जून महिना सुरू होत होता. पण जूनच्या सुरूवातीलाच जोरदार पाऊस पडायला सुरूवात झाली होती. या संततधार पावसातच आम्ही नऊ-दहा जण ट्रॅक्सने कोकणात जाणार होतो. हा प्रवास करण्याचे आधीच ठरलेले असल्याने आता अचानक आलेल्या पावसातही हा प्रवास रद्द न करता तसेच जायचे ठरले.
पावसाची रिमझिम रिमझिम चालू असतांनाच आमच्या प्रवासाला सुरूवात झाली. नुकताच पाऊस सुरू झाला असल्याने जमिनीवर ठिकठिकाणी हिरवळ उगवलेली दिसत होती. सकाळचा सुखद गारवा, मध्येच येणारे किंचितसे धुके आणि हळूवारपणाने पण सतत पडणारा पाऊस यामुळे एक वेगळेच उत्साहवर्धक वातावरण तयार झाले होते आणि जणू काही आपण पावसाळी सहलीलाच निघालो आहोत असे वाटत होते.
प्रवास बराच लांबचा होता. रात्रीच्या वेळेपर्यंत मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचायचे होते. त्यामुळे वाटेतील निसर्गरम्य ठिकाणे पाहून आम्ही पुढे जात होतो. पावसाळ्यातल्या निसर्गरम्य कोकणाचे सौंदर्य वेगळेच भासत होते. आम्ही कोकणातील प्रवास फ़ारसा केला नसल्याने या प्रवासाची रंगत जास्तच वाढली होती.
सूर्यास्ताची वेळ जवळ आल्यानंतर वातावरणात वेगाने बदल व्हायला लागला. सूर्यास्तानंतर एकदम काळोख पसरला. त्यातच रस्त्यावर दिवे नव्हते, आजूबाजूला पसरलेली दाट झाडी, त्यामुळे एकदम खूप रात्र झाल्यासारखे वाटत होते. मधूनच बेडकांचा आवाज ऐकू येत होता. पाऊस पडतच असल्याने ओरडणारे बेडूक त्यांच्या लपण्याच्या जागेतून बाहेर येत होते. हे बेडूक रस्त्यावर आले आणि गाडीच्या हेडलाइटचा प्रकाश त्यांच्यावर पडला, की ते जागच्याजागी खिळून राहत. असे बेडूक गाडीखाली चिरडू नयेत म्हणून ड्रायव्हरही जपूनच गाडी चालवत होता. तरिही एखादा बेडूक गाडीखाली चिरडला जात होता. त्यावेळी सगळेजण हळहळायचे आणि वातावरण उगीचच गंभीर बनायचे. मधूनच वाटेत एखादं झाड काजव्यांनी भरलेलं दिसायचं. काजव्यांमुळे ते सगळं झाडच छोटे छोटे दिवे लावून सजवलेल्या ख्रिसमस ट्री सारखं वाटायचं. तेवढाच वातावरणातला तणाव कमी व्हायचा.
सुमारे अर्ध्या तासाने अचानक रस्त्यावरून जाणारी तीनचार माणसं दिसली. त्यांच्या हातात जळणारे पलिते होते. त्यांच्या हातातल्या इतर सामानावरुन ते खेकडे पकडायला निघाले असल्याचं दिसत होतं. एकाएकी एका माणसाच्या हातातल्या पलित्यातला जळणारा कापडाचा तुकडा खाली पडला आणि आमच्या मनातलं गूढ उलगडलं. मनातले संशयाचे कोपरे लख्ख धुवून निघाले होते; आणि परत वातावरण पहिल्यासारखं हलकंफुलकं झालं होतं.
शेवटी डोंगर पोखरून उंदीर निघाला होता तर! म्हणजेच याहीवेळेला आम्ही कोकणात गेलो, पण कोकणातल्या कोणत्याच भुताखेताने आपल्या अस्तित्वाची साधी झलकही आम्हांला दाखवली नाही. निर्विघ्नपणे आमची कोकणातली सहल पार पडली. "तुम्ही एकदा तरी कोकणात याच, म्हणजे तुम्हांलाही कोकणातल्या भूतांचे अनुभव येतील," असं कितीतरी जणांनी ऐकवलं होतं. पण भूतांवर विश्वास नसलेले आम्ही सुखरूप प्रवास करून आणि ‘भूतांवर नसलेला विश्वास अभंग ठेवून’ परत आलो होतो.
- दिनांक ४ सप्टेंबर २००६ रोजी प्रकाशित झालेल्या "मुलुंड ब्रेकफ़ास्ट" या साप्ताहिकातील माझा लेख.

अशा दाट काळोखात, रिपरिपणार्या पावसात आमची गाडी वळणावळणाच्या रस्त्याने जात होती. अचानक एका वळणावरती, बरोबर रस्त्याच्या मध्यभागी काहीतरी जळत असतांना आम्हांला दिसलं आणि क्षणभर सगळ्यांच्याच काळजाचा ठोका चुकला. एखादा छोटा दिवा किंवा पणती असल्यासारखं ते भासत होतं, मात्र त्याची ज्योत हाताच्या वितीपेक्षाही लांब होती आणि भर पावसातही न विझता अधिकच उफाळून जळत होती. आजूबाजूला लोकांची वस्ती दिसत नव्हती. रस्ताही एकदम निर्मनुष्य दिसत होता. ‘मग भर पावसात बरोबर रस्त्याच्या मध्यभागी जळणारी ही ज्योत इथे आली कशी?’ पण फारसा विचार न करता ड्रायव्हरने ज्योतीच्या शेजारून वेगाने गाडी नेली.
पण इतरांचे मात्र तर्कवितर्क चालू झाले. "कोकणात भुताखेतांचं फारच प्रस्थ असतं. कोणीतरी उतारा म्हणून तर तो दिवा रस्त्यावर टाकला नसेल ना? भर पावसातही तो न विझता, उफाळून कसा काय जळत होता?" नाना शंकाकुशंका काढल्यानंतर अचानक कोणीतरी जाहीर केलं, "आपला काही भुताखेतांवर विश्वास नाही बुवा." तर दुसरं कोणीतरी म्हणालं, "भीती वाटत असेल, तर रामरक्षा म्हणा." आणि तो विषय तिथेच संपला. पण सर्वांच्या मनात त्या जळणार्या ज्योतीचं गूढ तसंच होतं. एक विचित्र तणाव सगळ्यांच्या मनावर जाणवत होता.
सुमारे अर्ध्या तासाने अचानक रस्त्यावरून जाणारी तीनचार माणसं दिसली. त्यांच्या हातात जळणारे पलिते होते. त्यांच्या हातातल्या इतर सामानावरुन ते खेकडे पकडायला निघाले असल्याचं दिसत होतं. एकाएकी एका माणसाच्या हातातल्या पलित्यातला जळणारा कापडाचा तुकडा खाली पडला आणि आमच्या मनातलं गूढ उलगडलं. मनातले संशयाचे कोपरे लख्ख धुवून निघाले होते; आणि परत वातावरण पहिल्यासारखं हलकंफुलकं झालं होतं.
झालं होतं फक्त एवढंच, की भर पावसात रात्रीच्या वेळी खेकडे पकडायला असेच कुणीतरी निघाले होते. त्यांच्या पलित्यातलं जळणारं कापड मात्र अगदी बरोबर रस्त्याच्या मध्यभागी गळून पडलं होतं. पलिता पावसातही चांगला पेटता रहावा म्हणून त्याच्यावर भरपूर रॉकेल ओतलं असावं. रॉकेलमुळेच उफाळत्या ज्योतीने ते कापड जळत राहिलं. त्याच्याजवळून आमची गाडी वेगाने गेल्यामुळे जळणारी वस्तू नक्की काय आहे, हे आम्हांला नीट दिसलं नव्हतं, आणि उगीचच मनात शंकांचं काहूर निर्माण झालं होतं.
शेवटी डोंगर पोखरून उंदीर निघाला होता तर! म्हणजेच याहीवेळेला आम्ही कोकणात गेलो, पण कोकणातल्या कोणत्याच भुताखेताने आपल्या अस्तित्वाची साधी झलकही आम्हांला दाखवली नाही. निर्विघ्नपणे आमची कोकणातली सहल पार पडली. "तुम्ही एकदा तरी कोकणात याच, म्हणजे तुम्हांलाही कोकणातल्या भूतांचे अनुभव येतील," असं कितीतरी जणांनी ऐकवलं होतं. पण भूतांवर विश्वास नसलेले आम्ही सुखरूप प्रवास करून आणि ‘भूतांवर नसलेला विश्वास अभंग ठेवून’ परत आलो होतो.
- दिनांक ४ सप्टेंबर २००६ रोजी प्रकाशित झालेल्या "मुलुंड ब्रेकफ़ास्ट" या साप्ताहिकातील माझा लेख.
No comments:
Post a Comment