--000-- Important statement - Some of those who are calling themselves as my so-called friends on the basis of acquaintance which has happened in a short duration of past time, behaved with me in past in a manner which was crossing over the limits of friendship in that time, vexatious, objectionable even after the frequent admonitions given by me, so I do not consider them as my friends who crosses over the limits of friendship. So I am not duty-bound to publish or answer their comments which are given on any of my blogs, or to answer their email, or to accept their friend invite on any of the social website like facebook, or to answer their messages sent through the comment form on blog. So please take a kind note that if it will be found out that the abovementioned persons tried to contact with me directly or indirectly by any types of means mentioned before or through any other person by incuring him / her inbetween or by maknig fake profile through it or by any other means, through the blog or through any other medium or if it will be found out that they have done any type of act which is vexatious for me, then proper action will be taken on it. Also by all this incidence the decision is taken that the right of publishing all the suspicious seeming comments given on the blog and the right of answering any of the suspicious seeming messages coming through the comment form is reserved, readers please take a kind note of it. ----- 00000 ----- महत्त्वाचे निवेदन - भूतकाळातील थोडक्या कालावधीकरता झालेल्या माझ्या ओळखीच्या आधारावर स्वतःला माझे तथाकथित मित्र म्हणवून घेणार्‍या काही जणांनी पूर्वी मी वारंवार समज दिल्यानंतरही, माझ्याशी तत्कालीन पद्धतीच्या मैत्रीच्या मर्यादा ओलांडणारे, मनस्ताप देणारे, आक्षेपार्ह वर्तन केले, त्यामुळे अशा मैत्रीच्या मर्यादा ओलांडणार्‍यांना मी माझे मित्र मानत नाही. त्यामुळे माझ्या कोणत्याही ब्लॉगवर आलेल्या त्यांच्या कॉमेंट्स प्रकाशित करणे किंवा त्यांना उत्तर देणे, किंवा त्यांच्या इमेलला उत्तर देणे, किंवा त्यांच्या फेसबुकसारख्या कोणत्याही सोशल वेबसाईटवर आलेल्या फ्रेंड इन्व्हाईटला ऍक्सेप्ट करणे, किंवा त्यांनी ब्लॉगवरील कॉमेंट फॉर्मद्वारा पाठवलेल्या निरोपाला उत्तर देणे यासाठी मी बांधील नाही. त्यामुळे उपरोल्लेखित व्यक्तिंनी आधी उल्लेख केलेल्या कोणत्याही प्रकारे किंवा दुसर्‍या एखाद्या व्यक्तीला मध्ये घालून तिच्याद्वारे किंवा बनावट प्रोफाईल तयार करून त्याद्वारे किंवा इतर कोणत्याही प्रकारे, ब्लॉग किंवा इतर कोणत्याही माध्यमातून माझ्याशी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष प्रकारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याचे आढळल्यास किंवा मला मनस्ताप होईल अशा प्रकारचे कोणतेही कृत्य त्यांनी केल्याचे आढळल्यास, त्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी. तसेच या सर्व प्रकारामुळे ब्लॉगवर आलेल्या संशयास्पद वाटणार्‍या सर्व कॉमेंट्स प्रकाशित करण्याचे आणि कॉमेंट्स फॉर्मद्वारे आलेल्या संशयास्पद वाटणार्‍या कोणत्याही निरोपाला उत्तर देण्याचे अधिकार राखून ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी. --000--

Friday, December 21, 2012

सदाबहार गुलाबी जास्वंद

     मागच्या वर्षी एप्रिल महिन्यात भर दुपारच्या वेळी नगर जिल्ह्यातल्या एका बागायती शेताला भेट देण्याचा योग आला. शेतात चिकूची झाडे लावली होती आणि झाडांच्या मधल्या मोकळ्या जागेत गहू लावला होता. गहू कापणीला आल्याने त्याची कापणी चालू होती. पण भर दुपारची वेळ असल्याने तिथे उभे राहून ते दृश्य पाहण्यात अजिबात मौज वाटत नव्हती. उन्हाने जीवाची अशी काहिली होत असतांनाच अचानक शेतातल्या पायवाटेच्या टोकाकडे लक्ष गेले, तिथे एक जास्वंदीचे झाड फुलांनी लगडून गेले होते, त्याची गुलाबी फुले वार्‍याने हलत होती. ते नेत्रसुखद दृश्य पाहून सारा शीण दूर पळाला. 

   
     ते जास्वंदीचे झाड माझ्या मनात अगदी भरले होते, इतके की तिथून निघतांना मी त्या झाडाच्या फांद्या घरी लावण्यासाठी मागून घेतल्या. शेतमालकांनी माळ्याला हाक मारल्यावर त्यानेही तत्परतेने झाडाच्या फांद्या कापून त्यांचा जुडगा बांधून दिला. या फांद्यांबरोबर त्याने मिरची जास्वंदीच्याही काही फांद्या दिल्या होत्या. घरी पोहोचल्यावर दुसर्‍या दिवशी मी त्या फांद्या दिसेल त्या रिकाम्या कुंडीत रोवून दिल्या.

     गॅलरीच्या बॉक्स ग्रीलमध्ये मी माझ्या झाडांच्या कुंड्या ठेवलेल्या आहेत. पूर्वी गॅलरीच्या अरूंद बाजूकडून घरात भरपूर ऊन येत असे, तेव्हा तिथे गुलाब लावले होते. पण नंतर आजूबाजूला झालेल्या बांधकामामुळे तिथून येणारे ऊन अगदीच कमी झाले. आता फक्त गॅलरीच्या रूंद बाजूकडून सकाळी आठ ते नऊ या वेळात थोडेफार ऊन येते आणि दुपारी साडेतीन ते पाच या वेळात रस्त्यापलिकडच्या बाजूच्या समोरच्या इमारतीच्या काचांवरून परावर्तित होऊन थोडा सूर्यप्रकाश झाडांवर पडतो. इतक्या कमी सूर्यप्रकाशामुळे आणि गॅलरीची रुंद बाजू अगदी रस्त्यासमोर येत असल्याने तिथल्या कुंड्यांत मी फक्त शोभेची झाडेच लावलेली होती. आता तिथल्याच काही रिकाम्या कुंड्यांत मी या जास्वंदीच्या फांद्या लावल्या होत्या.

     इतके कमी ऊन मिळत असूनही गुलाबी जास्वंदीच्या दोन फांद्या आणि मिरची जास्वंदीच्या (न उमलणारी लाल कळीची जास्वंद) तीन फांद्या छान रुजल्या, वाढल्या आणि बघता बघता ग्रीलच्या बाहेरही गेल्या. आता त्यांना ग्रीलच्या आतही आणि बाहेरही कळ्या येतात. गुलाबी जास्वंद आता छान बहरली आहे, या सप्टेंबर महिन्यापासून दर आठवड्याला दोनदा किंवा तीनदा तरी तिची फुले मितच आहे. फक्त पावणेदोन वर्षांत गुलाबी जास्वंदीचे खोड पाच फुटांपेक्षाही जास्त उंच वाढले आहे. आता तर इमारतीच्या कुंपणापलिकडे असलेल्या उंच फुटपाथवरूनही तिची फुले सहज काढता येतात. सहसा मी कळी उमलण्याच्या आदल्या रात्रीच ती काढून घेत असल्याने लोकांचे या झाडाकडे फारसे लक्ष गेले नव्हते. पण समोरच्या इमारतीतली एक मुलगी पहाटेच्या वेळी येऊन या झाडावरच्या कच्च्या कळ्याही तोडायला लागली, त्यामुळे हल्ली पहाटेच्या वेळी या झाडाकडे नीट लक्ष ठेवण्याचे एक काम मात्र वाढले आहे.

  
     असो. या कमी उन्हातही छान वाढणार्‍या गुलाबी जास्वंदीचा परिचय करून देण्यासाठी हा लेख मुद्दाम लिहित आहे. ह्या जास्वंदीचे शास्त्रीय नाव Hibiscus rosa-sinensis cultivar Albo Lacinatus असे असून, ही जास्वंद weeping Hibiscus / pink butterfly Hibiscus या नावानेही ओळखली जाते. पांढरी जास्वंद (Hibiscus arnottianus subsp. immaculatus) आणि कातरलेल्या पाकळ्यांची लाल जास्वंद (Hibiscus schizopetalus) या दोन जास्वंदींच्या संकरातून ही संकरीत गुलाबी जास्वंद तयार केली गेली आहे. 

     ही गुलाबी जास्वंद सदाबहार (वर्षभर फुलणारी) असून भरपूर ऊन्हात वाढतेच, पण सावलीयुक्त प्रकाशातही वाढते. ही जास्वंद कुंडीत लावता येते आणि ही १५ ते २० फुटांपर्यंत उंच वाढते. ह्या जास्वंदीला नियमितपणे कुंडीतील माती ओली राहील इतपत पाणी घातलेले पुरते. त्यापेक्षा जास्त पाणी घालू नये. ही जास्वंद भराभर वाढते आणि कठीण परिस्थितीतही तग धरून राहते. माझ्याकडच्या जास्वंदीवर मिलीबग पडले होते, पण मिलीबगने व्याप्त झालेला भाग नियमितपणे काढून टाकल्यानंतरही झाडाने चांगला तग धरला. ह्याच गुणधर्मामुळे ह्या झाडावर दुसर्‍या जास्वंदीच्या प्रकारांचे कलम केले जाते. त्यामुळे कमी प्रकाशातही फुलणारी झाडे लावायची असतील, तर त्यासाठी ही सदाबहार गुलाबी जास्वंद हा एक चांगला पर्याय आहे.

Saturday, June 16, 2012

पाण्याच्या थेंबांचे फोटो / Photos of water droplets


पाण्याच्या थेंबांचे फोटो इथे पोस्ट करत आहे. मूळ फोटो क्रॉप करून इथे पोस्ट केले आहेत.

Posting photos of water droplets here. Original photos are cropped & posted here.  
*********
***

Friday, April 13, 2012

Black Grapes with Coconut Bars


  
Ingredients -
Grated Fresh Coconut - 4 Bowls (bowl of size 150 ml.)
Juice of Black Grapes with it's skin - 2 Bowls
Milk Powder - 2 Bowls
Sugar - 3 Bowls
Powdered Sugar - 2 Tablespoon (make using mixer)
Ghee / Butter - for greasing steel plate / tray
For Garnishing - Almonds -  5-6 Almonds scraped or sliced

Method - 
1. Slightly grind the shreads of fresh coconut in mixer or grind the small pieces of fresh coconut in mixer.
2. Wash the black grapes and put it in the mixer without removing thier skin. Make 2 bowls of juice of grapes in the mixer. 
3. In a cooking pan add grated fresh coconut, juice of black grapes, milk powder, sugar and heat it on a medium flame. Stir this mixture with a long handled spoon. At start this indigo coloured juicy mixture becomes watery and starts boiling and when it becomes thick it's colour changes to reddish violet colour.
4. When this mixture becomes slightly thick and started to separate from the pan, that time add the powdered sugar in it and stir it, so that the mixture will become thick in short time.
5. When the mixture becomes more thick, that time smear the ghee / butter on the steel plate / tray.
6. When the mixture becomes sufficiently thick, switch off the flame, pour the mixture in the tray and spread it evenly.
7. Put Almond scrapes or slices on this mixture and with ghee / butter smeared hand press it slightly.
8. After 25 - 30 minutes when the mixture starts to cool down, mark it with knife for making pieces.
9. Separate and remove the pieces as bars only after the mixture completely cools down.
10. From inside these bars are having slight stickiness as that of black raisins, so keep these bars in a container, cover it with lid and keep that container in refrigerator for 3 - 4 hours. The bars will be ready for eating only when it will come at normal temperature after removing from refrigerator.

Note - Do not always keep these bars in refrigerator. Cold bars just removed from refrigerator are somewhat hardy for eating. The taste of these bars increases when it is eaten at it's normal temperature stage.
    

काळ्या द्राक्षांची नारळी वडी


  
साहित्य -
ओल्या नारळाचा चव - ४ वाट्या भरून (१५० मि.ली.ची वाटी)
काळ्या द्राक्षांचा (सालीसकट) रस - २ वाट्या
मिल्क पावडर - २ वाट्या
साखर - ३ वाट्या
पिठी साखर - २ टेबलस्पून
तूप - ताटाला लावण्यासाठी
सजावटीसाठी - बदाम - ५/६ बदाम किसलेले किंवा बारीक काप केलेले

कृती - 
१. नारळ खवून त्याचा चव मिक्सरमधून जरा बारीक करून घ्यावा किंवा नारळाचे लहान तुकडे करून ते मिक्सरमधून बारीक करून घ्यावे.
२. काळी द्राक्षे स्वच्छ धुवून घ्यावी आणि ती सालीसकटच मिक्सरमध्ये टाकावी. मिक्सरमधून त्यांचा २ वाट्या रस करून घ्यावा.
३. एक कढईत नारळाचा चव, काळ्या द्राक्षांचा रस, मिल्क पावडर आणि साखर हे साहित्य एकत्र करून घ्यावे आणि मध्यम आचेवर गरम करावे. ह्या मिश्रणाला लांब दांडीच्या चमच्याने हलवत राहावे. सुरूवातीला ह्या रसदार मिश्रणाला पाणी सुटून निळसर जांभळ्या रंगाचे हे मिश्रण उकळायला लागते व हळूहळू ते आटायला लागल्यावर त्याचा रंग तांबडट जांभळा होतो.
४. हे मिश्रण जरा घट्ट होऊन कढईच्या पृष्ठभागापासून सुटे व्हायला लागले, की त्यात पिठीसाखर टाकावी आणि मिश्रण हलवत राहावे, म्हणजे ते लवकर आळते (घट्ट होते).
५. मिश्रण अजून घट्ट व्हायला लागले, की एका ताटाला तूप लावून घ्यावे.
६. मिश्रण पुरेसे घट्ट झाले झाले, की आच बंद करून कढईतले मिश्रण तूप लावलेल्या ताटात काढून घेऊन ताटात सारखे पसरून घ्यावे.
७. ह्या मिश्रणावर किसलेल्या बदामाची पूड किंवा बदामाचे काप टाकून ते तूप लावलेल्या हाताने मिश्रणावर अलगद थापून घ्यावे.
८. २५ - ३० मिनिटांनी मिश्रण जरा थंड व्हायला लागले, की सुरीने वड्यांचे काप पाडून घ्यावेत. 
९. मिश्रण पूर्ण थंड झाले, की मगच वड्या वेगळ्या करून काढाव्यात.
१०. ह्या वड्यांना आतून मनुकांच्या गरासारखा किंचित चिकटपणा असतो, म्हणून ह्या वड्या एका डब्यात घालून, त्या डब्याचे झाकण लावून तो डबा ३-४ तास फ्रिजमध्ये ठेवून द्यावा. डबा फ्रीजमधून बाहेर काढल्यावर वड्या सामान्य तापमानाला आल्या की खाण्यासाठी तयार होतात.

टीप - ह्या वड्या नेहमीसाठी फ्रीजमध्ये ठेवू नयेत. फ्रीजमधून काढलेल्या थंड वड्या लगेच खाल्या तर त्या चिवट लागतात. ह्या वड्या सामान्य तापमानाला असतांना खाल्या तर त्यांचा स्वाद अधिक वाढतो. 

नोंद - "मेजवानी २०१२" - मिष्ठान्ने विशेषांकांत प्रकाशित.

Wednesday, March 21, 2012

निष्पर्ण वृक्षाचे प्रेमगीत


  
सदातृषेच्या वैशाखातील
प्रीतीचा हा अग्नी फुलला
प्रेयस माझे मृत्युदेवी
हृदय अर्पिले तुझ्याच चरणी
चंचलतेचा पर्णपिसारा
हा मोहक झटकून सारा
उभा ठाकलो तुझिया दारी
उगा कशाला आता प्रतिक्षा
देई त्वरेने आता मजला
तुझे ते गूढ आलिंगनदान!

*********
***