एखाद्या बांडगुळाप्रमाणे पसरत गेली
ती माझ्या जीवनवृक्षाच्या फांद्यांवर
शोषून घेत माझा जीवनरस सारा
गळा घोटताहेत तिची विषारी मुळे.
कारण फक्त एकच, तिच्यामाझ्यातील समान दुवा
नको होते तिला त्याचे एकत्र सांधणे दोघींनाही,
फक्त स्वतःशीच सांधून घेत त्याला
ती तोडू पाहत होती आमच्यातला दुवा
नष्ट करायचे होते तिला अस्तित्व माझे
निखळवून आमच्यातला एकसंध धागा.
माझ्या दुर्दैवानेही तिलाच साथ दिली,
अन नाकारून मोकळी झाली ती अस्तित्व माझे.
भयव्याकूळ मन माझे वाट 'त्याची' पाहत होते,
पुन्हा सारे सांधण्यासाठी आतुरलेले डोळे होते.
फक्त त्याचीच वाट पाहणार्या माझ्या व्याकुळलेल्या डोळ्यांशी,
स्पर्धा करत होते, तिचे कधीचेच सरलेले निरागस बालपण...
मलाच फक्त ठाऊक होता, त्या मोहक चेहर्यामागचा विखार,
इतरांना दिसणारे निरागस शैशव तिने कधीचे मागे टाकले होते.
जेव्हा मी व्यक्त केल्या माझ्या भावना ब्लॉगवरील,
सुंदर गुलाबी पार्श्वभूमीवर हळूवारपणे....
तेव्हा ती म्हणाली तिच्या मैत्रिणीला कुत्सितपणे,
"पिंक कलर इज टूऽऽऽ गर्लिश!!!"
जेव्हा केली कोणी माझ्या डिजिटल कॅमेर्याची चौकशी, माझ्या स्क्रॅपबुकवर,
तेव्हा तिने लगेच लावून ठेवले तिच्या मोबाईल कॅमेर्याचे फोटो तिच्या अकाऊंटवर.
माझ्या अभिव्यक्तीवर घाला घालून ती, माझ्यावर नजर ठेवत होती,
इंटरनेटवरून माझ्या प्रत्येक गोष्टीशी नकळत स्पर्धा ती करत होती.
झाले तरीही यशस्वी मी त्याच्यापर्यंत पोचण्यात जाहीरपणे
तेव्हा आमचा मौल्यवान ठेवा घेऊन ती पळून गेली अचानकच.
चोरीचा तो ठेवा तिने मिरवला एखाद्या सुवर्णचषकासारखा,
कालांतराने त्या चोरीचा तिने वाढदिवसही साजरा केला.
तेव्हा कचाट्यात पकडले तिला, पण आली 'त्याला' दया
सुटलीही ती तिच्या निरागसतेचे भांडवल करत...
पण तिची सुटका आणि तिने दिलेला जीवघेणा त्रास,
सलतोय आजही मला काट्याप्रमाणे कोंडून माझा श्वास.
मला सलणार्या काट्यावर जणू काही ठोकला आहे,
धारदार लोखंडी खिळा त्याने तिच्या सोडवणूकीने...
मला वाईट याचेच वाटतेय, तिला अजून कळलेच नाही,
तिने काय गुन्हा केला, नी त्याचा पश्चातापही झालाच नाही,
काहीही न झाल्यासारखा तिचा अदृश्य वावर माझ्याभोवती,
ह्ळूहळू पाश आवळत आहे असह्य क्लेशाचे मनाभोवती,
काहीही चूक नसतांना गुन्हेगार मी ठरले,
हे कळेल तिला, तेव्हाच असेल सारे संपले.
पण सध्या तरी एखाद्या बांडगुळाप्रमाणेच
ती पसरत आहे माझ्या जीवनवृक्षावर,
शोषून घेत माझा जीवनरस सारा,
तिच्या विखारीपणाने नासवत आनंद माझा!
-D D

छान लिहिले आहेत. ब्लॉग देखणा आहे
ReplyDeleteधन्यवाद ! हरेकृष्णजी.
ReplyDelete