सकाळी आम्ही साडेनऊला दिल्ली बघण्याकरता बाहेर पडणार होतो. पण आयत्यावेळी बेत बदलला आणि सकाळी लवकर बाहेर पडून अक्षरधाम मंदिर बाहेरून बघायचे असे ठरले. तिथे आम्ही मेट्रो रेल्वेने जाणार होतो. आम्ही चालत मेट्रोच्या स्टेशनला गेलो. तिथे तिकीट म्हणून प्लॅस्टिकचे कूपन मिळाले. हे कूपन फक्त सिंगल जर्नीसाठी होते. तिथे रिटर्न तिकीट मिळत नव्हते. वरती जाण्यासाठी साधे जिने आणि सरकते जिने होते. पुढे आम्हांला मेटल डिटेक्टरमधून जावे लागणार होते आणि स्कॅनरमधून बॅगा स्कॅन करून घ्याव्या लागणार होत्या. ते झाले, की पुढे असलेल्या यंत्रापुढे आपले कूपन ठेवायचे होते. कूपन ठेवले, की यंत्राची छोटी लोखंडी दारे काही सेकंदापुरती उघडली जातात. त्यातून आम्हांला आमचे कूपन बरोबर घेऊन आत जायचे होते. कूपन प्रवास संपेपर्यंत जपून ठेवायचे होते. प्लॅटफॉर्मवर लोकांना बसायला बेंच नव्हते. पण लोकांची फारशी गर्दी नव्हती.
थोड्याच वेळात मेट्रो ट्रेन आली. ट्रेनला गर्दी नसेल, असा विचार करणारे आम्ही ट्रेनमधली गर्दी बघून हबकलो. ट्रेनमध्ये सगळ्यांना चढायला जमेल की नाही या शंकेने आम्ही ती ट्रेन सोडून दिली. ट्रेनमध्ये गर्दी होती, पण चढण्याउतरण्यासाठी लोकांची घाई नव्हती. ट्रेनचे अॅटोमॅटीक दरवाजे बंद होईपर्यंत आम्ही सगळे ट्रेनमध्ये चढू शकलो असतो, हा अंदाज आल्यावर आम्ही निर्धास्त झालो. पुढची ट्रेन आली, तिलाही गर्दी होती, पण आम्ही सगळे ट्रेनमध्ये व्यवस्थित चढलो. ट्रेनमध्ये "पुढचे स्टेशन कोणते आहे, त्यासाठी कोणत्या बाजूचे दरवाजे उघडले जातील" याच्या सूचना स्पीकरवरून दिल्या जात होत्या. त्याशिवाय दाराच्या वरच्या बाजूला ट्रेनचा मार्ग आणि स्टेशन्सची नावे दिलेली होती. जी स्टेशन्स पार केली आहेत, त्यांच्या नावावर लाल दिवे लुकलुकत होते. जे पुढचे स्टेशन यायचे आहे त्याच्या नावावर हिरवा दिवा लुकलुकत होता. स्टेशन आल्यावर लोक अगदी सावकाश उतरत होते. मुंबईसारखी स्टेशन येण्याच्या आधीच उतरण्याची घाई लोकांना नव्हती. आम्ही अक्षरधाम स्टेशनला उतरलो.

स्टेशनमधून बाहेर पडतांना पुन्हा समोर यंत्र होते. आता त्या यंत्रावर कूपन ठेवून दार उघडले, की यंत्राच्या खाचेत कूपन आत टाकायचे होते आणि मगच दारातून पटकन बाहेर पडायचे होते. यात जर काही घोटाळा झाला, तर रेल्वेच्या माणसांनी मदत केल्याशिवाय बाहेर पडणे शक्य नव्हते. अखेर एकदाचे सगळे स्टेशनबाहेर आलो. तिथून अक्षरधाम मंदिर जवळच आहे. तिथे चालत गेलो आणि मंदिराचे बाहेरूनच दर्शन घेतले. अक्षरधाम मंदिर आतून बघायला चार तास लागतात असे ऐकले होते. बाहेरूनही मंदिराचा परिसर तेवढा भव्य आहे हे जाणवत होते. तिथून परत आम्ही मेट्रो रेल्वेचा प्रवास करून हॉटेलवर आलो आणि सामान घेऊन हॉटेल सोडले.
आमच्या बस ड्रायव्हरने आम्हांला लाल किल्ल्याच्या परिसरात चांदणीचौकाजवळ सोडले. सकाळी काही नाश्ता न केल्याने आता चांगलीच भूक लागली होती. त्यामुळे आम्ही आमचा मोर्चा एका हॉटेलकडे वळवला. तिथे दुसर्या व्यक्तीने मागवलेले पदार्थ वेटरने आमच्या टेबलावर आणून ठेवले, आमच्या ऑर्डरपैकी एक पदार्थ आलाच नाही. शेवटी मॅनेजरशी बोलल्यावर एकदाचे सर्व पदार्थ टेबलावर आले. या गोंधळात बराच वेळ गेला. तिथून मग आमचा मोर्चा पेठा आणि इतर मिठाई खरेदी करण्यासाठी पुढच्या प्रसिद्ध दुकानाकडे वळला. या दुकानात बरीच गर्दी होती. त्यामुळे सर्वांची खरेदी होईपर्यंत सूर्य मध्यान्ही आला होता. आता या भर दुपारच्या उन्हात लाल किल्ला हिंडण्याची आमची इच्छा नव्हती. त्यामुळे लाल किल्ल्याचे बाहेरूनच दर्शन घेऊन आम्ही काहीजण बसमध्ये परत आलो. बाकीचे लाल किल्ला आतून बघायला गेले.
लाल किल्ला बघून आमचे सहप्रवासी परत आले. आता कोणालाच दुपारच्या या उन्हात दिल्लीत हिंडायचं नव्हतं. राजधानी एक्स्प्रेस संध्याकाळी साडेचारला सुटणार होती. मग ड्रायव्हरने आम्हांला राष्ट्रपती भवनाची मागची बाजू, राजपथ, मंत्र्यांचे बंगले हा सगळा परिसर फिरवून बसमधून दाखवतो, म्हणून सांगितले. आम्ही होकार दिला. तो सगळा परिसर पाहत आम्ही १, सफदरजंग रोड या बंगल्यापाशी आलो. याच बंगल्याच्या आवारात इंदिरा गांधींची हत्या झाली होती. आता त्या बंगल्याला इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या स्मारकात रुपांतरीत केले आहे. तिथे ड्रायव्हरने बस थांबवली आणि आम्ही ते स्मारक बघायला गेलो. मेटल डिटेक्टरमधून आत गेल्यावर पोलिसांनी आमच्या पर्स चेक केल्या. ज्यांच्याजवळ पाण्याच्या बाटल्या होत्या, त्यांना त्या बाहेरच ठेवाव्या लागल्या.
आतमध्ये इंदिरा गांधींचे फोटो आणि त्यांच्याबद्दलच्या आलेल्या वर्तमानपत्रातल्या बातम्यांचे मोठे केलेले फोटो भिंतीवर लावले होते. त्याशिवाय त्यांची हत्या झाली, त्या दिवशी त्या जी साडी नेसल्या होत्या, ती साडी, चपला, खांद्यावरची झोळी या वस्तू एका शोकेसमध्ये मांडून ठेवल्या होत्या. पुढे एका दालनात इंदिराजींना लग्नाच्या वेळी जवाहरलाल नेहरूंनी स्वतःच्या हाताने सूत कातून त्याची तयार केलेली जी साडी दिलेली होती, ती साडी आणि विवाहविधीच्या वेळी वापरली गेलेली भांडी इत्यादी वस्तू ठेवल्या होत्या. अजून पुढे इंदिराजींना मिळालेले पुरस्कार, त्यांचा वॉर्डरोब, त्यांची रूद्राक्षमाळ हे एका दालनात बघायला ठेवले होते.
पुढच्या दालनात राजीवजींची भलीमोठी वैयक्तिक लायब्ररी होती. त्यापुढच्या दालनात राजीव गांधीचे फोटो आणि त्यांच्याविषयीच्या बातम्यांचे फोटो भिंतीवर लावलेले होते. त्याचबरोबर राजीवजींचे पायलट लायसन्स, त्यांचा विविध यंत्रांनी भरलेला टूल बॉक्स हेही तिथे ठेवलेले होते. पुढे एका दालनात राजीवजींची हत्येच्या वेळी घातलेली आणि बॉम्बस्फोटाने चिंध्या झालेली पॅंट, त्यांचे बर्यापैकी शाबूत असलेले बूट आणि मोजे एका शोकेसमध्ये ठेवलेले होते. त्याच्यापुढे राजीव गांधींची बेडरूम होती. तिथून बाहेर आवारात आल्यानंतर इंदिराजींची जिथे हत्या झाली तो मार्ग दिसला. तो मार्ग काचेच्या प्लेट्सनी झाकला होता. जिथे इंदिराजी कोसळल्या होत्या, तिथे एक चादर ठेवून, त्यावर मोठी पारदर्शक काच लावली आहे. हे सारे निवांतपणे बघण्यासारखे आहे. पण त्या दिवशी तिथे खूप गर्दी असल्याने ते नीट बघता आले नाही. आणि आम्हांला राजधानी एक्स्प्रेस पकडायची असल्याने आम्ही तिथून घाईने निघालो.
तिथून आम्ही बसने थेट स्टेशनला गेलो. मेटल डिटेक्टरमधून आत जाऊन आणि सामान स्कॅनरने स्कॅन करून आम्ही पूल चढायला लागलो. आम्ही प्लॅटफॉर्मवर पोहोचलो, तेव्हा राजधानी प्लॅटफॉर्मला लागलेली होती. आमचा डबा खूप पुढे होता. आम्ही आमचा डबा शोधला आणि डब्यात चढलो. थोड्या वेळाने गाडी चालू झाली. आमचा परतीचा प्रवास आता चालू झाला होता. पुन्हा राजधानीमधले संध्याकाळचा नाश्ता, चहा, सूप, जेवण ह्याचे चक्र सुरू झाले. त्या दिवशी मात्र सगळे दमले असल्याने जेवण झाल्यावर लगेच निद्राधीन झाले. सकाळी नाश्ता झाल्यावर आम्हांला मुंबईचे वेध लागले होते. प्रवासाचा शीणही जाणवत होता. मुंबई सेंट्रल स्टेशनला उतरलो आणि आमच्या सवयीच्या असलेल्या लोकल ट्रेनमध्ये बसलो. खूप बरे वाटले. घरी पोहोचल्यावर ही सुखद ट्रीप संपल्याची जाणीव झाली आणि आमचे रूटीन लाईफ चालू झाले.

सिमला, कुलू, मनाली ट्रीप भाग ९

2 comments:
malahi bhatakaya phar awadate. apan kadhi kolhapurla yenar aslyas bagha
काही वर्षांपूर्वी दोनतीनदा कोल्हापूरला धावती भेट दिली होती, पण एकदा वेळ काढून कोल्हापूरचा परिसरही बघायचा आहे. बघू या कधी जमतंय ते!
Post a Comment