पॅराग्लायडींगवाल्यांनी आम्हांला थोडे चालत नेले आणि पुढे रस्त्यावर उभ्या असलेल्या त्यांच्या जीपमध्ये बसायला सांगितले. त्यांची चार माणसं जीपच्या वरच्या बाजूला धरून जीपच्या बाहेरच्या बाजूलाच उभी राहिली आणि जीप चालू झाली. ती चार माणसं जीपमध्ये बसण्याऐवजी अशी विचित्रपणे बाहेर का उभी आहेत याचा मला बोध होईना. त्यात माझ्याकडे मोबाईल नव्हता. खिशात मोजकेच पैसे होते. ही माणसं आपल्याला बरोबर नेत आहेत ना, याची खात्री करून घेण्यासाठी मी त्यांना पुन्हापुन्हा आपण कुठे जात आहोत हे विचारून घेत होते. अखेर एका उंच टेकडीपाशी येऊन जीप थांबली आणि आम्ही खाली उतरलो. वरती पॅराग्लायडिंग करणारी माणसं दिसत होती. जीपच्या टपावर पॅराशूट्स बांधलेले होते, ते उडून जाऊ नयेत म्हणून ते व्यवस्थित धरून ती माणसं जीपच्या बाहेरच्या बाजूलाच उभी होती. त्या माणसांनी आम्हांला ती टेकडी चढून वरती यायला सांगितले. आणि ती माणसं खूप भरभर टेकडी चढून वरती गेली.
आजूबाजूचे सगळे हौशी लोक भरभर टेकडी चढून वर जात होते. मला जरा थोडी चढण चढली की धाप लागते. त्यात इथे विरळ हवेत ही उंच टेकडी चढायची होती. चढ कठीण नव्हता. पण थोडं चढलं तरी पुष्कळ धाप लागत होती. मी प्रत्येक ठिकाणी थांबून पाचपाच मिनिटं विश्रांती घेत होते. अखेर आम्ही पॅराग्लायडिंग होत होतं, तिथपर्यंत येऊन पोहोचलो, तर आमच्यापैकी तिसरा मेंबरही तयार होऊन पॅराग्लायडिंगला आला होता. इकडे मी टेकडीवर चढत असतांना आमचे बाकीचे सहप्रवासी खालच्या पठारावरून माझं निरिक्षण करत होते. माझ्या उठून दिसणार्या केशरी रंगाच्या ड्रेसमुळे मी सहजपणे त्यांच्या नजरेत भरत होते. मी पॅराग्लायडिंग करेन की अर्धवट सोडेन यावर त्यांची चर्चा चालू होती. जर मी पॅराग्लायडिंग केलं, तर आमच्या सहप्रवाशांपैकी कोणीही ते सहज करू शकेल, असा त्यांचा विश्वास होता. फक्त तब्येत बरी नसल्यानेच ते सगळे खाली थांबले होते. बरे असते तर अजून चारपाचजणांनी निश्चित पॅराग्लायडिंग केलं असतं.
आम्ही तिघांनीही एकामागोमाग एक पॅराग्लायडींग करायचं ठरवलं. पॅराग्लायडिंगवाल्याने पॅराशूट बांधण्याआधी माझ्याकडून आमचे पैसे घेतले. खाली उतरल्यानंतर त्यांची माणसं पॅराशूट गुंडाळण्याच्या घाईत असतात, पैसे घेण्यात गडबड होऊ शकते म्हणून ते आधीच पैसे घेतात असंही स्पष्टीकरण त्यांनी दिलं. सगळ्यात आधी मी पॅराग्लायडिंग करणार होते. त्यांनी मला सेफ्टी जॅकेट आणि हेल्मेट घालायला देऊन ते व्यवस्थित बांधलं. नंतर एक पॅराशूट जोडलं. माझ्याबरोबर माझ्यापाठीमागे त्यांचा एक एक्स्पर्ट सेफ्टी जॅकेट घालून तयार होता. त्यालाही त्याच पॅराशूटला जोडले गेले. नंतर त्या पॅराशूटच्या दोर्या व्यवस्थित पसरवल्या गेल्या. मग ते पॅराशूट अर्धवट उघडलं गेलं. त्याच वेळी माझ्या दोन बाजूला उभे असलेल्या माणसांनी माझे हात पकडले. त्यांनी इशारा दिल्याबरोबर मी त्यांच्याबरोबर टेकडीच्या उतारावरून धावायला लागले. पॅराशूट वार्याने पूर्ण फुललं आहे याची खात्री झाल्यावर त्यांनी माझे हात सोडून दिले. माझ्या मागे असणार्या एक्स्पर्टने त्याच्या हातातले ब्रेक हॅंडल्स ओढून पॅराशूटला योग्य दिशा दिली. पॅराशूट नीट उडायला लागल्यानंतर त्याने मला जॅकेटपाठीमागे जोडलेल्या सॅकमध्ये बसायला सांगितलं. मी किंचित पाठीमागे झुकल्याबरोबर त्या सॅकमध्ये बसले गेले. त्यानंतर त्याने काही सेकंद त्या बर्फाच्या पठारावरून गिरक्या घेतल्या आणि अलगद खाली लॅंडींग केले.
मला लॅडींगची सवय नसल्याने मी बर्फात बसण्याऐवजी आडवी झाले आणि त्याच क्षणी एका फोटोग्राफरने माझा फोटो काढला. माझे बेल्ट सोडवेपर्यंत मी उभीही राहू शकत नव्हते. मी उभी राहिल्यावर तो फोटोग्राफर माझ्याकडे आला आणि त्याने माझा फोटो मला दाखवला. माझ्या अशा स्थितीत लॅंडींग केलेल्या फोटोत मला फारसे स्वारस्य नव्हते. शिवाय "आपण तो फोटो घेतला नाही, तर ते लोक तो फोटो डिलीट करून टाकतात," हे त्याने सांगितल्याने मी त्याला फोटो नको म्हणून सांगितले. पाठीमागून आलेल्या दोन्ही मेंबर्सनीही फोटो नकोत म्हणून घेतले नाहीत. मग आम्ही तिथून थोडे अंतर चालून गेलो आणि एक पॅराग्लायडिंगवाला धावत आला, "मॅडम तुम्ही पैसे दिलेले नाहीत, आधी पैसे द्या" म्हणून पैसे मागायला लागला. मी त्याला सांगितले, की "मी पैसे दिलेले आहेत. तुमच्या टेकडीवरच्या माणसाला फोन लाव. मी त्याच्याशी बोलते." त्याने फोन लावला. पलिकडच्या माणसाशी मी बोलायला लागल्यावर, माझ्या आवाजावरून त्याच्या लक्षात आलं, की पैसे न देणारी मॅडम दुसरी कोणी तरी आहे.

मग थोडे पुढे गेल्यावर आम्ही स्लेज गाडीतून एक फेरफटका मारला. तोपर्यंत बाकीचे सारे बसकडे निघाले होते. मग सातआठ फोटो काढून आम्हीही बसकडे निघालो. बस थांबली होती तिथे गाडी वळवायला पुरेशी जागा नव्हती. आमच्या पुढची गाडी हलल्याशिवाय ड्रायव्हर गाडी पुढेमागे घेऊ शकत नव्हता. पण पुढची छोटी कार हलली. तिच्यामागे तीनचार गाड्या गेल्यानंतर पुढच्या गाड्यांना जरा थांबायला सांगून आमच्या ड्रायव्हरने बस थोडी तिरक्या दिशेत पुढे घेतली आणि परत तिरकी मागे घेतली. पुन्हा जास्त तिरकी करून पुढे घेतली, परत मागे घेतली. अशाप्रकारे ज्या रस्त्यावर वळण घ्यायला पुरेशी जागा नाही, तिथेच ड्रायव्हर कौशल्याने बस वळवत होता. बस वळवतांना थोडी जरी चूक झाली असती, तर बस थेट खाली दरीत कोसळली असती. पण काहीही इजा न होता, ड्रायव्हरने सुरक्षितपणे बस उलट्या दिशेला वळवली आणि जसा मार्ग मोकळा होईल, तशी पुढे काढली.
परततांना अर्धापाऊण तास आमची बस ट्रॅफीक जॅममध्ये अडकली होती. पण रस्ता मोकळा झाल्याबरोबर बस वेगाने पुढे निघाली. आता सगळ्यांनी संरक्षक पोषाख काढून ठेवले. आणि कोणाच्या खिशात चुकून काही चीजवस्तू राहिली नाही ना, हे चेक केले. नंतर ड्रायव्हरने जेवण्यासाठी एका हॉटेलपाशी गाडी थांबवली. फक्त दोघे जण जेवले, बाकीच्यांनी लस्सी घेतली, ज्यांना बरे वाटत नव्हते, त्यांनी लेमन वॉटर घेतले. वाटेत भाड्याने घेतलेले कपडे परत करून आम्ही सोलांग व्हॅलीला गेलो. सोलांग व्हलीला हॉर्स रायडिंग करण्याची आणि रोप वेने जाऊन पॅराग्लायडिंग करण्याची (प्रत्येकी चारशे रूपये) सोय आहे. तिथे पार्किंगला जागा न मिळाल्यामुळे ड्रायव्हरने बस लांबच उभी केली होती. तिघेचौघे उत्साही होते, ते भराभर चालत तिकडे गेले. आम्ही तिघे हळूहळू चालत पाठीमागून येत होतो. बाकीचे गाडीतच थांबले होते. अगदी जवळ गेल्यानंतर पुढे पायर्या चढून जायच्या होत्या. माझ्याबरोबरच्यांनी पायर्या चढून वरती येणार नाही, म्हणून सांगितले. मलाही वर जाण्याचा फारसा उत्साह नव्हता. मग आम्ही बसकडे परत फिरलो. बाकीचे परत यायला वेळ होता. ते येईपर्यंत तिथे पाईनच्या झाडाखाली पाईनचे कोन (पुष्पगुच्छ) पडले होते, त्यातला एक चांगला, न तुटलेला कोन मी घरी नेण्याकरता शोधून घेतला. तिथून मग आम्ही हॉटेलवर आलो.
हॉटेलवर तास-दीडतास विश्रांती घेतली आणि एकमेकांशी गप्पा मारल्या. संध्याकाळी सात वाजता आम्ही तिथल्या बाजाराचा फेरफटका मारायला निघालो. असेच एका दुकानात शिरलो. दुकानदार गोड बोलून सर्वांना काही ना काही दाखवत गुंतवून ठेवत होता. सगळ्यांनी त्याच्याकडून काही ना काही खरेदी केली. खरेदी करून बाहेर पडेपर्यंत नऊ वाजून गेले होते. याच दुकानदाराने आम्हांला सांगितले, की "तिथे प्लॅस्टीकच्या पिशव्यांवर फक्त कागदोपत्रीच नव्हे तर प्रत्यक्षातही बंदी आहे आणि ही बंदी पंधरा वर्षांपासून आहे." हे ऐकून हिमाचल प्रदेशमधल्या लोकांचे मनापासून कौतुक वाटले. दुकानदार आमच्याशी मोडक्यातोडक्या मराठीत बोलत होता. हिमाचल प्रदेशात सर्वात जास्त पर्यटक महाराष्ट्रातून येतात, त्यानंतर नंबर लागतो तो बंगाल्यांचा, तर तिसरा नंबर गुजराथी लोकांचा आहे. त्यामुळे आम्ही मराठीतून काही बोललो, तरी आमच्या भावना हिमाचली लोकांपर्यंत पोहोचत होत्या. महाराष्ट्रात मराठीचं काय होईल ते माहिती नाही, पण हिमाचली लोक मात्र मोडकीतोडकी मराठी बोलायला शिकले आहेत. गंमत म्हणजे आत्तापर्यंतच्या प्रवासात आम्हांला भेटलेले इतर सर्व पर्यटकही मराठीच होते.
तिथून आम्ही हॉटेलवर गेलो, तेव्हा जेवण तयार होते. सगळे दमलेले असल्याने जेवण झाल्यावर लगेच निद्राधीन झाले. दुसर्या दिवशी मनालीतच हिंडायचे होते, त्यामुळे आम्ही जरा उशीरा निघणार होतो. सकाळी उठल्यावर आम्ही सावकाश आवरून, ब्रेकफास्ट आटोपून बसमध्ये जाऊन बसलो. आमच्या सहप्रवाशांना बरोबर घेतल्यावर बस वशिष्ठ मंदिराकडे निघाली. वशिष्ठ मंदिरही एका छोट्या टेकडीवर वसलेले आहे. इथे छोट्या कार वरपर्यंत जातात, पण बस वरपर्यंत येऊ शकत नसल्याने टेकडीच्या पायथ्याशीच थांबली होती. आम्ही ती टेकडी चढत वर निघालो होतो. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना छोटीछोटी दुकाने आहेत. त्या दुकानातले विक्रेते "चिंगु" बघा, म्हणून मागे लागले होते. चिंगु परत येतांना बघू असं त्यांना सांगून आम्ही मंदिराकडे निघालो.
सिमला, कुलू, मनाली ट्रीप भाग ६

No comments:
Post a Comment