भायखळा येथील "वीरमाता जिजाबाई भोसले" उद्यानात भरलेल्या प्रदर्शनाला मी शुक्रवारी भेट दिली आणि प्रदर्शनातील झाडांचे आणि फुलांचे फोटो काढले. प्रदर्शनाला लोकांची खूप गर्दी होती. त्यात संध्याकाळची वेळ, सूर्य मावळतीकडे झुकलेला होता, थोड्याच वेळात सूर्य मावळून अंधार पडला आणि तो परिसर दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघाला. गार वाराही वाहत होता. अशा या लोकांच्या गर्दीत कॅमेरा सांभाळत, प्रकाशाच्या बदललेल्या छटांशी कॅमेर्याचे सेटींग जुळवून घेत, वार्याने हलणार्या झाडांवर माझा कॅमेरा केंद्रीत करून फोटो काढायचा मी प्रयत्न केला. त्यात माझ्या कॅमेर्याला इमेज स्टॅबिलायझेशनची सोय नाही आणि अशाप्रकारे फोटो काढण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न होता. पण नंतर फोटो पाहिल्यावर मला वाटलं की त्यातले काही फोटो चांगले आले आहेत. त्यामुळे ते फोटो मी इथे प्रकाशित करायचे ठरवले, म्हणजे ज्यांनी हे प्रदर्शन पाहिले नाही त्यांना त्याचा चित्रानुभव तरी मिळेल. मी खाली दिलेल्या तीन चलचित्रफीतींमध्ये (slideshow) असे एकूण ११९ फोटो ठेवलेले आहेत.
चलचित्रफीत १ -
चलचित्रफीत १ -
चलचित्रफीत २ -
चलचित्रफीत ३ -
*********************
*******
***
अशा प्रकारे फ़ोटो पाहायची कल्पना छान आहे आणि छान आलेत फ़ोटो....
ReplyDeleteधन्यवाद अपर्णा!
ReplyDeleteफोटो अप्रतिम आले आहेत. प्रत्यक्ष प्रदर्शनात आहोत इतके 'खरे' आलेत. पण 'बोन्साय' बघून थोडी उदासी वाटली. वाटले उंच वाढणाऱ्या त्या वड-पिंपळांना घरात शोभेसाठी 'बुटके' करून ठेवण्याचा आपण मानवाला अधिकार आहे?
ReplyDeleteधन्यवाद योगेश!
ReplyDeleteवड पिंपळासारखे वृक्ष उंच वाढतात, पण बहुतेक वेळा त्यांच्या बिया कुठे तरी कडेकपारीत, किंवा एखाद्या भिंतीवर, किंवा एखाद्या झाडावरच्या फांदीच्या बेचक्यात रूजलेल्या दिसतात. तिथे त्या झाडांचे पोषण होईलच याची कोणतीही खात्री नसते, तरीही ती झाडे तिथे रुजतात, अत्यंत कठीण परिस्थितीत तग धरतात. तसंच निसर्गातल्या इतर झाडांच्या बियाही जिथे रूजतील तिथे वाढतात. निसर्गातले सर्वच वृक्ष अशा कठीण परिस्थितीला सामोरे जातात, त्यातल्या ज्या झाडांच्या वाढीला पोषक परिस्थिती असते, त्यांचे वृक्ष बनतात, इतर मात्र खुरटलेल्या स्थितीतच तगून राहतात, पण अनुकूल परिस्थिती निर्माण झाली तर त्यांचीही वाढ होते. (अशा खुरटलेल्या वृक्षांपासूनच माणसाला बोन्साय करण्याची प्रेरणा मिळाली.)
बर्याचदा मोठ्या झाडांखाली पुरेशा पोषणाअभावी किंवा सूर्यप्रकाश न मिळाल्याने लहान झाडे, रुजलेली रोपटी वाढू शकत नाहीत, त्यांची वाढ खुरटते. कधीकधी जंगलातील प्राण्यांमुळेही (हत्ती, माकडे, वाळवी, मुंग्या इ.) झाडांच्या फांद्या मोडल्या जातात. त्यामुळे फक्त एखादा वृक्ष मोकळ्या जागेत वाढला म्हणजे त्याची उंच वाढ होतेच असे नाही. जंगलातही झाडांची वाढ रोखणारे, खुंटवणारे अनेक घटक असतात.
वनव्यवस्थापन (Forest Management) करतांनाही झाडांच्या काही विशिष्ट प्रजाती वाढवतांना तिथली इतर काही झाडे (वृक्ष) काढून टाकावे लागतात.
चिकू सारख्या बागायती झाडांची लागवड केली जाते, तेव्हा दर काही वर्षांनी त्यांची झाडापासून काही अंतरावर असलेल्या मुळांची नियमित कापणी करावी लागते. व्यावसायिक शेतीमध्ये ज्या झाडांचे कंद लावलेले असतात, अशा झाडांना मुख्य खोडाजवळ फुटणारे फुटवे काढून टाकावे लागतात.
बोन्सायमध्ये केल्या जाणार्या फांद्या आणि मुळांच्या कापणीबाबत इतकेच सांगता येईल, की ते झाड छोट्या कुंडीत वाढतांना त्याला पुरेसे पोषण मिळावे म्हणून त्याच्या अनावश्यक फांद्या आणि मुळे कापली जातात आणि इतर झाडांचीही अशी कापणी केली जाते हे मी वर लिहिलेच आहे. बर्याच वेळी निसर्गात वाढलेली खुरटलेली झाडेच बोन्साय करायला निवडली जातात. मी स्वतः बोन्साय करून पहिलेला नाही, पण एक नक्की सांगू शकेन, की बोन्साय करणे म्हणजे झाडाचे कुपोषण करणे नाही, तर योग्य ते पोषण देऊन मोठा वृक्ष लहान आकारात वाढवणे. जर झाडाला योग्य पोषण मिळाले नाही, तर त्याची वाढ खुरटून त्याला फुले, फळे येणे बंद होते. जेव्हा एखाद्या बोन्सायला फुलं किंवा फळं येतात तेव्हा त्याला योग्य ते पोषण मिळालं आहे याचे ते निदर्शक असते. झाडांना असे पोषण जेव्हा मिळते आणि झाडांची वाढ खुरटलेली नसते तेव्हाच दोनशे / तीनशे वर्षे वयाचे फुलणारे, फळणारे बोन्साय वृक्ष वाढवणे शक्य होते. जपानमध्ये हजार वर्षांहून अधिक वय असलेले बोन्सायवृक्ष वाढवलेले आढळतात.
म्हणून असे म्हणावेसे वाटते, की बोन्साय म्हणजे फ़क्त झाडांना शोभेसाठी बुटके करून ठेवणे नाही, तर ती एक शास्त्रशुद्ध कला आहे, पण ती सगळ्यांनाच जमेल असे नाही.
खुप मस्त लेख लिहला आहे आवडला खुप मस्त लेख लिहला आहे आवडला
ReplyDeleteधन्यवाद कृष्णा! फोटोंमुळे (प्रकाशचित्रं) तुम्हांला हा लेख आवडला असावा, बाकी मी तसं त्यात काही विशेष लिहिलेलं नाहीये. बोन्सायवरचा माझा अभिप्राय मात्र लेखाएवढा मोठा झाला आहे.
ReplyDeleteHere I am also posting some of my comments and comments of Half zoologist about bonsai on the blog post of http://mokale-aakash.blogspot.com/2011/10/blog-post_10.html
ReplyDelete1st comment copied and pasted the same comment written to Yogesh.
2nd comment
D D said...
गौरी,
उंच झाडं सगळ्यांनाच बघायला आवडतात. पण एखाद्या उंच वृक्षाच्या आजूबाजूला शोधक वृत्तीने पाहिलं, तर त्याच्याखालच्या जमिनीवर, त्याच वृक्षाच्या बियांमधून रुजलेली पण वाढ खुरटलेली पाचसहा तरी झाडं बघायला मिळतात, हा निसर्गाचाच अविष्कार आहे. असो.
मी माझ्या आधीच्या कॉमेंटमध्ये जे लिहायला विसरले, ते आता लिहितेय...
झाडांनाही भावना असतात आणि त्यांनाही संवेदना असतात. पण माणसामध्ये जशी चेतासंस्था असते, तशी चेतासंस्था झाडांमध्ये नसते, तिचे स्वरूप वेगळे असते. त्यामुळे झाडांना जाणवणार्या संवेदनांचे स्वरूप हे माणसाला जाणवणार्या संवेदनेपेक्षा काहीसे वेगळे असते. एखाद्या माणसाचा हात किंवा पाय कापावा लागला, तर त्याला वेदना होईल, अवयव गमावल्याचे दुःख होईल आणि आपले रूप डिफॉर्म झाले यामुळे त्याला काहीसे असुरक्षित वाटेल (कारण माणसाला दोनच हात किंवा दोनच पाय असतात आणि त्यापैकी एखादा गमावला तर नवीन हात किंवा पाय फुटणार नसतो.) पण जर एखाद्या झाडाची फांदी कापली गेली, तर त्या झाडाला वेदना होईल, त्याचबरोबर कापलेली फांदी ही त्या झाडाचे प्रोपॅगेशन होण्याची एक शक्यता असल्याने त्याचा आनंदही जाणवेल तसेच या तुटक्या फांदीमुळे त्याजागी अजून नवीन फांद्या येण्याची शक्यताही वाढते, त्यामुळे डिफॉर्म झाल्याचा असुरक्षितपणा झाडात निर्माण होण्याची शक्यता कमीच असेल.
थोडक्यात प्रत्येक वाढ झालेली फांदी कापली गेली, की ती झाडासाठी प्रोपॅगेशनची संभाव्यता असल्याने झाडाला जाणवणारी वेदना ही माणसाला जाणवणार्या वेदनेपेक्षा वेगळी ठरते.
एखादं झाड खूप उंच वाढू दिलं, त्याची एकही फांदी कापली नाही, एकाही प्राण्याला त्या झाडाबरोबर कोणतीही इंटरअॅक्शन करण्याची संधी दिली नाही, तर त्या झाडाची फांदीमुळे प्रोपॅगेशन होण्याची शक्यता खूपच कमी होईल आणि त्याला फक्त बिया रुजून होणार्या प्रोपॅगेशनवर अवलंबून रहावे लागेल. अशा वेळी खूप वाढ झालेल्या फांद्याच्या वजनाचा भार झाडाला पेलवत नाही आणि काही जास्त वाढलेल्या फांद्या स्वतःहूनच कोसळून पडतात. हे खूपच परस्परसापेक्ष आहे.
त्यामुळे बोन्सायबाबत तटस्थपणे बोलतांना त्या झाडाच्या फांद्या आणि मुळं कापणं हे अगदी चुकीचं आहे असं म्हणता येणार नाही किंवा ते अनैतिक आहे, असाही दावा करता येणर नाही. शिवाय बोन्साय केलेली झाडं जर कुंडीतून काढून परत जमिनीत लावली, तर ती पुन्हा जोमाने वाढतात. त्यांची बोन्सायची ही स्थिती पुन्हा बदलता येऊ शकते.
अर्थात तुमचं बोन्सायबाबतचं मत बदलावं म्हणून मी हे सांगत नसून, "बोन्साय करणं हे नैतिक की अनैतिक" ह्या संभ्रमात सापडलेल्या व्यक्तींना निसर्गाचा यासंदर्भातला रोल असा असतो ह्याची जाणिव करून देण्याचा हा एक प्रयत्न आहे. तुमची बोन्सायबद्दलचीच पोस्ट असल्याने साहजिकच ही कॉमेंट बोन्सायबद्दल सर्च करणार्यांच्या नजरेला पडेल, म्हणून मुद्दाम हे लिहीत आहे.
0 said...
गौरी
माणूस हा शेती करणारा निसर्गातला एकमेव प्राणी नाही. मुंग्या सुद्धा अफिड्स नावाच्या किड्यांची आणि एक प्रकारच्या बुरशीची शेती करतात, इतकंच नाही तर त्यांना उदार आश्रय देणार्या एका झाडाच्या कळ्याही त्या कुरतडून टाकण्याशारखा निर्घृणपणा त्या दाखवतात कारण त्यामुळे त्यांना रहायला जास्त मोकळि जागा मिळते.
१) http://www.sciencedaily.com/releases/2007/10/071009212548.htm
२)http://www.sciencedaily.com/releases/2008/03/080324173459.htm
३) http://www.sciencedaily.com/releases/2009/04/090428111535.htm
तुम्ही संवेदनाक्षम असल्याने तुम्हांला बोन्साय आवडत नाही, तसेच सिल्कचे कपडे पण आवडत नसतील कारण सिल्कचं कापड तयार करण्यासाठी हजारो-लाखो रेशमाच्या किड्य़ांना त्यांच्या कोशावस्थेतच मारावं लागतं. बोन्साय तरी जिवंत असतो पण हे किडे तर मरतातच. तसंच तुम्ही मध पण वापरत नसाल कारण मध काढण्यासाठी लाखो मधमाशांचं घर उध्वस्त करावं लागतं. कोंबड्यांच्या फार्ममध्ये त्यांना आयुष्यभर एका छोट्या पिंजर्यात कोंडून ठेवलं जातं म्हणजे त्यांचाही तो एकप्रकारचा बोन्सायच म्हणावा लागेल हे तुम्हांलाही पटेल. :)
जे संपूर्ण शाकाहारी असतात ते प्राण्यांचं दूध पीत नाहीत, मध खात नाहीत, सिल्कचं कापडही वापरत नाहीत आणि नॉनव्हेज, अंडी वगैरे तर अजिबात खात नाहीत असं आमच्या झूऑलॉजीच्या मॅडम म्हणायच्या. :)
एकंदरीत मी याबाबत फारच कन्फ्युज्ड आहे.
- हाफ झुऑलॉजिस्ट.
my 3rd comment on the blog post of http://mokale-aakash.blogspot.com/2011/10/blog-post_10.html
ReplyDelete1st comment copied and pasted the same comment written to Yogesh.
2nd comment written above
3rd comment
D D said...
संपूर्ण शाकाहारी लोकांना vegan म्हणतात, तर दूध आणि दुग्धजन्य पदार्थ आहारात वापरणार्या शाकाहारींना lacto vegetarian म्हणतात. आपण आपल्या मनाशी काही पूर्वग्रह बनवलेले असतात आणि त्याचप्रमाणे आपण विचार करतो, ह्याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. मी परत कॉमेंट देणार नव्हते, पण ह्या झूऑलॉजीमुळे पुन्हा एकदा कॉमेंट देत आहे.
झूऑलॉजीच्या ह्याच वेबसाईट वर अजून एक लिंक आहे http://www.sciencedaily.com/releases/2008/07/080728221236.htm
सॅलॅमॅंडर सारखा प्राणी जेव्हा एखादे बोट गमावतो तेव्हा त्या प्राण्याला पुन्हा बोट फुटते. तसेच सेंटीपेड सारखे प्राणी सुद्धा अर्भकावस्थेत असतांना एखादा पाय गमावतात, तेव्हा त्यांना तो पाय परत फुटतो. शेपटी तुटलेली पाल तुम्ही सगळ्यांनी पाहिलीच असेल, शत्रूला चकवण्यासाठी पाल स्वतःच स्वतःची शेपटी तोडून टाकते आणि पळत सुटते, अर्थात पालीला परत शेपटी फुटते. या सगळ्या प्राण्यांमध्ये जशी पुनर्निर्माणाची शक्ती असते, काहीशी तशाच प्रकारची पुनर्निर्माणाची शक्ती झाडांमध्येही असते. पाल ज्या सहजतेने स्वतःची शेपटी तोडून टाकण्याची क्रिया स्वीकारते, त्याच सहजतेने झाडेही स्वतःची मुळे आणि फांद्या तोडून टाकणे स्वीकारतात. त्याशिवाय झाडाची वेगळ्या प्रकारची चेतासंस्था असते, म्हणून झाडाला त्याच्या फांद्या आणि मुळे कापून लहान आकारात वाढविणे क्रूरपणाचे ठरत नाही. निसर्गाने एखादा परिपक्व वृक्ष किती उंचीपर्यंत वाढावा याच्यावर मर्यादा घातली आहे, पण परिपक्व वृक्षाला फुले आणि फळे लागण्यासाठी त्याची उंची कमीत कमी किती असावी याच्यावर निसर्गाने काहीही निर्बंध घातलेला नाही, म्हणून जंगलात सुद्धा खुरटलेल्या वृक्षालाही फुले, फळे लागलेली दिसतात.
असे जरी असले, तरी जी झाडे (वृक्ष) कठीण परिस्थितीत तग धरून राहू शकतात - ज्यांची अशा प्रकारे राहण्याची क्षमता असते, त्यांचाच बोन्साय होऊ शकतो. मनात आणले म्हणून वाटेल त्या झाडाचा बोन्साय करता येत नाही. नारळासारख्या उंच झाडांचा बोन्साय करता येत नाही. वाळवंटात काही मीटर उंच वाढणार्या निवडुंगाचाही बोन्साय करता येत नाही. किंवा गणेशवेलीसारख्या नाजूक पण पसरट वाढणार्या वेलींचाही बोन्साय करता येत नाही. नारळ, निवडुंग, गणेशवेल इत्यादींचा बोन्साय करायचा ठरवला तर ते क्रूरपणाचे ठरेल, कारण त्यांची तशा प्रकारे वाढण्याची क्षमताच नसते.
बोन्सायच्या झाडांकडे जर दुर्लक्ष झाले आणि त्यांना पाणी घातले गेले नाही, तर त्यांची पाने सुकतील, कदाचित गळतीलही, पण त्यांची मुळे मात्र वेगाने वाढून आजूबाजूला पसरतील आणि पाण्याचा शोध घेतील आणि बहुतेक वेळा ते झाड पाणी मिळेपर्यंत तग धरून जिवंत राहिलेले दिसेल... कारण ते त्यांच्या जीन्समध्येच आहे. पण काचेच्या बंदिस्त टेरॅरियममध्ये वाढणार्या झाडांकडे दुर्लक्ष झाले आणि त्यांना पाणी घातले गेले नाही किंवा जास्त घातले गेले, तर ती नाजूक झाडे तग धरू शकणार नाहीत कारण तसं त्यांच्या जीन्समध्येच नाही. अर्थात बोन्सायपेक्षाही काचेच्या टेरॅरियममध्ये झाडे वाढवणे जास्त चिंतेचे आहे. पुढच्या काही दिवसांत शक्य झालं तर, मी एक पोस्ट लिहून टेरॅरियम काय असतं त्याची माहिती ब्लॉगवर टाकेन.