--000-- Important statement - Some of those who are calling themselves as my so-called friends on the basis of acquaintance which has happened in a short duration of past time, behaved with me in past in a manner which was crossing over the limits of friendship in that time, vexatious, objectionable even after the frequent admonitions given by me, so I do not consider them as my friends who crosses over the limits of friendship. So I am not duty-bound to publish or answer their comments which are given on any of my blogs, or to answer their email, or to accept their friend invite on any of the social website like facebook, or to answer their messages sent through the comment form on blog. So please take a kind note that if it will be found out that the abovementioned persons tried to contact with me directly or indirectly by any types of means mentioned before or through any other person by incuring him / her inbetween or by maknig fake profile through it or by any other means, through the blog or through any other medium or if it will be found out that they have done any type of act which is vexatious for me, then proper action will be taken on it. Also by all this incidence the decision is taken that the right of publishing all the suspicious seeming comments given on the blog and the right of answering any of the suspicious seeming messages coming through the comment form is reserved, readers please take a kind note of it. ----- 00000 ----- महत्त्वाचे निवेदन - भूतकाळातील थोडक्या कालावधीकरता झालेल्या माझ्या ओळखीच्या आधारावर स्वतःला माझे तथाकथित मित्र म्हणवून घेणार्‍या काही जणांनी पूर्वी मी वारंवार समज दिल्यानंतरही, माझ्याशी तत्कालीन पद्धतीच्या मैत्रीच्या मर्यादा ओलांडणारे, मनस्ताप देणारे, आक्षेपार्ह वर्तन केले, त्यामुळे अशा मैत्रीच्या मर्यादा ओलांडणार्‍यांना मी माझे मित्र मानत नाही. त्यामुळे माझ्या कोणत्याही ब्लॉगवर आलेल्या त्यांच्या कॉमेंट्स प्रकाशित करणे किंवा त्यांना उत्तर देणे, किंवा त्यांच्या इमेलला उत्तर देणे, किंवा त्यांच्या फेसबुकसारख्या कोणत्याही सोशल वेबसाईटवर आलेल्या फ्रेंड इन्व्हाईटला ऍक्सेप्ट करणे, किंवा त्यांनी ब्लॉगवरील कॉमेंट फॉर्मद्वारा पाठवलेल्या निरोपाला उत्तर देणे यासाठी मी बांधील नाही. त्यामुळे उपरोल्लेखित व्यक्तिंनी आधी उल्लेख केलेल्या कोणत्याही प्रकारे किंवा दुसर्‍या एखाद्या व्यक्तीला मध्ये घालून तिच्याद्वारे किंवा बनावट प्रोफाईल तयार करून त्याद्वारे किंवा इतर कोणत्याही प्रकारे, ब्लॉग किंवा इतर कोणत्याही माध्यमातून माझ्याशी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष प्रकारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याचे आढळल्यास किंवा मला मनस्ताप होईल अशा प्रकारचे कोणतेही कृत्य त्यांनी केल्याचे आढळल्यास, त्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी. तसेच या सर्व प्रकारामुळे ब्लॉगवर आलेल्या संशयास्पद वाटणार्‍या सर्व कॉमेंट्स प्रकाशित करण्याचे आणि कॉमेंट्स फॉर्मद्वारे आलेल्या संशयास्पद वाटणार्‍या कोणत्याही निरोपाला उत्तर देण्याचे अधिकार राखून ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी. --000--

Saturday, April 23, 2011

Give water to birds, animals & plants in this summer.

Every year in India there is hot summer in month of April - May. Due to this summer not only humans but also birds & animals become agitated by the thirst and die due to sunstroke when they don't get water or when they drink contaminated water. The plants who just started their growth get burned due to lack of water, also big plants withered due to scarcity of water.

In summer it becomes difficult for birds to get shelter in shade of trees due to decreased number of trees. Bird's feathers are heat resistant and heat produced in high amount in their body because their movement is much more than any other animal. There are no sweat glands in birds to control body tempetrature, so birds do not sweat. At such time birds exhale the excess heat in their body through respiration. But due to this, their heart beat gets increased, excess energy in their body is get consumed.
 
  
There are many wandering animals in one's own nearby surroundings. These animals also become perplexed in summer if they don't get shelter in shade. Animals do sweat, but they also get distressed while making body cool, if they have thick hair on their body. Some animals seems to roll in mud to prevent themselves from heat. Most of the animals exhale the excess heat in their body through respiration. But due to this their heart beat gets increased, excess energy in their body is get consumed.
 
 
In this way there is a possibility of birds & animals dyeing due to sunstroke if their excess body energy get consumed and they don't get water for drinking. Sometimes shortage of Glucose, C Vitamin is caused in their body. Many times birds & animals agitated by thirst, drink contaminated water to quench their thirst and die due to the contaminated water. 
 
Water should be kept for birds & animals in the surroundings so that they don't die due to lack of water. Water should be kept in clean earthen or plastic pot. The pot for drinking water must not be too deep or too shallow. Water for birds should be kept in terrace, balcony or in a yard. Water for animals should be kept in the open place outside house, in the corner of foothpath or in the nearby ground or below any tree. If possible then the food for birds or animals should be kept there. Birds like crow eat only soft food by their beak, they eat their food by dipping it in water, because of it water becomes dirty. Dogs spatter water by their feet and make it dirty. That's why it is necessary to clean the pot which is kept for drinking water of birds and animals, by removing stale water before filling it with fresh water.
 
 
Also water must be given to plants, so that plants will survive. The more the plants in the surroundings will survive, the more cool it will become. Birds & animals get shelter in plant's shade and get food and nourished by it. Not only heat in the atmosphere get reduced by the vapours exhaled by the leaves of plants, but also dust in air get reduced. The lives of birds, animals and humans becomes endurable, when one plant survives on which they are depended. 
 
That's why make a resolution and give water to birds, animals & plants in this summer.

या उन्हाळ्यात पक्षी, प्राणी आणि झाडांनाही पाणी द्या.

भारतात दरवर्षी एप्रिल-मे महिन्यात कडक उन्हाळा असतो. या उन्हाळ्यामुळे फक्त माणसेच नव्हे, तर पक्षी, प्राणी सुद्धा तहानेने व्याकूळ होतात आणि पाणी न मिळाल्यास उष्माघातामुळे किंवा दूषित पाणी पिऊन मृत्युमुखी पडतात. नुकतीच वाढू लागलेली छोटी झाडेही पाण्याअभावी जळून जातात, तसेच मोठी झाडेही पाण्याअभावी सुकू लागतात.

झाडांची संख्या घटल्यामुळे उन्हाळ्यात झाडांच्या सावलीत निवारा मिळणेही पक्ष्यांना मुश्कील होते. पक्ष्यांची पिसे उष्णतारोधक असतात आणि त्यांची हालचाल इतर कोणत्याही प्राण्यापेक्षा जास्त असल्याने त्यांच्या शरीरात मोठ्य़ा प्रमाणात उष्णता निर्माण होते. तापमान नियंत्रण करण्यासाठी पक्ष्यांमध्ये स्वेद ग्रंथी नसतात, त्यामुळे पक्ष्यांना घाम येत नाही. अशावेळी पक्षी त्यांच्या शरीरातली जादा उष्णता श्वासोच्छवासाद्वारे बाहेर टाकतात. पण त्यामुळे त्यांच्या हृदयाची धडधड वाढते, शरीरातली जास्त उर्जा खर्च होते. 
 

आपल्या आजूबाजूच्या परिसरात अनेक भटके प्राणी असतात. उन्हाळ्यात सावलीत निवारा न मिळाल्यास ते प्राणीही हैराण होतात. प्राण्यांना घाम येतो, पण त्यांच्या अंगावर दाट केस असले, तर त्यामुळेही त्यांना थंडावा मिळण्यात बाधा येते. काही प्राणी उष्णतेपासून बचाव करण्यासाठी चिखलात लोळतांना दिसतात. तर बरेचसे प्राणी त्यांच्या शरीरातली जादा उष्णता श्वासोच्छवासाद्वारे बाहेर टाकतात. पण त्यामुळे त्यांच्या हृदयाची धडधड वाढते, शरीरातली जास्त उर्जा खर्च होते.
 
 
अशा प्रकारे शरीरातली जास्त उर्जा खर्च झाल्यास, आणि पाणी प्यायला न मिळाल्यास, पक्षी आणि प्राणी उष्माघाताने मरण्याचीही शक्यता असते. कधीकधी त्यांच्या शरीरात ग्लुकोज, सी व्हिटॅमिनचीही कमतरता निर्माण होते. बर्‍याचदा तहानेने व्याकूळ झालेले पक्षी, प्राणी तहान भागवण्यासाठी दूषित पाणी पितात आणि त्या दूषित पाण्यामुळेही मरतात.

आपल्या परिसरातील पक्षी आणि प्राणी पाणीटंचाईने मरू नयेत म्हणून आपण त्यांना पिण्यासाठी पाणी ठेवावे. पाणी मातीच्या स्वच्छ भांड्यात किंवा प्लॅस्टीकच्या स्वच्छ भांड्यात ठेवता येईल. पाणी पिण्याचे भांडे खूप खोल किंवा अगदीच उथळ नसावे. पक्ष्यांसाठी आपल्या घराच्या गच्चीवर, बाल्कनीमध्ये, किंवा अंगणात पाणी ठेवता येईल. प्राण्यांसाठी घराभोवतालच्या मोकळ्या जागेत, पदपथाच्या कोपर्‍यात, किंवा आसपासच्या मोकळ्या मैदानाच्या जागेत, एखाद्या झाडाखाली पाणी ठेवता येईल. शक्य असेल तर पक्षी / प्राण्यांना तेथे त्यांचे खाद्यही ठेवता येईल. कावळ्यासारखे पक्षी चोचीने फक्त मऊ अन्नच खाऊ शकतात, ते चोचीतले अन्न पाण्यात बुडवून खातात, त्यामुळे पाणी खराब होते. कुत्रे पायाने पाणी उडवून पाणी खराब करतात. म्हणून ज्या भांड्यात पक्षी प्राण्यांना पाणी ठेवले जाते, त्यात नवीन पाणी भरण्य़ापूर्वी आधीचे पाणी काढून टाकून, ते रोज स्वच्छ करणे आवश्यक आहे.
 
 
उन्हाळ्यात झाडांनाही पाणी घालावे म्हणजे झाडे जगतील. उन्हाळ्य़ात आपल्या परिसरातील जितकी जास्त झाडे जगतील, तितका जास्त थंडावा मिळेल. प्राणी पक्ष्यांना झाडांच्या सावलीत निवारा आणि अन्न मिळून त्यांचेही संवर्धन होते.  झाडांच्या पानांतून बाहेर टाकल्या जाणार्‍या बाष्पामुळे वातावरणातली उष्णता कमी होतेच, पण हवेतली धूळही कमी होते. एक झाड जगते, तेव्हा त्याच्यावर अवलंबून असणार्‍या अनेक प्राण्यांचे, पक्ष्यांचे आणि माणसांचेही जीवन सुसह्य होते.

म्हणून एक संकल्प करा आणि या उन्हाळ्यात पक्षी, प्राणी आणि झाडांनाही पाणी द्या.