--000-- Important statement - Some of those who are calling themselves as my so-called friends on the basis of acquaintance which has happened in a short duration of past time, behaved with me in past in a manner which was crossing over the limits of friendship in that time, vexatious, objectionable even after the frequent admonitions given by me, so I do not consider them as my friends who crosses over the limits of friendship. So I am not duty-bound to publish or answer their comments which are given on any of my blogs, or to answer their email, or to accept their friend invite on any of the social website like facebook, or to answer their messages sent through the comment form on blog. So please take a kind note that if it will be found out that the abovementioned persons tried to contact with me directly or indirectly by any types of means mentioned before or through any other person by incuring him / her inbetween or by maknig fake profile through it or by any other means, through the blog or through any other medium or if it will be found out that they have done any type of act which is vexatious for me, then proper action will be taken on it. Also by all this incidence the decision is taken that the right of publishing all the suspicious seeming comments given on the blog and the right of answering any of the suspicious seeming messages coming through the comment form is reserved, readers please take a kind note of it. ----- 00000 ----- महत्त्वाचे निवेदन - भूतकाळातील थोडक्या कालावधीकरता झालेल्या माझ्या ओळखीच्या आधारावर स्वतःला माझे तथाकथित मित्र म्हणवून घेणार्‍या काही जणांनी पूर्वी मी वारंवार समज दिल्यानंतरही, माझ्याशी तत्कालीन पद्धतीच्या मैत्रीच्या मर्यादा ओलांडणारे, मनस्ताप देणारे, आक्षेपार्ह वर्तन केले, त्यामुळे अशा मैत्रीच्या मर्यादा ओलांडणार्‍यांना मी माझे मित्र मानत नाही. त्यामुळे माझ्या कोणत्याही ब्लॉगवर आलेल्या त्यांच्या कॉमेंट्स प्रकाशित करणे किंवा त्यांना उत्तर देणे, किंवा त्यांच्या इमेलला उत्तर देणे, किंवा त्यांच्या फेसबुकसारख्या कोणत्याही सोशल वेबसाईटवर आलेल्या फ्रेंड इन्व्हाईटला ऍक्सेप्ट करणे, किंवा त्यांनी ब्लॉगवरील कॉमेंट फॉर्मद्वारा पाठवलेल्या निरोपाला उत्तर देणे यासाठी मी बांधील नाही. त्यामुळे उपरोल्लेखित व्यक्तिंनी आधी उल्लेख केलेल्या कोणत्याही प्रकारे किंवा दुसर्‍या एखाद्या व्यक्तीला मध्ये घालून तिच्याद्वारे किंवा बनावट प्रोफाईल तयार करून त्याद्वारे किंवा इतर कोणत्याही प्रकारे, ब्लॉग किंवा इतर कोणत्याही माध्यमातून माझ्याशी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष प्रकारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याचे आढळल्यास किंवा मला मनस्ताप होईल अशा प्रकारचे कोणतेही कृत्य त्यांनी केल्याचे आढळल्यास, त्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी. तसेच या सर्व प्रकारामुळे ब्लॉगवर आलेल्या संशयास्पद वाटणार्‍या सर्व कॉमेंट्स प्रकाशित करण्याचे आणि कॉमेंट्स फॉर्मद्वारे आलेल्या संशयास्पद वाटणार्‍या कोणत्याही निरोपाला उत्तर देण्याचे अधिकार राखून ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी. --000--

Sunday, September 20, 2009

ब्लॉग लिहितांना... / While writing blog...

मराठी / English

ब्लॉग लिहितांना...
माझ्या ब्लॉगसाठी मी इंडीब्लॉगर या संस्थळाचे सदस्यत्व घेतले आहे. त्या संस्थळावर चर्चिलेल्या विषयांमधे "सेंन्सॉरशिप ऑन ब्लॉग्ज" या नावाच्या शीर्षकाखाली एका व्यक्तीने विषय मांडला होता, की "काही वेळा ब्लॉगलेखक ब्लॉग लिहितात, पण त्यांना गैरसोयीचे असणारे किंवा त्यांच्या विरोधात लिहिलेले अभिप्राय (टिप्पण्या) ते डिलीट करतात (गाळून टाकतात) किंवा प्रकाशित न करता अडवून धरतात. ब्लॉगवर कोणते अभिप्राय ठेवायचे हे ठरवण्याचा अधिकार लेखकाचा असतो. पण जेव्हा वाचक त्यांचा वेळ खर्च करून या वैचारिक चर्चेत सहभागी होऊन, लेखकाच्या दृष्टीकोनापेक्षा वेगळा किंवा विरोधी अभिप्राय देतात, तेव्हा लेखक तो अभिप्राय दाबून ठेवतो, त्यावेळी तो वाचकांना काय किंमत देतो? हे नैतिक आहे का? अखेरीस ब्लॉग हे वैचारिक आदानप्रदानाचे मुक्त व्यासपीठ आहे."

या चर्चेत आलेले काही मुद्दे असे होते, "काही वेळा स्पॅम किंवा असभ्य भाषेतील लैंगिकतायुक्त अभिप्राय येतात, किंवा त्या विषयाला धरून नसलेले असंबद्ध अभिप्राय येतात,  तेव्हा ते डिलीट करण्याबाबत कोणीच आक्षेप घेणार नाही.  त्याशिवाय कधीकधी लेखकावर वैयक्तिक हल्ला करणारे अभिप्राय येतात, ते डिलीट करण्याचा लेखकाला अधिकार आहेच." पण कधीकधी यातले कोणतेही कारण नसतांनाही वाचकांचे अभिप्राय डिलीट केले जातात या मुख्य मुद्द्यावर तिथे फारशी चर्चा झालेली दिसली नाही. म्हणून मी माझे याबद्दलचे मत ब्लॉगवर मांडायचे ठरवले.

मला असे वाटते, की एखाद्या गोष्टीबद्दल प्रत्येकाचा दृष्टीकोन वेगळा असू शकतो. त्यामुळे लेखकाने लिहिलेल्या लिखाणाशी काहीजण सहमत असू शकतील, किंवा असहमतही असू शकतील, किंवा फक्त काही मुद्द्यांबद्दल ते लेखकाशी सहमत असू शकतील, हे लेखकाने विसरू नये. जो अभिप्राय हा लेखकावर वैयक्तिक हल्ला करणारा नाही किंवा समाजस्वास्थ्याला हानी पोहोचवणारा नाही, तो अभिप्राय लेखकाच्या विरूद्ध मताचा असला, गैरसोयीचा वाटला तरी तो लेखकाने न कचरता प्रकाशित करावा.

मात्र कोणता अभिप्राय हा लेखकावर वैयक्तिक हल्ला करणारा आहे, किंवा समाजस्वास्थ्याला हानी पोहोचवणारा आहे हे लेखकाने स्वतःच्या सद्‍सद्‌विवेकबुद्धीशी प्रामाणिक राहूनच ठरवायचे असते. ही संपूर्णतया लेखकाची जबाबदारी असते. आणि जेव्हा लेखक ही जबाबदारी पार पाडण्यात अपयशी ठरतो, तेव्हा आपण याला बेजबाबदार ब्लॉगिंग असे म्हणू शकतो.
*************************

While writing blog...
I have taken membership of website Indiblogger for my blog. On that website's forum, a topic was discussed by a person under the heading of "Censorship on Blogs", that "Sometimes blog writers do write a blog, but they either delete or block the comments which are inconvenient to them, or the comments opposed to their stance. It's the writers right to determine which comments should be put on blog. Does the writer value the readers, when readers spend their time in this thoughtful discussion, and give comments having different or opposite viewpoint than the writer, and when writer blocks it? Is it ethical? After all blog is a platform for free exchange of thoughts and viewpoints."

These are some points in that discussion, that "No one will take objection to delete spam comments or indecent sex-friendly comments which are sometimes received. Besides the writer has right to delete the comments making personal attacks on that writer." But the main point was not discussed there, that sometimes comments are deleted when there is no such reason, so I decided to give my opinion about it on blog.

What I am feeling is, every person may have different viewpoint about any thing. So the writer must not have to forget that maybe some of them will be agree or be disagree with the writing of the writer, or maybe they will be agree with some points only in that writing. The writer should have to publish the comment without flinching, though it is of opposite opinion, seems inconvenient as log as that comment is not making personal attack on writer, or do not damage the health of society.

But the writer should have to determine whether the comment is a personal attack or it is damaging the health of society, while keeping honesty to his conscience. It's the sole responsiblity of witer. And when the writer fails in his responsibilty, then we can say it as a irresponsible bloging.
**********************************

11 comments:

 1. लिहिणाऱ्याने पण थोडं विचार करुन आणि पर्सनलाइझ्ड अटॅक न करता लिहिलं की ते पब्लिश करायला कांहिच हरकत नाही. पण केवळ मी पहा कसा तुझ्या पेक्षा शहाणा आहे.. किंवा तु कसा मुर्ख आहेस अशा घाटणीचे कॉमेंट्स आले की मग ते डिलीट करणंच योग्य आहे.
  मी ब्लॉगिंग सुरु करुन आता ८ महिने पुर्ण झाले आहेत. मी बहुतेक प्रयेक कॉमेंट अप्रुव्ह करतो आणि तिला रिप्लाय पण देतो. आजपर्यंत फक्त एकदा कॉमेंट अप्रुव्ह केलेली नाही. त्या बद्दल पण ब्लॉगवर एक्स्प्लेनेशन दिलंय.
  लेख फारच छान झालाय.

  ReplyDelete
 2. धन्यवाद महेंद्रजी!
  तो फ़ोरम वाचल्यापासून हा विषय मनात घोळत होता. आज त्यावर लिहिण्यासाठी सवड मिळाली.

  ReplyDelete
 3. आणि मी एक महत्त्वाचा मुद्दा नमूद करायला विसरले, की कधीकधी ब्लॉग लेखकांनी एखाद्या विशिष्ट व्यक्तिविषयी चर्चा करून ब्लॉग पोस्ट लिहिलेली असते. अशा वेळी त्या विशिष्ट व्यक्तिने विरूद्ध दृष्टीकोनाचा अभिप्राय दिल्यास त्या लेखकानेही तो अभिप्राय प्रकाशित केलाच पाहिजे.
  कारण, अखेरीस ती ब्लॉग पोस्ट त्या व्यक्तिबद्दलच लिहिलेली असल्याने, जर त्या व्यक्तीच्या मते चुकीचा विचार व्यक्त करणारा, किंवा निव्वळ गैरसमजातून लिहिल्या गेलेला असा कोणताही मुद्दा असेल, तर त्या मुद्द्यावर आक्षेप घेण्याचा, त्या व्यक्तीला लेखकाएवढाच अधिकार आहे. अशा वेळी त्या व्यक्तीला स्पष्टीकरण देण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि त्या व्यक्तीने दिलेला अभिप्राय, लेखकाने अडवून न ठेवता प्रकाशित केलाच पाहिजे.
  ************************
  And I forgot to mention one point, sometimes blog writers write their blog post discussing about any specific person. That time if that specific person gives his comment with opposite viewpoints, then also the writer must have to publish that comment.
  Because after all that blog post is written on that person, so that person has same right as that of the auther, to take objection on any point he thinks is misleading or wrote by mere misunderstanding. In such case that person has every right to give his clarification and the comments of that person must be published by that writer instead of blocking it.

  ReplyDelete
 4. संवादीनी नामक ब्लॉग लिहिणाऱ्या एका मुलीला पण ब्लॉगवर खुप् मनस्ताप दिला गेला होता

  ReplyDelete
 5. हरेकृष्णजी,
  प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!
  म्हणूनच कधी कधी असे वाटते, की टोपणनाव घेऊन आणि शक्य असेल तिथे स्वतःची स्त्री किंवा पुरूष अशी ओळख न देता ब्लॉग लिहावा.
  *******
  Harekrishnaji
  Thanks for comment!
  That's why sometimes it feels that blog should be written with alias & if possible, then without specifying the gender as male or female.

  ReplyDelete
 6. डी डी,
  मी ह्या पोस्टवर व्यक्त झालेल्या मताशी पुर्ण सहमत आहे.
  सर्वात शेवटी ब्लॉग हा त्या त्या व्यकीचा त्याचे स्वत:चे मत मांडण्यासाठीच असतो, तेव्हा त्याबाबतचा सर्वाधिकार हा केवळ त्याचाच आहे.
  ज्याला त्या विरोधी मत मांडावयाचा असेल त्याने तो तिथे जर अप्रूव्ह नाहीच झाले तर , त्यावर फारशी चर्चा करीत बसण्य़ापेक्षा ते स्वत:च्या ब्लॉगवर मांडावे.

  एखाद्या पुस्तकातील मतांव्रर आपण काय करतो ?

  ReplyDelete
 7. @ sureshpethe
  "ज्याला त्या विरोधी मत मांडावयाचा असेल त्याने तो तिथे जर अप्रूव्ह नाहीच झाले तर , त्यावर फारशी चर्चा करीत बसण्य़ापेक्षा ते स्वत:च्या ब्लॉगवर मांडावे."
  - आपला ब्लॉग हे आपले स्वतःचे व्यासपीठ असते, त्यामुळे आपण आपली मते तिथे मांडू शकतो. (म्हणूनच फ़क्त इंडीब्लॉगरवर चर्चा करण्याऐवजी मी माझे मत इथे मांडले.) पण काही वाचकांचा स्वतःचा ब्लॉग नसतो, अशा लोकांच्या दृष्टीने हा महत्त्वाचा मुद्दा असतो. आणि जेव्हा त्यांचा "लेखकावर वैयक्तिक हल्ला न करणारा, आणि समाजस्वास्थ्याला हानीकारक नसणारा" अभिप्राय फ़क्त लेखकाला गैरसोयीचा वाटतो म्हणून प्रकाशित होऊ शकत नाही तेव्हा त्यांना ते अन्यायकारक आणि बेजबाबदार वर्तन वाटते हे अशा ब्लॉग लेखकांनी ध्यानात घ्यावे ह्यासाठीच मी ही पोस्ट लिहिली आहे.

  ReplyDelete
 8. @ Anand
  प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!

  ReplyDelete
 9. Kaahi veles Lekhacha rokh lakshaat yet naahi aani keval dhavat vachan karun pratikriyaa denyachi ghai anavadhanane hote. tyamule pushkalada gairsamaj pan hou shakto. pan aapale man swacha asel tar asaa prasanga charachene nivalata yeto. Tumhi blog vishayi agadi barobar mat mandale aahe,
  dhanyawad !
  http://savadhan.wordpress.com
  NY-USA
  7-7-10
  vel16-30

  ReplyDelete
 10. धन्यवाद सावधान!
  तुम्ही हा एक महत्वाचा मुद्दा मांडला आहे. अभिप्राय देतांना वाचकाचा गैरसमज झाला असेल, तर त्यानेही गैरसमज दूर झाल्यावर मोकळ्या मनाने आपली चूक मान्य केली, तरच सुसंवाद योग्य प्रकारे राखला जातो. अर्थातच लेखक आणि वाचक या दोघांनीही निरोगी दृष्टीकोन बाळगणे आवश्यक आहे.

  ReplyDelete