"मी"
कोण आहे मी?
काय आहे माझा परिचय?
मी इथे कशी आले? कुठून आले? का आले?
या जन्माआधी कुठे होते मी?
काय होता माझा परिचय?
काहीच माहीत नाही.
मागे खूप काळोख दाटला आहे,
पुढेही अंधाराचे घोर साम्राज्य आहे,
तरी मला पुढे जायचंय
आणि.....
आणि मागे वळून बघायचंय!
पण मला जमत नाही मागोवा घेणे,
कारण पायाखालची वाटच झाली आहे अदृश्य!
मागचा मार्ग बंद झाला आहे
आता केवळ पुढचा मार्ग शोधायचा
धडपडत, ठेचकाळत,
अंधारातून मार्ग काढत!
माझं भवितव्य काय?
कशासाठी हे सारे करायचे?
पण विचार करायला देखील अवधी नाही मला
सदैव आहे पुढे पुढेच जायचे.
स्वतःलाच उजळून अंधारलेली वाट उजळायची
आणि दाखवायचा मार्ग सार्यांना!
हेच माझे ध्येय
ते मी साध्य करणार
मागोवा घेणे जमलेच नाही,
पण हे करण्यासाठी, मी पुढे पुढे जातच राहणार, जातच राहणार.
- "किर्ती" वार्षिकात मराठीत प्रसिद्ध झालेली माझी कविता.
****************************************************
"ME"
Who am I?
What is my introduction?
How I came here? From where? Why?
Where was I before my Birth?
What was my introduction?
Nothing known.
It's very dark on back,
Empire of dense dark ahead,
Still I have to go ahead
And.....
And have to see back!
But it's not possible for me to take a review,
Because the way below my feet has become invisible!
The way back is blocked
Now have to search way ahead
Struggling, stumbling,
Finding path in dark!
What is my future?
Why to do it?
But I have no time for thinking
Always have to go ahead and ahead.
Brightening the dark path by lighting up myself
And to show path to all
This is my aim
I will achieve it
Taking review was not possible
But for doing this I will go ahead and ahead, I will go.
- My Marathi poem published in Annual Magazine "Kirti"
*************************************************
माझ्या मनाचे श्वास-निश्वास, वेचले स्पंदनांच्या रूपात! Copyright © Auther of the post - D D
Monday, July 27, 2009
Saturday, July 11, 2009
ब्लॉग टेम्प्लेट बदलतांना.....
ब्लॉगरवर मी जेव्हा माझं अकाऊंट ओपन करून ब्लॉग लिहायला सुरूवात केली, तेव्हा ब्लॉगसाठी ब्लॉगरवाल्यांनी जी काही क्लासिक टेम्प्लेट्स ठेवली होती, ती मला फारशी आवडलेली नव्हतीच. पण मी नव्यानेच ब्लॉगर वापरायला सुरूवात केली असल्याने, ती ठराविक साच्याची टेम्प्लेट्स बदलता येतील का, याचीही मला माहिती नव्हती.
मी माझ्या ब्लॉगवर पोस्ट लिहायला सुरूवात केली, तेव्हाच इतरांचे ब्लॉगही अधूनमधून वाचायला सुरूवात केली. जेव्हा मी नवीन ब्लॉग्जवर व्हिजीट द्यायला जायचे, तेव्हा माझ्या लक्षात आले, की काहीजणांचे ब्लॉग्ज हे ब्लॉगस्पॉटवर असूनही त्या ब्लॉगचे टेम्प्लेट नेहमीच्या क्लासिक टेम्प्लेटपेक्षा वेगळेच आहे. तेव्हा मला वाटले, की कदाचित प्रोफेशनल यूजसाठी त्यांनी पैसे भरून त्या ब्लॉगचे वेगळे अकाऊंट ओपन केले असावे, म्हणूनच त्यांचे टेम्प्लेट असे वेगळे असावे.
पण काही दिवसांपूर्वी दोनतीन ब्लॉग्जवरती "टेम्प्लेट कसे बदलावे?" याच विषयावरच्या पोस्ट लागोपाठ वाचल्याने माझ्या मनातही त्याचे प्रात्याक्षिक करून पाहण्याचा विचार डोकावू लागला. पण माझ्या या मुख्य ब्लॉगवर मी अनेक गॅजेट्स ऍड केलेली असल्याने, मी या ब्लॉगवर प्रयोग करण्याचा विचार बाजूला सारला. शेवटी सरळ नवा ब्लॉग तयार करून त्याच्यावर पहिला प्रयोग करून बघायचा मी निर्णय घेतला.
मग मी टेम्प्लेट्सच्या वेगवेगळ्या वेबसाइट्स ओपन करून बघायला सुरूवात केली. मला अर्थातच लोगो असलेले टेम्प्लेट नको होते. मोठ्या पोस्ट लिहायची सवय असल्याने, पोस्टसाठी जास्त जागा हवी म्हणून फक्त दोन कॉलमचेच टेम्प्लेट हवे होते. (आणि तिथे असलेली बहुतेक टेम्प्लेट्स तीन किंवा चार कॉलमची होती.) त्याशिवाय साइडबार उजव्या बाजूलाच हवा होता. मोठ्या प्रयत्नाने मी मला हवी तशी तीन टेम्प्लेट्स शोधून काढली आणि ती डाऊनलोड करून एक्स्ट्रॅक्ट केली.
नंतर त्यातले "देजा व्ह्यू" नावाचे टेम्प्लेट अपलोड करण्याचा प्रयत्न केला, पण ते काही केल्या अपलोड होईना. मग दोन दिवसांनी पुन्हा "चॉकलेट" नावाचे टेम्प्लेट अपलोड करण्याचा प्रयत्न केला आणि ते मात्र व्यवस्थित अपलोड झाले. पण ब्लॉग पाहिल्यावर मला त्याची ती कलर थीम जरा जास्तच भडक वाटली. मग मी ते टेम्प्लेट डिलीट केले.
नंतर मी "होम" या नावाचे टेम्प्लेट अपलोड करण्याचा प्रयत्न केला. त्या टेम्प्लेट मध्ये मूळ टेम्प्लेटमध्ये नसलेले "रिसेंट कॉमेंट्स, रिसेंट पोस्ट्स, आणि लिंक्स" हे गॅजेट्स होते. त्यामुळे ते काही केल्या अपलोड होईना. मला एच्.टी.एम्.एल्. येत नसल्याने ती गॅजेट्स कशी काढून टाकावी हे माहित नव्हते. पण मला ते टेम्प्लेट फ़ार आवडल्याने तेच ठेवावेसे वाटत होते. मग मी त्याचे एच्.टी.एम्.एल्. स्क्रिप्ट वाचून अंदाजानेच ती तिन्ही गॅजेट्स डिलीट केली. आणि ते टेम्प्लेट व्यवस्थित अपलोड झाले. पण ब्लॉग पाहिल्यावर लक्षात आले, की त्याचा साईडबार इंटरनेट एक्स्प्लोरर मध्ये डिस्प्ले होत नव्हता. मोझिला आणि ऑपेरामध्ये तो व्यवस्थित दिसत होता. मग मी ते टेम्प्लेट डिलीट केले.
मग मी "नेचर" नावाचं छानसं टेम्प्लेट निवडून अपलोड केलं, ते छान दिसत होतं. पण त्याची फिक्स्ड् विड्थ होती, ते अनेक छोट्या छोट्या इमेजेसनी बनलेलं होतं आणि त्याचे पिक्सल्स जास्त असल्याने ब्लॉगच्या स्क्रीनवर आडवा स्क्रॉल बार येत होता. त्यामुळे ब्लॉग वाचायला त्रासदायक होत होता. "त्या टेम्प्लेटचे पिक्सल्स कमी करून त्याची विड्थ कमी करता येईल का?" हा प्रश्न मी अनेकांना विचारला, पण छोट्या इमेजेसनी ते टेम्प्लेट तयार केले असल्याने ते शक्य होणार नाही, असंच उत्तर मला मिळालं. मग मी तेही टेम्प्लेट डिलीट केलं.

पण अजून काही असेच ब्लॉग्ज पाहिल्यावर माझ्या लक्षात आले, की काही वेबसाइट्सवर ब्लॉगसाठी नवीन टेम्प्लेट्स तयार करून ती वापरण्यासाठी उपलब्ध करून दिलेली आहेत. पण या टेम्प्लेट्सच्या हेडरवर ठळकपणे त्या वेबसाइटचा लोगो दिलेला होता आणि त्या टेम्प्लेटच्या थीमचे नावही दिलेले होते. ते टेम्प्लेट कसं वापरायचं हेही मला माहिती नव्हतं. पण असा हेडरवरचा ठळक लोगो असलेले कोणतेही टेम्प्लेट वापरण्याची कल्पना मला फारशी आवडली नव्हतीच. म्हणून मग मी त्याकडे फारसे लक्ष दिले नाही.
पण काही दिवसांपूर्वी दोनतीन ब्लॉग्जवरती "टेम्प्लेट कसे बदलावे?" याच विषयावरच्या पोस्ट लागोपाठ वाचल्याने माझ्या मनातही त्याचे प्रात्याक्षिक करून पाहण्याचा विचार डोकावू लागला. पण माझ्या या मुख्य ब्लॉगवर मी अनेक गॅजेट्स ऍड केलेली असल्याने, मी या ब्लॉगवर प्रयोग करण्याचा विचार बाजूला सारला. शेवटी सरळ नवा ब्लॉग तयार करून त्याच्यावर पहिला प्रयोग करून बघायचा मी निर्णय घेतला.
मग मी टेम्प्लेट्सच्या वेगवेगळ्या वेबसाइट्स ओपन करून बघायला सुरूवात केली. मला अर्थातच लोगो असलेले टेम्प्लेट नको होते. मोठ्या पोस्ट लिहायची सवय असल्याने, पोस्टसाठी जास्त जागा हवी म्हणून फक्त दोन कॉलमचेच टेम्प्लेट हवे होते. (आणि तिथे असलेली बहुतेक टेम्प्लेट्स तीन किंवा चार कॉलमची होती.) त्याशिवाय साइडबार उजव्या बाजूलाच हवा होता. मोठ्या प्रयत्नाने मी मला हवी तशी तीन टेम्प्लेट्स शोधून काढली आणि ती डाऊनलोड करून एक्स्ट्रॅक्ट केली.
नंतर त्यातले "देजा व्ह्यू" नावाचे टेम्प्लेट अपलोड करण्याचा प्रयत्न केला, पण ते काही केल्या अपलोड होईना. मग दोन दिवसांनी पुन्हा "चॉकलेट" नावाचे टेम्प्लेट अपलोड करण्याचा प्रयत्न केला आणि ते मात्र व्यवस्थित अपलोड झाले. पण ब्लॉग पाहिल्यावर मला त्याची ती कलर थीम जरा जास्तच भडक वाटली. मग मी ते टेम्प्लेट डिलीट केले.
नंतर मी "होम" या नावाचे टेम्प्लेट अपलोड करण्याचा प्रयत्न केला. त्या टेम्प्लेट मध्ये मूळ टेम्प्लेटमध्ये नसलेले "रिसेंट कॉमेंट्स, रिसेंट पोस्ट्स, आणि लिंक्स" हे गॅजेट्स होते. त्यामुळे ते काही केल्या अपलोड होईना. मला एच्.टी.एम्.एल्. येत नसल्याने ती गॅजेट्स कशी काढून टाकावी हे माहित नव्हते. पण मला ते टेम्प्लेट फ़ार आवडल्याने तेच ठेवावेसे वाटत होते. मग मी त्याचे एच्.टी.एम्.एल्. स्क्रिप्ट वाचून अंदाजानेच ती तिन्ही गॅजेट्स डिलीट केली. आणि ते टेम्प्लेट व्यवस्थित अपलोड झाले. पण ब्लॉग पाहिल्यावर लक्षात आले, की त्याचा साईडबार इंटरनेट एक्स्प्लोरर मध्ये डिस्प्ले होत नव्हता. मोझिला आणि ऑपेरामध्ये तो व्यवस्थित दिसत होता. मग मी ते टेम्प्लेट डिलीट केले.
मग मी नव्या वेबसाइटवर नवी टेम्प्लेट्स शोधू लागले आणि एका वेबसाइटवर मला मस्त टेम्प्लेट्स सापडली. त्यातले "मेपल लीफ" नावाचं टेम्प्लेट डाऊनलोड करून अपलोड केलं. पण त्यात मेख अशी होती की त्याच्या इमेजेस त्याच्याबरोबर अपलोड होत नव्हत्या, त्या आधी पिकासा किंवा फोटोबकेट अशा ऍप्लिकेशनवर अपलोड करून मग त्या इमेजेसच्या लिंक टेम्प्लेटच्या एच्.टी.एम्.एल्. स्क्रिप्टमध्ये जोडायच्या होत्या. ही सूचना त्यांनी वेबसाइटवर न ठेवता डाऊनलोड केलेल्या फाईलमध्ये ठेवलेली होती. ती मी आधी वाचली असती, तर ते टेम्प्लेट डाऊनलोड केलंच नसतं. त्यात ते काम भलतंच किचकट असल्याने ते सोडून मी पुन्हा एकदा नवीन टेम्प्लेट शोधायला लागले.
मग मी "नेचर" नावाचं छानसं टेम्प्लेट निवडून अपलोड केलं, ते छान दिसत होतं. पण त्याची फिक्स्ड् विड्थ होती, ते अनेक छोट्या छोट्या इमेजेसनी बनलेलं होतं आणि त्याचे पिक्सल्स जास्त असल्याने ब्लॉगच्या स्क्रीनवर आडवा स्क्रॉल बार येत होता. त्यामुळे ब्लॉग वाचायला त्रासदायक होत होता. "त्या टेम्प्लेटचे पिक्सल्स कमी करून त्याची विड्थ कमी करता येईल का?" हा प्रश्न मी अनेकांना विचारला, पण छोट्या इमेजेसनी ते टेम्प्लेट तयार केले असल्याने ते शक्य होणार नाही, असंच उत्तर मला मिळालं. मग मी तेही टेम्प्लेट डिलीट केलं.
मग त्याच वेबसाइटवर मला "अजेंडा" नावाचं टेम्प्लेट मिळालं, ते मात्र व्यवस्थित लोड झालं. त्याचा ऍपीअरन्सही व्यवस्थित होता. मग मी ते माझ्या मुख्य ब्लॉगवर लोड करायचं ठरवलं. ते व्यवस्थित होईल की नाही, देवनागरी स्क्रिप्टचं लेखन ऍक्सेप्ट करेल की नाही, याची शंका होती, तसंच नव्याने मुख्य ब्लॉगवर ऍड केलेले गॅजेट्स त्याच्यावर डिस्प्ले होतील की नाही हेही माहिती नव्हतं. तरिही मी टेम्प्लेट बदलायचं ठरवलं. मग डिफॉल्ट गॅजेटशिवायचे इतर सर्व गॅजेट्स आधी नोटपॅडवर व्यवस्थित कॉपी करून घेतले, आणि मग हे नवीन टेम्प्लेट अपलोड केलं. ते व्यवस्थित अपलोड झालं, मग नोटपॅडवरची सर्व गॅजेट्स नव्याने ऍड केली आणि ती व्यवस्थित ऍड झाली. फक्त एकच प्रश्न होता, कॉमेंट्सच्या लिंकवर क्लिक केल्यानंतर कॉमेंटचा ब्लॉक डिस्प्ले होत नव्हता. मग मी सेटींग्जमध्ये जाऊन आधी कॉमेंट्स डिसेबल केल्या, आणि नंतर कॉमेंट्स पॉपअप विंडो सेट केली. सुदैवाने तो प्रयत्न यशस्वी झाला. आणि अखेर एकदाची मी माझ्या ब्लॉगचे टेम्प्लेट बदलण्य़ात यशस्वी झाले.
Subscribe to:
Posts (Atom)