that when the flower of green champa (Ylang Ylang Vine) was being brought in home, I was feeling it's continuous scented smell as unwanted.

     The fragrances of other flowers were feeling delightful to mind, left alone the flower of green champa. One of them was Screw Pine (Kevada). At sometime when I was small there was a kevada leaf among the leaves brought for worship. At that time that white leaf appeared quite different, so I observed by picking it up and catched it's mild fragrance. Then I isolated that Kevada leaf from other leaves for me and smelled it. After asking for it's name I came to know that, 'It's Kevada and snakes come in woods of kevada due to it's scent.' Then while going into the garden after putting that kevada leaf in hair, the thought was continuously coming in mind that suddenly one of the snake will come in front due to the scent of kevada.

     In past a garland seller woman used to come to us. She was having Arabian Jasmine (Mogara / Bela) garlands with her but mostly River Jasmin's (Jui) garlands were also there with it. The delicate flowers of Jui / jasmine and their mild fragrance was being overcoming on Mogara / Bela and we were purchasing jasmine garlands from her. But when we had to go through hot sun of full summer, that time all the exhaustion caused by hot sun was getting disappeared by the smell of Mogara / Bela flowers from the garland sellers selling garlands by sitting on the side of road. In past the bundle of Khus was purposely brought and put in earthen mataka to drink cool scented khus water during summer. Khus curtains were being put up in some people's houses to keeping cool from the heat of summer. In all this environment strongly spreading scent of mangoes had been feeling very wanting, also it has been feeling wanted today.


     The fragrance of soil spreading in environment cheers our mind when the rain drops fell on land heated by sun. When I was travelling through train, some women were coming to sell their fragrant flowers like Golden champa (sonchafa), Butterfly ginger lily (sontakka) after the starting of rain, my mind was being pleased by the fragrance of those flowers. At that same time the plant of Coral Jasmine (Prajakta / Paarijat) in our garden had been being fully bloomed and it's mild fragrance had been being catched. At that same time the Passion flower had been being bloomed with scented flowers. We had our first Orchid cactus (Brahmakamal) bloomed in rainy season and at that time I had shot the photos of that fragrant flower by standing in full rain.   
     Just by the aroma of tea prepared by putting Ginger or Lemon grass we feel lively after coming soaked in rain. If by mistake we smelled onion pakodas, then the demand of making onion pakodas is done in home. In past getting attracted by the smell of roasted maize ears we had been being purchasing maize ears without any mistake. The lemon dipped in salt had been being applied on the roasted ear. The fun of eating that roasted ear has been being feeling quite different. After the rain was becoming being little less, then it had been being started the line of festivals. The spreading fragrance of flowers in home, scent of burnt camphor in front of God, the smell of dishes made for making an offering to God and people eating a meal on banana leaves in rows with spreading scent of incense sticks (udabatti) all for the purpose of festival was having it's own mind pleasing smell.

     There had been being Hom (the holy fire), havan (rituals about holy fire) in the house of some people in the days of Navaratri when the rain was over. The spreading aroma of smoke of Holy Fire / hom and Incense / Dhoop had been being delighted to mind. To prevent mosquitoes from coming inside home we were purposely burning aromatic incense at the time of evening. After that when Diwali was approaching, then the aroma of tasty dishes was spreading in air. We were being specially fond of the smell of Chakali's Bhajani (The Flour of roasted spicy grains) in all that. The children had been starting to burn fireworks before the beginning of Diwali, though the smell of burnt firework's gunpowder is poisonous, that time we were fond of it. The Diwali was becoming fragrant due to fragrant Utane (Mixture of Powder of aromatic plants), aromatic oil and fragrant soap all of that brought for Diwali.

     At some times the surroundings were becoming fragrant due to the spreading fragrance of Night blooming Cestrum (Rat - Rani) from the garden of the neighbours. The other neighbour was having a vine of Rangoon Creeper (Madhu Malati). In past there was a vine of Pink jasmine (Gulabi Chameli) and a plant of Gardenia (Anant) in our garden, people from nearby buildings were coming to pluck the fragrant flowers of both. Apart from that when the flowers like Tuberose (Rajanigandha / Nishigandha), Scented Roses (Desi Gulab), Spanish Cherry (Bakuli) were being brought at home, then by their fragrance the surroundings were becoming delightful. Once I had got to see the inflorescence of Cashew, all the surroundings around it were became fragrant by it's spreading scent.


   
     Once when I had gone into the store which had got government's permission, the things made of sandalwood were kept for sell on one floor in the store and the whole surroundings were became fragrant due to the spreading aroma of sandal. I had bought sandal jewellery from that shop. Sandal is applied to god by making it's paste, also Ashtagandha (Paste of eight aromatic things) is applied for same. The Ashtagandha which is prepared by using aromatic things like Sandalwood, Khus etc. is having aroma stronger than that of sandalwood. When the Ashtagandha is being applied to God, a strong fragrance like that of a incense stick (udabatti) is being spread in whole house. But Red Sandalwood is having mild fragrance. In many cosmetics the fragrance of Red Sandalwood is being used, the mind becomes tranquil due to that scent. The smell of Lavender oil also makes our minds tranquil.

Sandal Jewellery
 
     But the smell of Coffee is being stimulating. In past when I was used to go by a road, the smell of grounded coffee seeds was being spread far outside from a store along that road. The coffee prepared by using Nutmeg is having it's different scent and flavour. Each spice like Cardamom, Clove, Cinnamon, Indian Bay leaf (Tamalpatra) is having it's own smell and flavour. Our appetite is stimulated by the delicious spreading smell of the dishes made by using these spices. The spreading smell of Pulao is coming due to the spices used in it, as well as by the fragrance of Basmati Rice in it. Except fragrant Rices other grains do not have much smell, but when these grains are roasted and ground into spicy flour (Bhajani) for making Thalipeeth, then comes it's delicious smell. For this smell the scent of coriander seeds, cumin seeds is also responsible. Cumin seeds, Fennel seeds, Ajwain seeds, Coriander seeds, Dill seeds all these seeds from family of coriander have their own scent and flavour. Coriander, Mint (Pudina), Kasuri Methi (type of Fenugreek) are used in some specific dishes because of their smell. The vegetables like Fenugreek, Dill (shepu) are having strong smells, these vegetables do have specific tastes because of their smells. When the Brinjal is roasted and it's bharata is prepared, then it's well rosted delicious smell spreads in the air. The specific spices in the vegetables like Pav Bhaji and Undhiyu are mainly responsible for the smell of these vegetables which are made by mixing vegetables. Though Onion and Garlic have their own pungent smell, we feel tongue stimulating smell of the dishes when Onion and Garlic are used in it by using specific method while cooking. In addition to this fruits also have their own spcific smells. The scent of fruits like Lemon, Orange etc. which are from citrus family makes our mind feel fresh and energetic. The sweet smell of fruits like Mango, Guava, Jackfruit, Pineapple, Musk Melon remains for longer time in the air and we wish to eat those fruits. When the fruits like Papaya, Custard Apple, Bullock's heart (Ramfal) have been cut, then their scents have been felt strongly. By the smell of Coconut, sometimes it is felt like coming in temple. In addition to these smells the noteworthy smell is that of making of ghee by boiling process. All these smells do have a specific place in my life.

  
     Some more smells which I was used to like at my childhood were, smells of oils which are used in medicines like Eucalyptus Oil and other oils which are obtained from plants, smells of some liquids which are used for sterilization, smells of Petrol and Paints!

     Though most of the fragrances among these fragrances are being obtained by plants, some fragrances are being obtained from animals. Same is the Musk of Musk Deer! Once when I had gone to the other city there came a vendor selling perfumes (attar / ittar). While speaking he said that he is having Deer Musk with him. He took out something from his Zola bag and showed us by opening his fist. In his hands there was a hairy ball looking like hairs of animals. He immediately closed his fist and turned his hand into the air. A fragrance spread in the air. Whether the Musk he had shown was original or duplicate, knows only he himself! But the fragrance of that thing was spread in the air.


     Perfumes (attar / ittar) are made by using these different fragrances. The attar of Spanish Cherry (Bakuli) is having mild fragrance, but the attars of Screw Pine (Kevada), Coral Jasmine (Prajakta / Paarijat), Khus, Sandalwood are having strongly spreading fragrances. When I was ten years old, once I was going with my cousins on the road. While going through that road seen a pavilion next from a school, on that entire road. It was not only the pavilion erected on road, but the red cloth was laid down like a carpet on that whole road up to the other end of that pavilion. There was a fountain erected in the middle of the road, at the start of the pavilion. We all children stood there in front of that fountain for some time and held our hands in front of that fountain, so that the splashes of fountain will fall on our hands. Then while wiping off the wet hands we noticed that it was a fountain of attar. Then what, we directly held our hands in the water of that fountain and went ahead with fragrant hands.
   
  
     The fragrance which I liked the most from all these fragrances is that of fresh oxygenated water! When the water is coming with the speed in water tank of building, at the same time it is pumped up in the water tank on terrace, in this process the oxygen is dissolved in water naturally. When the tap in home is turned on and at that time the oxygenated water from the tank on the terrace started to come down, then that water is immediately having the fresh smell of oxygen. Just by that smell mind becomes fresh and energetic and I gather it up in my mind.
  

Monday, August 12, 2013

सुवासिक आठवणी

     काही दिवसांपूर्वी अचानक वातावरणात दरवळणार्‍या एका सुगंधाने माझं लक्ष वेधून घेतलं. तो सुगंध माझ्या परिचयाचा होता. शिडकावा करण्यासाठी वापरला जाणारा तो मंद सुगंध होता. त्याचा वास मन प्रसन्न करणारा होता आणि त्याच्या बाटलीचा आकारही वैशिष्ट्यपूर्ण होता. त्या सुगंधाने माझ्या भूतकाळातल्या एकेक आठवणी जागृत झाल्या आणि मी त्यात हरवून गेले.

     माझ्या लहानपणी आमच्या बागेत स्पायडर लिलीचं झाड होतं. मी संध्याकाळी साडेचार पाचच्या सुमाराला त्या लिलीच्या कळ्या तोडायचे आणि त्या घरी आणून पाण्याने भरलेल्या ग्लासमध्ये ठेवून द्यायचे. थोड्या वेळाने त्या कळ्यांच्या पाकळ्या सुट्या व्हायला लागायच्या आणि सुगंध पसरवत त्या कळ्या  उमलायच्या.

  
     मला अगदी लहानपणीच परिचित झालेला दुसरा वास म्हणजे शोपांचा. पूर्वी तान्ह्या मुलांना शोपांचं पाणी द्यायचे त्याचा वास आणि बेबी पावडरचा वास छान वाटायचा. त्यावेळी आमच्याकडे कोणीतरी भेट दिलेला एका सुगंधित पावडरचा डबा होता. त्या पावडरचा सुगंध इतका तीव्र होता, की त्या पावडरच्या वासानेच माझं डोकं दुखायला लागायचं. त्याप्रमाणेच हिरव्या चाफ्याचं फूल घरात आणलं, की त्याचा सतत येणारा तो सुगंधी वास मला नकोसा व्हायचा.

     एक हिरव्या चाफ्याचं फूल सोडलं, तर बाकी इतर फुलांचा सुवास मन प्रसन्न करणारा वाटायचा. त्यातलाच एक केवडा. मी लहान होते तेव्हा कधीतरी पूजेसाठी आणलेल्या पत्रीत केवड्याचं पान होतं. तेव्हा ते पांढरं पान जरा वेगळं वाटलं, म्हणून मी ते उचलून पाहिलं आणि त्याचा मंद सुवास जाणवला. मग मी पत्रीतून केवड्याचं ते पान माझ्यासाठी वेगळं काढलं आणि त्याचा वास घेतला. त्याचं नाव विचारल्यावर कळलं की, ’तो केवडा आहे आणि त्या केवड्याच्या वासाने साप केवड्याच्या बनात येतात.’ मग ते केवड्याचं पान केसात घालून बागेत जातांनाही मनात सतत येत होतं, की केवड्याच्या वासाने अचानक एखादा साप समोर येईल.

     पूर्वी आमच्याकडे एक गजरेवाली यायची. तिच्याकडे मोगर्‍याचे गजरे असायचेच पण त्याबरोबर बहुधा जुईचे (रिव्हर जास्मिन) गजरेही असायचे. जुईची ती नाजूक फुलं आणि त्यांचा मंद सुवास मोगर्‍याच्या फुलांवर मात करायचा आणि आम्ही तिच्याकडून जुईचे गजरे विकत घ्यायचो. पण जेव्हा भर उन्हाळ्यात उन्हातून चालत जावं लागायचं, तेव्हा मात्र रस्त्याच्या कडेला बसून गजरे विकणार्‍यांकडच्या मोगर्‍याच्या फुलांच्या वासाने उन्हाचा सारा शीण पळून जायचा. पूर्वी उन्हाळ्यात वाळ्याचं थंडगार पाणी पिण्यासाठी मुद्दाम वाळ्याची जुडी आणून ती माठात टाकली जायची. उन्हाळ्याच्या तलखीतून गारवा वाटावा म्हणून काहीजणांच्या घरात वाळ्याचे पडदे लावलेले असायचे. या सगळ्या वातावरणात घमघमणारा आंब्यांचा वास अगदी हवाहवासा वाटायचा, आजही वाटतो. 

     उन्हाने तापलेल्या जमिनीवर पावसाचे थेंब पडले, की वातावरणात दरवळणारा मृद्गंध मन प्रसन्न करतो. मी ट्रेनमधून प्रवास करायचे, त्यावेळी पावसाला सुरूवात झाली, की ट्रेनमध्ये काही बायका सोनचाफा, सोनटक्का अशी सुगंधित फुलं विकायला घेऊन यायच्या, त्या फुलांच्या वासाने मन प्रसन्न व्हायचं. याच काळात आमच्या बागेत असलेल्या प्राजक्तालाही भरपूर बहर आलेला असायचा आणि रात्री त्याचा मंद वास जाणवायचा. कृष्णकमळाला याच काळात सुवासिक फुलं आलेली असायची. आमच्याकडे पावसाळ्यात पहिलं ब्रह्मकमळ फुललं होतं आणि त्यावेळी पाऊस पडत असतांना, भर पावसात उभी राहून मी त्या सुवासिक फुलाचे फोटो काढले होते.   
     पावसात भिजून आल्यावर आलं किंवा गवती चहा टाकलेल्या चहाच्या नुसत्या वासानेही तरतरी येते. चुकून जर कुठे कांदेभज्यांचा वास आला, की घरी कांदेभजी करण्याची फर्माईश केली जाते. पूर्वी भाजलेल्या मक्याच्या कणसांच्या वासाने आकृष्ट होऊन आम्ही न चुकता कणसं विकत घ्यायचो. भाजलेल्या कणसाला वरून मिठात बुडवलेलं लिंबू लावलं जायचं. ते भाजलेलं कणीस खायची मजा तेव्हा काही औरच वाटायची. पाऊस जरा कमी व्हायला लागला, की मग सणांची रांग लागलेली असायची. सणाच्या निमित्ताने घरात असलेला फुलांचा दरवळ,  देवापुढे जाळलेल्या कापराचा वास, देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी केलेल्या पदार्थांचा वास आणि उदबत्त्यांच्या घमघमाटात केळीच्या पानावर जेवणार्‍यांच्या पंगती या सगळ्याचाही स्वतःचा असा एक वेगळाच मन प्रसन्न करणारा वास असायचा.

     पावसाळ्यानंतर नवरात्रीच्या दिवसांत काहीजणांकडे होमहवन असायचं. त्या होमाच्या धुराचा आणि धूपाचा दरवळही असाच मनाला प्रसन्न करणारा असायचा. संध्याकाळच्या वेळी घरात डास येऊ नयेत म्हणून आम्ही मुद्दाम सुगंधी धूप जाळायचो. त्यानंतर दिवाळी जवळ आली, की खमंग पदार्थांचे वास हवेत पसरायचे. त्यातही चकलीच्या भाजणीचा वास आम्हांला विशेष आवडायचा. दिवाळीच्या आधीपासूनच सगळी मुलं फटाके उडवायला सुरूवात करायची, जळलेल्या फटाक्यांच्या दारूचा वास विषारी असला, तरी तेव्हा तो आम्हांला फार आवडायचा. दिवाळीसाठी आणलेलं सुगंधी उटणं, सुगंधी तेल आणि सुवासिक साबण यांनी दिवाळी सुगंधी व्हायची.

     कधीकधी शेजार्‍यांच्या बागेत असलेल्या रातराणीच्या सुवासाने परिसर दरवळून जायचा. दुसर्‍या एका शेजार्‍यांकडे मधुमालतीचा वेल होता. पूर्वी आमच्या बागेत गुलाबी चमेलीचा वेल होता, अनंताचं झाड होतं, त्या दोघांची सुवासिक फुलं तोडायला शेजारच्या इमारतीतले लोकही यायचे. त्याशिवाय कधी निशिगंध, गावठी गुलाब, बकुळ अशी फुलं घरी आणली गेली, की त्याच्या सुवासानेही वातावरण प्रसन्न व्हायचं. मला एकदा काजूचा मोहोर बघायला मिळाला होता, त्या मोहोराच्या सुवासाने आजूबाजूचा सगळा परिसर दरवळला होता.


   
     असंच एकदा एका शासकीय परवाना मिळवलेल्या दुकानात गेले असतांना तिथे एका मजल्यावर सगळ्या चंदनी वस्तू विकायला ठेवल्या होत्या आणि सगळं वातावरण चंदनाच्या सुवासाने दरवळलं होतं. त्या दुकानातून मी चंदनाचे दागिने विकत घेतले होते. चंदन उगाळून देवाला लावलं जातं, तसंच अष्टगंधही वापरलं जातं. चंदन, वाळा असे सुगंधी पदार्थ वापरून केलेल्या अष्टगंधाचा सुवास चंदनापेक्षाही तीव्र असतो. देवाला अष्टगंध लावलं, की उदबत्तीसारखा तीव्र सुवास सगळ्या घरात पसरतो. रक्तचंदनाचा वास मात्र सौम्य असतो. बर्‍याच सौंदर्यप्रसाधनांमध्ये रक्तचंदनाचा सुगंध वापरलेला असतो, त्या वासाने मनाला एकदम शांत वाटतं. लव्हेंडर ऑईलचा वासही असाच मनाला शांतवणारा असतो.

चंदनाचे दागिने
 
     कॉफीचा वास मात्र उत्तेजक असतो. पूर्वी मी जिथून जायचे, त्या रस्त्यावरच्या एका दुकानातून कॉफीच्या बिया दळतांना येणारा वास बाहेर दूरपर्यंत दरवळत असायचा. जायफळ घालून केलेल्या कॉफीचा वास आणि आस्वादही वेगळाच असतो. वेलची, लवंग, दालचिनी, मिरे, तमालपत्र अशा प्रत्येक मसाल्याचा त्याचा असा एक वेगळा वास आणि स्वाद असतो. हे मसाले घालून केलेल्या पदार्थांमुळे खमंग वास पसरून आपली भूक चाळवली जाते. पुलावाचा दरवळणारा वास हा जसा त्यातल्या मसाल्यांमुळे येतो, तसाच त्यातल्या बासमती तांदुळाच्या विशिष्ट वासामुळेही येतो. सुवासिक तांदुळांशिवाय इतर धान्यांना फारसा वास नसतो, पण तीच धान्यं भाजून त्यांची थालिपीठाची भाजणी केली की तिचा खमंग वास येतो. या वासाला धणे, जिरे यांच्या सुगंधही कारणीभूत असतो. जिरे, बडीशोप, ओवा, धणे, शोपा या कोथिंबिरीच्या फॅमिलीतल्या बियांना स्वतःचा असा वेगळा सुगंध आणि स्वाद असतो. कोथिंबिर, पुदीना, कसूरी मेथी यांच्या वासामुळेच त्या काही विशिष्ट पदार्थांमध्ये वापरल्या जातात. मेथी, शेपू अशा भाज्यांना तीव्र वास असतात, त्या वासांमुळे त्या भाज्यांना विशिष्ट चव येते. वांगं भाजून त्यांचं भरीत केलं, की त्याचा खरपूस वास हवेत पसरतो. पावभाजी आणि उंधियो यासारख्या मिश्र पद्धतीने केलेल्या भाज्यांच्या वासाला मुख्यतः त्यातले विशिष्ट मसाले कारणीभूत असतात. कांदा आणि लसूण यांना स्वतःचे उग्र वास असले, तरी ते विशिष्ट पद्धतीने स्वयंपाकात वापरले गेले, की त्या पदार्थांचा जिभेला चाळवणारा वास आपल्याला जाणवतो. याशिवाय फळांनाही स्वतःचे असे खास वास असतात. लिंबू, संत्री इत्यादी लिंबूवर्गीय फळांचा सुगंध आपल्या मनाला तरतरी आणतो. आंबा, पेरू, फणस, अननस, खरबूज ह्या फळांचा गोडसर वास दीर्घकाळ हवेत जाणवत राहतो आणि आपल्याला ती फळं खावीशी वाटतात. पपई, सीताफळ, रामफळ ही फळं कापली गेल्यावर त्याचा वास तीव्रतेने जाणवतो. नारळाच्या वासाने कधीकधी देवळात आल्यासारखं वाटतं. या वासांशिवाय लक्षात राहणारा वास म्हणजे तूप कढवत असतांना त्याचा येणारा वास! या सर्व वासांना माझ्या आयुष्यात एक विशिष्ट स्थान आहे.

  
     मला लहानपणी आवडणारे अजून काही वास म्हणजे, औषधांमध्ये वापरल्या जाणार्‍या नीलगिरी तेलासारख्या वनस्पतीजन्य तेलांचे वास, निर्जंतुकीकरणाकरता वापरल्या जाणार्‍या काही द्रावणांचे वास, पेट्रोल आणि रंग यांचे वास!

     सुगंधापैकी बरेचसे सुगंध वनस्पतींपासून मिळवले जात असले, तरी काही सुगंध प्राण्यांपासून मिळवावे लागतात. कस्तुरीमृगाची कस्तुरी अशीच! एकदा मी दुसर्‍या शहरात गेले असतांना तिथे एक  अत्तरं विकणारा माणूस आला होता. बोलतांना तो म्हणाला, की त्याच्याजवळ कस्तुरी आहे. त्याने त्याच्या झोळीतून काहीतरी बाहेर काढलं आणि आम्हांला मूठ उघडून दाखवली. त्याच्या हातात प्राण्यांच्या केसांसारखा दिसणारा एक केसाळ गोळा होता. त्याने लगेच मूठ बंद केली आणि त्याचा हात हवेतून फिरवलाएक सुवास हवेत पसरला. त्याने दाखवलेली ती कस्तुरी खरी होती की बनावट हे त्याचं त्यालाच माहिती! पण त्या वस्तूचा सुवास मात्र हवेत दरवळला होता.

     असे हे वेगवेगळे सुगंध वापरून अत्तरं बनवली जातात. बकुळीचं अत्तर सौम्य वासाचं असतं, तर केवडा, प्राजक्त, वाळा चंदन ह्यांची अत्तरं घमघमणारी असतात. मी दहा वर्षांची असतांना एकदा माझ्या भावंडांबरोबर रस्त्यावरून चालले होते. त्या रस्त्याने जात असतांना एका शाळेपासून पुढच्या सगळ्या रस्त्यावर मंडप टाकलेला दिसला. रस्त्यावर नुसता मंडप टाकलेला नव्हता, तर मंडपाच्या दुसर्‍या टोकापर्यंत त्या पूर्ण रस्त्यावर गालिचासारखं लाल कापड अंथरलेलं होतं. जिथून मंडपाला सुरूवात झाली होती, तिथे रस्त्याच्या मध्यभागी एक कारंजं उभं केलं होतं. आम्ही सगळी मुलं थोडावेळ तिथे त्या कारंजासमोर उभे राहिलो आणि कारंजाचे तुषार हातावर पडावे म्हणून कारंजासमोर आमचे हात धरले. नंतर ओले हात पुसतांना आमच्या लक्षात आलं, की ते अत्तराचं कारंजं आहे. मग काय, आम्ही सरळ त्या कारंजाच्या पाण्यात आमचे हात धरले आणि सुगंधी हातांनी पुढे निघालो.

  
     इतक्या सगळ्या सुवासांमध्ये मला सर्वात जास्त आवडणारा सुवास कोणता असेल, तर तो म्हणजे फ्रेश ऑक्सिजनयुक्त पाण्याचा! इमारतीतल्या पाण्याच्या टाकीत वेगाने पाणी येत असतं, त्याचवेळी ते पंपाने गच्चीवरच्या टाकीत चढवलं जातं, या प्रक्रियेत पाण्यात नैसर्गिकपणे ऑक्सिजन विरघळला जातो. घरातला पाण्याचा नळ चालू असतांनाच जेव्हा गच्चीवरच्या टाकीतलं ऑक्सिजनयुक्त पाणी खाली यायला लागतं, तेव्हा त्या पाण्याला लगेच ऑक्सिजनचा फ्रेश वास येतो. त्या नुसत्या वासाने मनाला एकदम तरतरी येते आणि त्याचा तो सुवास मी मनामध्ये साठवून ठेवते.

Wednesday, June 26, 2013

घोळ - घोळाची रानभाजी

     खडवली स्टेशनजवळच्या उशीद गावात राहणारे एक परिचित काल घरी आले होते. त्यांनी येतांना आमच्यासाठी दोन प्रकारच्या रानभाज्यांच्या जुड्या आणल्या होत्या. ह्या रानभाज्या आम्ही याआधी कधी पाहिलेल्या नव्हत्या. रानभाज्यांची नावे विचारल्यावर त्या परिचित व्यक्तीने त्यांच्या स्थानिक भाषेतली रानभाज्यांची नावे सांगितली. ती नावंही आम्ही कधी ऐकलेली नव्हती. मग मी त्या नावांवरून इंटरनेटवर शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण तिथेही त्या भाज्यांची काही माहिती मिळाली नाही.

     त्या दोन भाज्यांपैकी एकीची पानं हिरव्या रंगाची आणि मोठ्या आकाराची होती आणि त्या पानांचे देठ जाड रसदार होते. तर दुसरी भाजी ही भाजीपेक्षा लाल काड्यांची जुडी असल्यासारखीच वाटत होती. त्या जुडीतल्या लांब लालसर हिरव्या रंगाच्या काडीसारख्या खोडांवर अधूनमधून बारिकशी हिरवी पानं डोकावत होती. ती काड्यांसारखी जुडी पाहून, ती नक्की एखादी भाजी आहे ना याबद्दलच शंका वाटत होती. या दोन्ही भाज्यांबद्दल बाकी काही माहिती नसल्याने त्या जुड्यांची भाजी करू नये असंच वाटत होतं. ज्यांना ह्याबद्दल माहिती असेल असं वाटलं होतं, त्यांना त्या भाज्या दाखवल्या, पण त्यांनाही काही सांगता आलं नाही.

     आज सकाळी शेजारच्या काकूंशी बोलतांना ह्या भाज्यांचा विषय निघाला, तेव्हा त्यांनी सांगितलं, की ’त्यांची सून त्या स्थानिक परिसरातच वाढलेली आहे आणि तिने पूर्वी शेतावर कामही केलेलं आहे.’ तिला भाज्यांबद्दल विचारलं, तेव्हा तिला मोठ्या आकाराची हिरवी पानं असलेल्या भाजीबद्दल काही सांगता आलं नाही, पण लाल काड्यांच्या जुडीसारख्या दिसणार्‍या भाजीला ’घोळाची भाजी’ म्हणतात असं तिने सांगितलं. मग तिने सांगितलेल्या पद्धतीने घोळाची भाजी केली. 

     त्या जुडीतल्या शेवटी उरलेल्या काही काड्यांचे मी मोबाइलने फोटो काढले. त्यामुळे फोटो फारसे व्यवस्थित आलेले नाहीत. पण ऑफिस टाईमसारखी पाने असलेल्या दुसर्‍याही एका भाजीला घोळाची भाजी म्हणूनच ओळखलं जात असल्याने गोंधळ नको म्हणून मुद्दाम या घोळाच्या भाजीच्या काड्यांचे फोटो देत आहे. फोटोतल्या काही देठांचा रंग हिरवा दिसत असला, तरी जुडीतले बरेचसे देठ लाल रंगाचेच होते.


  
घोळाची भाजी -

साहित्य - घोळाची भाजी, तेल, मोहोरी, जिरे, हिंग, हळद, लसूण, कांदा, तिखट, मीठ, मसाला, गूळ, दाण्याचं कूट.
  
कृती - घोळाचे कोवळे देठही भाजीत वापरतात, त्यामुळे कोवळ्या देठांचा खालचा भाग काढून टाकावा. निबर असलेले देठ काढून त्याची नुसतीच पाने घ्यावीत. घेतलेले कोवळे देठ व पाने नीट निवडून घेऊन, स्वच्छ धुवून घ्यावीत आणि चिरावी. कांदा चिरून घ्यावा. लसूण ठेचून घ्यावा. मग फोडणीसाठी तेल घेऊन त्यात मोहोरी, जिरे, हिंग, हळद, ठेचलेला लसूण आणि कांदा घालून ते नीट परतून घ्यावे. कांदा परतल्यावर त्यात चिरलेली भाजी घालून परतून घ्यावी. भाजीला वाफ आली की त्यात तिखट, मीठ, मसाला, गूळ घालून ते सारखं करून घ्यावं. भाजी तयार झाली की त्यात वरून दाण्याचं कूट घालून भाजी हलवून घ्यावी.

Friday, May 31, 2013

गव्हाचा चीक, कुरडया आणि भुसवड्या

     पूर्वी दरवर्षी उन्हाळ्यात गव्हाचा चीक केल्यावर कुरडयाही केल्या जात असत. आता कुरडया फारशा खाल्ल्या जात नाहीत, पण उन्हाळ्यात गव्हाचा चीक खाल्ल्याशिवाय समाधान होत नाही. त्यामुळे गव्हाचा चीक आताही केला जातोच. गव्हाचा चीक करणे हे एक मेहनतीचे आणि किचकट काम असते, शिवाय भिजवलेल्या गव्हाचा आंबूस वासही सहन करावा लागतो, पण तयार झालेला गव्हाचा चीक खाण्याचे जे समाधान मिळते ते ह्या सगळ्या कटकटींना पुरून उरणारे असते. ह्यावर्षी गव्हाचा चीक करायला उशीरच झाला, पण अगदी मे महिन्याच्या शेवटी का होईना पण गव्हाचा चीक झाला एकदाचा! ह्या सगळ्या मेहनतीला चित्रबद्ध आणि शब्दबद्ध करून इथे नोंद करून ठेवत आहे.

     गव्हाचा चीक करण्यासाठी चांगल्या प्रतीचा गहू घेऊन, तो निवडून तीन दिवसांकरता भिजत घालावा. गहू भिजत घालण्याकरता गव्हाच्या वरती येईल आणि गहू व्यवस्थित बुडतील इतपत पाणी त्यात घालावे. पाण्यावर तरंगणारे दाणे असतील तर ते काढून टाकावेत आणि भांडे झाकून ठेवावे. दुसर्‍या दिवशी गव्हातले पाणी बदलावे. तिसर्‍या दिवशीही गव्हातले पाणी बदलून टाकावे. चौथ्या दिवशी गव्हातले पाणी काढून टाकावे आणि ते गहू चाळणीत ओतून घेऊन स्वच्छ धुवून घ्यावेत. गव्हातले पाणी रोज बदलणे हे अगदी महत्त्वाचे आहे, पाणी बदलले नाही, तर गव्हाला आंबूस वास येतो.

     चाळणीत ओतण्यापूर्वी आणि पाणी काढून टाकण्यापूर्वी भिजत टाकलेल्या गव्हाचा, हा घेतलेला फोटो.

        
      स्वच्छ धुवून घेतलेले गहू चांगले टपोरे दिसतात. गव्हाचा दाणा दाबल्यावर त्यातून पांढरा चीक बाहेर येतो.


   
     या गव्हाच्या दाण्यांचे सत्त्व काढावे लागते. तेच मोठे मेहनतीचे काम असते. दोन व्यक्तींनी मिळून सत्त्व काढण्याचे काम केल्यास ते झटपट आणि व्यवस्थित होते. हे काम करतांना कपड्यांवर चीकाचे डाग उडण्याची शक्यता असते, हे लक्षात घेऊनच यावेळी घालण्याचे कपडे निवडावेत. पूर्वी पाट्या वरवंट्यावर गहू वाटून सत्त्व काढले जात असे, आता त्यासाठी मिक्सर वापरला जातो. (काहीजणांकडे सत्त्व काढण्यासाठी  यंत्रही असते.) त्याशिवाय सत्त्व काढण्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे पाणी, दोन चमचे, सत्त्व ज्यात काढायचे ते मोठे भांडे, भांड्यावर टाकण्यासाठी लागणारे स्वच्छ कॉटनचे कापड, कापड भांड्याच्या तोंडावर बांधण्यासाठी एक दोरी, कापडावर ठेवण्यासाठी अजून एक चाळणी, गव्हाचा कोंडा भिजत टाकण्याकरता पाण्याने अर्धे भरलेले एक भांडे, पिळलेला गव्हाचा कोंडा ठेवण्याकरता एक भांडे आणि तेल.

     आता कॉटनचे स्वच्छ कापड ओले करून घ्यावे, ते दुहेरी घडी घालून सत्त्व काढण्याच्या भांड्यावर घालावे, मग चाळणीला तेलाचा हात लावून ती त्या कापडावर ठेवावी. चाळणीतले सत्त्व आणि कोंडा हलवण्यासाठी जो चमचा वापरायचा आहे त्यालाही तेलाचा हात लावून घ्यावा. गव्हाचा कोंडा ज्या भांड्यात ठेवायचा आहे त्या भांड्यालाही तेलाचा हात लावून घ्यावा. गहू पिळणार असलेल्या व्यक्तीने हातालाही तेल लावून घ्यावे. मग दोरीने ओले कापड भांड्याच्या तोंडाला नीट बांधून घ्यावे. चाळणीही कापडावरच असू द्यावी.

  
     ही सगळी तयारी झाल्यावर चमच्याने गहू मिक्सरमध्ये घालावेत, ते गहू बुडतील इतपत पाणी त्यात घालावे आणि ते मिक्सरमधून वाटून घ्यावेत. मिक्सरमध्ये वाटलेले गहू असे दिसतात.

  
     मिक्सरमधून वाटलेले मिश्रण चाळणीत ओतून घ्यावे.

   
     चाळणी अर्ध्यापेक्षा जास्त भरेल इतके गहू वाटून चाळणीत टाकावेत. तोपर्यंत दुसर्‍या व्यक्तीने चाळणीत तेल लावलेला चमचा फिरवत ठेवावा म्हणजे चाळणीतले गव्हाचे सत्त्व खालच्या कापडावरती उतरत राहते. चाळणी अर्ध्यापेक्षा जास्त भरली, की ती एका व्यक्तीने किंचित वर उचलावी, चाळणीतले बरेचसे सत्त्व खाली कापडावर पडल्यावर, दुसर्‍या व्यक्तीने त्या कापडावरच्या सत्त्वातून हात फिरवत, चाळणीतून उतरलेला गव्हाचा चोथा उचलून हाताने कापडावर पिळून घ्यावा आणि पाण्याने भरलेल्या भांड्यात टाकावा. मग चाळणीत असलेला गव्हाचा चोथा हाताने उचलून घ्यावा आणि तो चाळणीत पिळून घ्यावा आणि पिळलेला चोथा पाण्याने भरलेल्या भांड्यात टाकावा. चाळणीतला सगळा चोथा पिळून घेतल्यानंतर, चाळणीतले सगळे सत्त्व कापडावर उतरू द्यावे. मग चाळणी बाजूला ठेवून पुन्हा एकदा कापडावर असलेला चोथा काढून, तो कापडावर पिळून घेऊन मग पाण्याने भरलेल्या भांड्यात टाकावा. कापडावरचे सगळे सत्त्व गाळले जाऊन खालच्या भांड्यात उतरले, की पुन्हा कापडावर चाळणी ठेवावी आणि गहू वाटून त्यात ओतावे.

     असे सगळे गहू वाटून, त्याचा चोथा पाण्यात टाकल्यावर, मग पाण्यातला चोथा हाताने उचलून घेऊन पाण्यात पिळावा आणि पिळलेला चोथा तेल लावलेल्या भांड्यात टाकावा. असा पाण्यातला सगळा चोथा पिळून घ्यावा. (जर चोथ्यात सत्त्व जास्त असेल, तर तो रिकाम्या भांड्यात न टाकता पुन्हा पाण्याने भरलेल्या दुसर्‍या भांड्यात टाकून पिळून घ्यावा. इथे गव्हाला जास्त सत्त्व राहिलेले नसल्याने चोथा पाण्यात एकदाच पिळला आहे. हे करतांना गव्हाचा चोथा मिक्सरमध्ये मात्र वाटू नये, नाहीतर गव्हातील ताम त्यात उतरून चीक तांबूस होतो.) आता हे चोथा पिळलेले पाणी हळूहळू सत्त्वाच्या भांड्यावरच्या बांधलेल्या कापडावर ओतून घ्यावे. सगळे सत्त्व भांड्यात गाळले गेले, की भांड्यावरचे कापड काढून घ्यावे आणि भांडे एखाद्या ताटलीने झाकून ठेवावे. काही तासांनी भांड्यातील गव्हाचे सत्त्व खाली बसते आणि पाणी वरती राहते. हे वरचे पाणी ओतून खाली राहिलेल्या गव्हाच्या सत्त्वापासून चीक बनवला जातो आणि कुरडया बनवल्या जातात.

     नुकत्याच गाळलेल्या सत्त्वाचा हा फोटो. ह्याला किमान चार ते पाच तास किंवा शक्य असेल तर दहाबारा तास तसेच ठेवायचे आहे.

   
     सत्त्वाला तसेच ठेवल्यानंतर मग आपण गव्हाच्या पिळलेल्या चोथ्याकडे म्हणजे कोंड्याकडे वळू. भांड्यात ठेवलेला गव्हाचा कोंडा असा दिसतो.


     हा गव्हाचा कोंडा टाकून न देता त्याच्या भुसवड्या किंवा खारवड्या बनवल्या जातात, ह्यालाच म्हणतात, "कोंड्याचा मांडा करणे!" भुसवड्या करण्यासाठी ह्या कोंड्यात भाजणीचे पीठ, किंचित तांदुळाचे पीठ, तीळ, जिरे, ओवा, हिंग, तिखट, मीठ आणि तेल घालावे आणि मळावे. हे मिश्रण मळतांना कोंड्याचा ओलावा कमी पडल्यास त्यात किंचित पाणी घालावे आणि हे मिश्रण मळून त्याच्या भुसवड्या थापाव्या. मग  एका ताटाला तेल लावून घ्यावे आणि त्यात तयार केलेल्या भुसवड्या ठेवाव्यात. नुकत्याच थापलेल्या भुसवड्या अशा दिसतात.

  
     भुसवड्या थापल्यावर त्या कडक उन्हात वाळवायला ठेवाव्यात. ह्या भुसवड्या पंधरावीस दिवस तरी उन्हात ठेवून अगदी कडकडीत वाळवाव्या. चांगल्या कडकडीत वाळवलेल्या भुसवड्या वर्षभरही टिकू शकतात, मात्र त्या ओल्या राहिल्या, तर त्याला कीड लागते. त्यामुळे भुसवड्या चांगल्या कडकडीत वाळवणं अगदी आवश्यक आहे. ह्या वाळवलेल्या भुसवड्या नंतर तेलात तळून खाल्ल्या जातात.

     आता आपण पुन्हा गव्हाच्या सत्त्वाकडे वळू. सत्त्व कापडातून गाळल्यानंतर बारा तासांनी पाणी काढून टाकण्यापूर्वी असे दिसते. सत्त्वाच्या वरती पाणी आणि त्या पाण्याच्या वरती फेस जमा झालेला असतो.

   
     मग त्या भांड्यातील फेसयुक्त पाणी हळूहळू ओतून टाकावे.

  
     शक्य होईल तितके पाणी ओतून टाकल्यावर पुन्हा त्या सत्वात थोडे पाणी घालावे आणि तास दोन तासांकरता ते झाकून ठेवावे. दोन तासांनी पुन्हा त्या सत्त्वावर फेसाचे पाणी जमा झालेले दिसेल. हा फेस आधीच्या ओतलेल्या फेसापेक्षा फिकट दिसतो.

  
     मग पुन्हा त्या भांड्यातले फेसयुक्त पाणी हळूहळू ओतून टाकावे.

   
     अशा प्रकारे वरचे पाणी काढून टाकल्यावर सत्त्व असे पांढरेशुभ्र दिसते.

   
     गव्हाच्या सत्त्वापासून कुरडया बनवण्यासाठी, सत्त्वात त्याच्या एवढेच पाणी घालावे आणि त्यातल्या सत्त्वाच्या गुठळ्या मोडून काढाव्यात. पाणी मिसळलेल्या सत्त्वाच्या दुप्पट पाणी घेऊन ते दुसर्‍या भांड्यात उकळायला ठेवावे. एका लोखंडी कढईत तुरटीचा छोटा खडा टाकून ती कढई तापवावी आणि तयार झालेल्या तुरटीच्या लाहीची पूड करून ठेवावी. मग कुरडईचा चीक करण्यासाठी घ्यायच्या कढईला तेल लावून घ्यावे आणि त्या कढईत उकळत ठेवलेल्या पाण्यातले निम्मे पाणी घालून घ्यावे आणि मग ती कढई आंचेवर ठेवावी. मग त्या कढईतल्या पाण्यात मीठ घालावे आणि तुरटीच्या लाहीची किंचित पूड घालावी. मग त्या उकळत्या पाण्यात एकसारखे केलेले सत्त्वाचे मिश्रण हळूहळू टाकावे व त्यात गुठळ्या होऊ नये म्हणून चमच्याने सतत ढवळत राहावे आणि लागेल तसे पाणीही वरून घालावे. गुठळ्या मोडलेले हे मिश्रण हळूहळू घट्ट होऊ लागेल, त्याच्यावर झाकण ठेवून चांगली वाफ आणावी. पांढरी वाफ यायला लागल्यावर कुरडईचा चीक तयार झाला असे समजावे. मग सोर्‍याला शेवेची चकती लावून, आतून तेल लावून, त्यात हा चीक भरायचा आणि उन्हात पसरवलेल्या स्वच्छ कोरड्या कॉटनच्या कापडावर कुरडया घालायच्या. कुरडया सकाळी लवकर कराव्यात, म्हणजे जास्त वेळ ऊन मिळते. कुरडया केल्या नसल्याने ह्या कृतीचे फोटो नाहीत.

     खाण्यासाठी गव्हाचा चीक करायचा असल्यास लागेल तेवढे सत्त्व एका भांड्यात घ्यावे. त्या सत्त्वात त्याच्या एवढेच पाणी घालून सत्त्व ढवळून सारखे करून घ्यावे. पाणी घातलेले हे सत्त्व जितके असेल त्याच्या दुप्पट पाणी एका भांड्यात घेऊन त्यात ते पाणी उकळत ठेवावे. मग चीक तयार करण्यासाठी एक कढई घेऊन तिला तेलाचा हात लावून घ्यावा. ह्या कढईत उकळलेल्या पाण्यातले निम्मे पाणी टाकावे आणि मगच ही कढई आंचेवर ठेवावी. कढईतल्या पाण्यात हिंग, जिरे आणि मीठ घालावे.

  
     मग त्यात हळूहळू गव्हाचे सारखे केलेले सत्त्व ओतावे आणि ते चमच्याने सतत ढवळत राहावे आणि त्यातल्या गुठळ्या मोडून काढाव्यात. या मिश्रणात पाणी कमी पडत आहे असे वाटले तर वरून त्यात पाणी घालून त्यातल्या गुठळ्या मोडून काढाव्यात.


   
     हे मिश्रण घट्ट होऊ लागल्यावर त्यावर झाकण ठेवून वाफ आणावी.

   
     पांढरी वाफ यायला लागल्यावर गव्हाचा चीक खाण्यासाठी तयार झाला असे समजावे. तयार झालेला चीक चमच्याने उचलला की त्यातून तो एकसंधपणे खाली पडतो.

  
     चीक खायला देतांना डिशमध्ये चीक काढून, त्यावर कच्चे तेल घालून तो गरमगरम खाण्यास द्यावा.

  
     एक किलो गहू भिजत टाकल्यावर त्याच्यातून बारातेराजण चीक खाऊ शकतील इतके सत्त्व निघाले. गव्हातून निघणार्‍या सत्त्वाचे प्रमाण हे जो गहू वापरला असेल, त्याप्रमाणे कमीजास्त होऊ शकते.

     तयार केलेले गव्हाचे सत्त्व लगेच वापरावे. ओले सत्त्व वरून थोडे पाणी घालून फ्रीजमध्ये ठेवता येते, पण ते जास्तीत जास्त दोनतीन दिवसच टिकू शकते. हेच सत्त्व त्यातले वरचे पाणी ओतून देऊन, ताटात ठेवून, उन्हात वाळवता येते. हे सत्त्व वाळवूनत्याची वाळलेली पूड काचेच्या बाटलीत / डब्यात भरून ठेवावी. हे गव्हाचे वाळवलेले सत्त्व नंतर कधीही लागेल तेव्हा पाणी घालून गव्हाचे ओले सत्त्व म्हणून चीक बनवण्याकरता वापरता येते.

Saturday, May 18, 2013

गोष्ट राजूची (बालकथा)


     राजू खूपच बारीक मुलगा होता. सगळे त्याला काडीपहिलवान म्हणून चिडवत असत. त्याला नेहमी वाटायचं की चांगलं जाडंजुडं व्हावं. त्याकरता तो रोज डॉक्टरांनी दिलेल्या व्हिटॅमिन्सच्या गोळ्या घ्यायचा. गोळ्यांबरोबर पोळीभाजी पण खायला हवी. असं डॉक्टर सांगायचे. राजूला भाज्या खायला अजिबात आवडत नव्हतं. त्यामुळे गोळ्या घेऊनही राजू बारीकच राहिला होता.

     आज तो शाळेत गेला असताना जाड्याजुड्या चिंटूने त्याला काडीपहिलवान म्हणून चिडवलं होतं आणि एक जोरदार ठोसा पण ठेवून दिला होता. त्या ठोशाने त्याचं सगळं अंग ठणकत होतं. पण बारीकसा राजू चिंटूला काहीच करू शकला नव्हता. शाळेतून घरी आल्यावर चिंटूला कशी अद्दल घडवावी याचाच तो विचार करत होता.

     जेवण झाल्यावर त्याला दुपारच्या वेळी झोप यायला लागली. तेवढ्यात आई त्याला म्हणाली, "राजू, हे शंभर रुपये ठेव. थोड्या वेळाने आपला दूधवाला येईल त्याला दे. मी तुझ्याकरता चिवडा करुन ठेवते. मला माझ्या कामातून उठवू नकोस." राजूने पैसे खिशात ठेवले आणि तो झोपला.

     ठक्‌ठक्‌, ठक्‌ठक्‌ दाराची कडी वाजत होती. राजू उठला. दूधवाला आला असणार म्हणून त्यानं दार उघडलं. दारात कोणीतरी वेगळाच माणूस उभा होता. तो राजूला म्हणाला, मी मेडिसन कंपनीमधून आलोय. आमच्या कंपनीने काही गोळ्या तयार केल्या आहेत. लाल बाटलीतल्या गोळ्या घेतल्यावर माणूस उंच आणि जाडा होतो. निळ्या बाटलीतल्या गोळ्या घेतल्यावर माणूस बुटका आणि बारीक होतो. तुझ्यासारख्या मुलाला या गोळ्या घ्यायलाच हव्यात.

     काय? खरंच का या गोळ्या घेतल्यावर माणूस जाड होतो आणि तेही पोळीभाजी खाल्ल्याशिवाय? राजूने आश्चर्याने विचारलं. होय. एक वर्षाची गॅरंटी आहे. मग मला ह्या गोळ्या घेतल्याच पाहिजेत. पण आई रागवेल. ह्याची किंमत पण जास्त असेल. राजू म्हणाला. तुझ्यासारख्या मुलाने ह्या गोळ्या घेतल्या तर आई अजिबात रागवणार नाही. दोन्ही बाटल्यांची किंमत फक्त दहा रुपये आणि चुकून एखाद्या बाटलीतला गोळ्यांचा डोस जास्त झाला तर दुसर्‍या बाटलीतल्या गोळ्या खायच्या. त्या माणसानं सांगितलं.

     राजूने उत्सुकतेनं दूधवाल्याच्या पैशांतून दहा रु. देऊन त्या बाटल्या विकत घेतल्या. आईला अचानक आश्चर्यचकित करायचं ठरवून त्याने लाल बाटलीतल्या पाच-सात गोळ्या भराभर खाऊन टाकल्या. आणि हे काय? एकदम त्याचं डोकं ठणकन्‌ कशाला तरी आपटलं. त्याने इकडेतिकडे पाहिलं, त्याचं डोकं छताला टेकलं होतं. त्याचा आकार अजूनही वाढत होता. राजू आता त्या खोलीत मावत नसल्याने त्याच्या धक्क्याने घराची एक भिंत कोसळून खाली पडली. तो आवाज ऐकून राजूची आई धावत बाहेर आली. राजूला बघून, भूत, भूऽऽत धावा, वाचवा, असं ओरडायला लागली.

     अगं आई, मी आहे तुझा राजू. असं त्याने सांगायचा प्रयत्न केल्यावर भूत बोलतंय हे बघून तिला चक्कर आली आणि ती सोफ्यावर कोसळली. तेवढ्यात शेजारच्या काकू आणि दोघंतिघंजण आपल्या घराकडे येत आहेत हे बघून राजू तिथून बाहेर पडला. त्याला बघून सगळे घाबरले. राक्षस समजून काही लोक त्याला दगड मारायला लागले. ते दगड राजूला फुलासारखे वाटत होते. आता बघतो त्या चिंटूला. शाळेत मला मारतो काय? पहा आता. असं म्हणून राजू चिंटूच्या घराच्या दिशेने चालायला लागला.

     चिंटू गॅलरीत चित्र काढत बसला होता. राजू त्याच्या घराजवळ आला. त्याने आपले लांब हात गॅलरीत घालून चिंटूला उचललं. चिंटू घाबरला, सोड मला. कोण आहेस तू? मला खाऊ नको. असं ओरडायला लागला. यापुढे शाळेतल्या राजूला त्रास देशील? मारशील त्याला? राजूने रागाने विचारलं. नाही, नाही, सोड मला. चुकलं माझं. चिंटू त्याला विनवायला लागला. राजूने चिंटूला अलगद चेंडूसारखं उडवलं. तो त्याला झेलणार इतक्यात एका हत्तीने चिंटूला सोंडेत पकडलं. तो गावात आलेल्या सर्कसचा हत्ती होता. राजूने चिंटूला तिथून उचलून त्याच्या घराच्या गच्चीवर ठेवून दिलं.

     त्या हत्तीने समोरच्या एका दुकानातून भलं मोठं आईस्क्रिमचं भांडं उचललं आणि राजूच्या हातात दिलं. आईस्क्रिम खात खात राजू हत्तीवर बसला आणि घरी यायला निघाला. उंदरावर बसलेल्या गणपतीसारखा तो दिसत होता. घरासमोर आल्यावर त्याच्या लक्षात आलं की, आई त्याला आता ओळखणार नाही. पुन्हा पूर्वीसारखं व्हायला हवं. बागेत उभं राहून त्याने निळ्या बाटलीतल्या पाच-सात गोळ्या काढल्या आणि पटकन खाऊन टाकल्या. पण डोस जरा जास्तच झाला होता. आता राजू एकदम छोटा झाला होता. इतका छोटा की त्याला बागेतली गवताची पाती मोठ्या झाडांसारखी वाटत होती. त्याचं घर तिथून खूप दूर होतं. एखाद्या भल्यामोठ्या पर्वतासारखं ते वाटत होतं. राजूला आता खूप भीती वाटू लागली. त्याच्या हातातल्या बाटल्या पण खूप मोठ्या झाल्या होत्या. तो त्यांच्याखाली चेंगरलाच असता. त्याने कशाबशा त्या बाटल्या त्याच्यापासून दूर जमिनीला टेकवल्या. आता त्या बाटल्यांमधल्या गोळ्यांपर्यंत तो कधीच पोचू शकणार नव्हता आणि नेहमीसारखा होऊ शकणार नव्हता.

     आईला न सांगता त्या गोळ्या विकत घेतल्याचा राजूला आता पश्चाताप होत होता. एवढ्यात त्याला एक जेटविमान आणि एक हेलिकॉप्टर त्याच्या दिशेने येताना दिसले. ते जवळ आल्यावर त्याला कळलं की जेटविमान म्हणजे एक फुलपाखरु आणि हेलिकॉप्टर म्हणजे एक मधमाशी होती. मला जरा मदत कराल का? राजूने त्यांना विचारलं. कोण बरं हा प्राणी? पूर्वी कधी पाहिला नव्हता इथे. मधमाशी फुलपाखराला म्हणाली. तिने सगळ्या प्राण्यांना हा नवीन प्राणी बघायला बोलावले. तिथे उंदीर, झुरळ, सरडा, पाल, मुंग्या, माशा, फुलपाखरं आणि वेगवेगळे पक्षी जमा झाले. ते सगळे राजूपेक्षा मोठे आणि भयानक दिसत होते. ह्या नवीन प्राण्याला निरखून पाहत होते.

     मी काही प्राणी नाही. मी त्या समोरच्या घरातला राजू आहे. राजूने सांगितलं. हाच नेहमी आम्हांला पकडतो. फुलपाखरु म्हणालं. हाच नेहमी आम्हांला दगड मारतो. पक्षी म्हणाले. मारा त्याला. सगळे ओरडले. मला मारु नका. मी चुकलो. पुन्हा असं करणार नाही. राजू ओरडला. पण सगळेजण त्याला मारायला येतच होते. तो गोळ्यांच्या बाटल्यांकडे धावला. पण त्याचे हात गोळ्यांपर्यंत पोचत नव्हते. वाचवा तो जोरात ओरडला.

     काय झालं राजू? स्वप्न पडलं की काय? आई त्याला विचारत होती. तो घरातच होता. शंभर रुपये त्याच्या खिशात व्यवस्थित होते. म्हणजे हे सगळं स्वप्न होतं तर! आता यापुढे मी कधीही नुसत्या गोळ्या खाणार नाही. त्याऐवजी सगळ्या भाज्या खाईन. रोजचं सगळं जेवण जेवेन. राजूने मनाशी निश्चय केला.

नोंद - (ढिश्यांव ढिश्यांव कल्पनारम्य विशेषांक १९९८ मध्ये प्रकाशित झालेली माझी ही बालकथा.)