Saturday, May 18, 2013

गोष्ट राजूची (बालकथा)


     राजू खूपच बारीक मुलगा होता. सगळे त्याला काडीपहिलवान म्हणून चिडवत असत. त्याला नेहमी वाटायचं की चांगलं जाडंजुडं व्हावं. त्याकरता तो रोज डॉक्टरांनी दिलेल्या व्हिटॅमिन्सच्या गोळ्या घ्यायचा. गोळ्यांबरोबर पोळीभाजी पण खायला हवी. असं डॉक्टर सांगायचे. राजूला भाज्या खायला अजिबात आवडत नव्हतं. त्यामुळे गोळ्या घेऊनही राजू बारीकच राहिला होता.

     आज तो शाळेत गेला असताना जाड्याजुड्या चिंटूने त्याला काडीपहिलवान म्हणून चिडवलं होतं आणि एक जोरदार ठोसा पण ठेवून दिला होता. त्या ठोशाने त्याचं सगळं अंग ठणकत होतं. पण बारीकसा राजू चिंटूला काहीच करू शकला नव्हता. शाळेतून घरी आल्यावर चिंटूला कशी अद्दल घडवावी याचाच तो विचार करत होता.

     जेवण झाल्यावर त्याला दुपारच्या वेळी झोप यायला लागली. तेवढ्यात आई त्याला म्हणाली, "राजू, हे शंभर रुपये ठेव. थोड्या वेळाने आपला दूधवाला येईल त्याला दे. मी तुझ्याकरता चिवडा करुन ठेवते. मला माझ्या कामातून उठवू नकोस." राजूने पैसे खिशात ठेवले आणि तो झोपला.

     ठक्‌ठक्‌, ठक्‌ठक्‌ दाराची कडी वाजत होती. राजू उठला. दूधवाला आला असणार म्हणून त्यानं दार उघडलं. दारात कोणीतरी वेगळाच माणूस उभा होता. तो राजूला म्हणाला, मी मेडिसन कंपनीमधून आलोय. आमच्या कंपनीने काही गोळ्या तयार केल्या आहेत. लाल बाटलीतल्या गोळ्या घेतल्यावर माणूस उंच आणि जाडा होतो. निळ्या बाटलीतल्या गोळ्या घेतल्यावर माणूस बुटका आणि बारीक होतो. तुझ्यासारख्या मुलाला या गोळ्या घ्यायलाच हव्यात.

     काय? खरंच का या गोळ्या घेतल्यावर माणूस जाड होतो आणि तेही पोळीभाजी खाल्ल्याशिवाय? राजूने आश्चर्याने विचारलं. होय. एक वर्षाची गॅरंटी आहे. मग मला ह्या गोळ्या घेतल्याच पाहिजेत. पण आई रागवेल. ह्याची किंमत पण जास्त असेल. राजू म्हणाला. तुझ्यासारख्या मुलाने ह्या गोळ्या घेतल्या तर आई अजिबात रागवणार नाही. दोन्ही बाटल्यांची किंमत फक्त दहा रुपये आणि चुकून एखाद्या बाटलीतला गोळ्यांचा डोस जास्त झाला तर दुसर्‍या बाटलीतल्या गोळ्या खायच्या. त्या माणसानं सांगितलं.

     राजूने उत्सुकतेनं दूधवाल्याच्या पैशांतून दहा रु. देऊन त्या बाटल्या विकत घेतल्या. आईला अचानक आश्चर्यचकित करायचं ठरवून त्याने लाल बाटलीतल्या पाच-सात गोळ्या भराभर खाऊन टाकल्या. आणि हे काय? एकदम त्याचं डोकं ठणकन्‌ कशाला तरी आपटलं. त्याने इकडेतिकडे पाहिलं, त्याचं डोकं छताला टेकलं होतं. त्याचा आकार अजूनही वाढत होता. राजू आता त्या खोलीत मावत नसल्याने त्याच्या धक्क्याने घराची एक भिंत कोसळून खाली पडली. तो आवाज ऐकून राजूची आई धावत बाहेर आली. राजूला बघून, भूत, भूऽऽत धावा, वाचवा, असं ओरडायला लागली.

     अगं आई, मी आहे तुझा राजू. असं त्याने सांगायचा प्रयत्न केल्यावर भूत बोलतंय हे बघून तिला चक्कर आली आणि ती सोफ्यावर कोसळली. तेवढ्यात शेजारच्या काकू आणि दोघंतिघंजण आपल्या घराकडे येत आहेत हे बघून राजू तिथून बाहेर पडला. त्याला बघून सगळे घाबरले. राक्षस समजून काही लोक त्याला दगड मारायला लागले. ते दगड राजूला फुलासारखे वाटत होते. आता बघतो त्या चिंटूला. शाळेत मला मारतो काय? पहा आता. असं म्हणून राजू चिंटूच्या घराच्या दिशेने चालायला लागला.

     चिंटू गॅलरीत चित्र काढत बसला होता. राजू त्याच्या घराजवळ आला. त्याने आपले लांब हात गॅलरीत घालून चिंटूला उचललं. चिंटू घाबरला, सोड मला. कोण आहेस तू? मला खाऊ नको. असं ओरडायला लागला. यापुढे शाळेतल्या राजूला त्रास देशील? मारशील त्याला? राजूने रागाने विचारलं. नाही, नाही, सोड मला. चुकलं माझं. चिंटू त्याला विनवायला लागला. राजूने चिंटूला अलगद चेंडूसारखं उडवलं. तो त्याला झेलणार इतक्यात एका हत्तीने चिंटूला सोंडेत पकडलं. तो गावात आलेल्या सर्कसचा हत्ती होता. राजूने चिंटूला तिथून उचलून त्याच्या घराच्या गच्चीवर ठेवून दिलं.

     त्या हत्तीने समोरच्या एका दुकानातून भलं मोठं आईस्क्रिमचं भांडं उचललं आणि राजूच्या हातात दिलं. आईस्क्रिम खात खात राजू हत्तीवर बसला आणि घरी यायला निघाला. उंदरावर बसलेल्या गणपतीसारखा तो दिसत होता. घरासमोर आल्यावर त्याच्या लक्षात आलं की, आई त्याला आता ओळखणार नाही. पुन्हा पूर्वीसारखं व्हायला हवं. बागेत उभं राहून त्याने निळ्या बाटलीतल्या पाच-सात गोळ्या काढल्या आणि पटकन खाऊन टाकल्या. पण डोस जरा जास्तच झाला होता. आता राजू एकदम छोटा झाला होता. इतका छोटा की त्याला बागेतली गवताची पाती मोठ्या झाडांसारखी वाटत होती. त्याचं घर तिथून खूप दूर होतं. एखाद्या भल्यामोठ्या पर्वतासारखं ते वाटत होतं. राजूला आता खूप भीती वाटू लागली. त्याच्या हातातल्या बाटल्या पण खूप मोठ्या झाल्या होत्या. तो त्यांच्याखाली चेंगरलाच असता. त्याने कशाबशा त्या बाटल्या त्याच्यापासून दूर जमिनीला टेकवल्या. आता त्या बाटल्यांमधल्या गोळ्यांपर्यंत तो कधीच पोचू शकणार नव्हता आणि नेहमीसारखा होऊ शकणार नव्हता.

     आईला न सांगता त्या गोळ्या विकत घेतल्याचा राजूला आता पश्चाताप होत होता. एवढ्यात त्याला एक जेटविमान आणि एक हेलिकॉप्टर त्याच्या दिशेने येताना दिसले. ते जवळ आल्यावर त्याला कळलं की जेटविमान म्हणजे एक फुलपाखरु आणि हेलिकॉप्टर म्हणजे एक मधमाशी होती. मला जरा मदत कराल का? राजूने त्यांना विचारलं. कोण बरं हा प्राणी? पूर्वी कधी पाहिला नव्हता इथे. मधमाशी फुलपाखराला म्हणाली. तिने सगळ्या प्राण्यांना हा नवीन प्राणी बघायला बोलावले. तिथे उंदीर, झुरळ, सरडा, पाल, मुंग्या, माशा, फुलपाखरं आणि वेगवेगळे पक्षी जमा झाले. ते सगळे राजूपेक्षा मोठे आणि भयानक दिसत होते. ह्या नवीन प्राण्याला निरखून पाहत होते.

     मी काही प्राणी नाही. मी त्या समोरच्या घरातला राजू आहे. राजूने सांगितलं. हाच नेहमी आम्हांला पकडतो. फुलपाखरु म्हणालं. हाच नेहमी आम्हांला दगड मारतो. पक्षी म्हणाले. मारा त्याला. सगळे ओरडले. मला मारु नका. मी चुकलो. पुन्हा असं करणार नाही. राजू ओरडला. पण सगळेजण त्याला मारायला येतच होते. तो गोळ्यांच्या बाटल्यांकडे धावला. पण त्याचे हात गोळ्यांपर्यंत पोचत नव्हते. वाचवा तो जोरात ओरडला.

     काय झालं राजू? स्वप्न पडलं की काय? आई त्याला विचारत होती. तो घरातच होता. शंभर रुपये त्याच्या खिशात व्यवस्थित होते. म्हणजे हे सगळं स्वप्न होतं तर! आता यापुढे मी कधीही नुसत्या गोळ्या खाणार नाही. त्याऐवजी सगळ्या भाज्या खाईन. रोजचं सगळं जेवण जेवेन. राजूने मनाशी निश्चय केला.

नोंद - (ढिश्यांव ढिश्यांव कल्पनारम्य विशेषांक १९९८ मध्ये प्रकाशित झालेली माझी ही बालकथा.)

Sunday, January 6, 2013

चिंटुकला कोळी - मॅक्रो फोटो / Tiny Spider - Macro photo

चिंटुकला कोळी - मॅक्रो फोटो १ / Tiny Spider - Macro photo 1

चिंटुकला कोळी - मॅक्रो फोटो २ / Tiny Spider - Macro photo 2


Friday, December 21, 2012

सदाबहार गुलाबी जास्वंद

     मागच्या वर्षी एप्रिल महिन्यात भर दुपारच्या वेळी नगर जिल्ह्यातल्या एका बागायती शेताला भेट देण्याचा योग आला. शेतात चिकूची झाडे लावली होती आणि झाडांच्या मधल्या मोकळ्या जागेत गहू लावला होता. गहू कापणीला आल्याने त्याची कापणी चालू होती. पण भर दुपारची वेळ असल्याने तिथे उभे राहून ते दृश्य पाहण्यात अजिबात मौज वाटत नव्हती. उन्हाने जीवाची अशी काहिली होत असतांनाच अचानक शेतातल्या पायवाटेच्या टोकाकडे लक्ष गेले, तिथे एक जास्वंदीचे झाड फुलांनी लगडून गेले होते, त्याची गुलाबी फुले वार्‍याने हलत होती. ते नेत्रसुखद दृश्य पाहून सारा शीण दूर पळाला. 


     ते जास्वंदीचे झाड माझ्या मनात अगदी भरले होते, इतके की तिथून निघतांना मी त्या झाडाच्या फांद्या घरी लावण्यासाठी मागून घेतल्या. शेतमालकांनी माळ्याला हाक मारल्यावर त्यानेही तत्परतेने झाडाच्या फांद्या कापून त्यांचा जुडगा बांधून दिला. या फांद्यांबरोबर त्याने मिरची जास्वंदीच्याही काही फांद्या दिल्या होत्या. घरी पोहोचल्यावर दुसर्‍या दिवशी मी त्या फांद्या दिसेल त्या रिकाम्या कुंडीत रोवून दिल्या.

     गॅलरीच्या बॉक्स ग्रीलमध्ये मी माझ्या झाडांच्या कुंड्या ठेवलेल्या आहेत. पूर्वी गॅलरीच्या अरूंद बाजूकडून घरात भरपूर ऊन येत असे, तेव्हा तिथे गुलाब लावले होते. पण नंतर आजूबाजूला झालेल्या बांधकामामुळे तिथून येणारे ऊन अगदीच कमी झाले. आता फक्त गॅलरीच्या रूंद बाजूकडून सकाळी आठ ते नऊ या वेळात थोडेफार ऊन येते आणि दुपारी साडेतीन ते पाच या वेळात रस्त्यापलिकडच्या बाजूच्या समोरच्या इमारतीच्या काचांवरून परावर्तित होऊन थोडा सूर्यप्रकाश झाडांवर पडतो. इतक्या कमी सूर्यप्रकाशामुळे आणि गॅलरीची रुंद बाजू अगदी रस्त्यासमोर येत असल्याने तिथल्या कुंड्यांत मी फक्त शोभेची झाडेच लावलेली होती. आता तिथल्याच काही रिकाम्या कुंड्यांत मी या जास्वंदीच्या फांद्या लावल्या होत्या.

     इतके कमी ऊन मिळत असूनही गुलाबी जास्वंदीच्या दोन फांद्या आणि मिरची जास्वंदीच्या (न उमलणारी लाल कळीची जास्वंद) तीन फांद्या छान रुजल्या, वाढल्या आणि बघता बघता ग्रीलच्या बाहेरही गेल्या. आता त्यांना ग्रीलच्या आतही आणि बाहेरही कळ्या येतात. गुलाबी जास्वंद आता छान बहरली आहे, या सप्टेंबर महिन्यापासून दर आठवड्याला दोनदा किंवा तीनदा तरी तिची फुले मितच आहे. फक्त पावणेदोन वर्षांत गुलाबी जास्वंदीचे खोड पाच फुटांपेक्षाही जास्त उंच वाढले आहे. आता तर इमारतीच्या कुंपणापलिकडे असलेल्या उंच फुटपाथवरूनही तिची फुले सहज काढता येतात. सहसा मी कळी उमलण्याच्या आदल्या रात्रीच ती काढून घेत असल्याने लोकांचे या झाडाकडे फारसे लक्ष गेले नव्हते. पण समोरच्या इमारतीतली एक मुलगी पहाटेच्या वेळी येऊन या झाडावरच्या कच्च्या कळ्याही तोडायला लागली, त्यामुळे हल्ली पहाटेच्या वेळी या झाडाकडे नीट लक्ष ठेवण्याचे एक काम मात्र वाढले आहे.  


     असो. या कमी उन्हातही छान वाढणार्‍या गुलाबी जास्वंदीचा परिचय करून देण्यासाठी हा लेख मुद्दाम लिहित आहे. ह्या जास्वंदीचे शास्त्रीय नाव Hibiscus rosa-sinensis cultivar Albo Lacinatus असे असून, ही जास्वंद weeping Hibiscus / pink butterfly Hibiscus या नावानेही ओळखली जाते. पांढरी जास्वंद (Hibiscus arnottianus subsp. immaculatus) आणि कातरलेल्या पाकळ्यांची लाल जास्वंद (Hibiscus schizopetalus) या दोन जास्वंदींच्या संकरातून ही संकरीत गुलाबी जास्वंद तयार केली गेली आहे. 

     ही गुलाबी जास्वंद सदाबहार (वर्षभर फुलणारी) असून भरपूर ऊन्हात वाढतेच, पण सावलीयुक्त प्रकाशातही वाढते. ही जास्वंद कुंडीत लावता येते आणि ही १५ ते २० फुटांपर्यंत उंच वाढते. ह्या जास्वंदीला नियमितपणे कुंडीतील माती ओली राहील इतपत पाणी घातलेले पुरते. त्यापेक्षा जास्त पाणी घालू नये. ही जास्वंद भराभर वाढते आणि कठीण परिस्थितीतही तग धरून राहते. माझ्याकडच्या जास्वंदीवर मिलीबग पडले होते, पण मिलीबगने व्याप्त झालेला भाग नियमितपणे काढून टाकल्यानंतरही झाडाने चांगला तग धरला. ह्याच गुणधर्मामुळे ह्या झाडावर दुसर्‍या जास्वंदीच्या प्रकारांचे कलम केले जाते. त्यामुळे कमी प्रकाशातही फुलणारी झाडे लावायची असतील, तर त्यासाठी ही सदाबहार गुलाबी जास्वंद हा एक चांगला पर्याय आहे.

Saturday, June 16, 2012

पाण्याच्या थेंबांचे फोटो / Photos of water droplets


पाण्याच्या थेंबांचे फोटो इथे पोस्ट करत आहे. मूळ फोटो क्रॉप करून इथे पोस्ट केले आहेत.

Posting photos of water droplets here. Original photos are cropped & posted here.






Friday, April 13, 2012

Black Grapes with Coconut Bars



Ingredients -
Grated Fresh Coconut - 4 Bowls (bowl of size 150 ml.)
Juice of Black Grapes with it's skin - 2 Bowls
Milk Powder - 2 Bowls
Sugar - 3 Bowls
Powdered Sugar - 2 Tablespoon (make using mixer)
Ghee / Butter - for greasing steel plate / tray
For Garnishing - Almonds -  5-6 Almonds scraped or sliced

Method - 
1. Slightly grind the shreads of fresh coconut in mixer or grind the small pieces of fresh coconut in mixer.
2. Wash the black grapes and put it in the mixer without removing thier skin. Make 2 bowls of juice of grapes in the mixer. 
3. In a cooking pan add grated fresh coconut, juice of black grapes, milk powder, sugar and heat it on a medium flame. Stir this mixture with a long handled spoon. At start this indigo coloured juicy mixture becomes watery and starts boiling and when it becomes thick it's colour changes to reddish violet colour.
4. When this mixture becomes slightly thick and started to separate from the pan, that time add the powdered sugar in it and stir it, so that the mixture will become thick in short time.
5. When the mixture becomes more thick, that time smear the ghee / butter on the steel plate / tray.
6. When the mixture becomes sufficiently thick, switch off the flame, pour the mixture in the tray and spread it evenly.
7. Put Almond scrapes or slices on this mixture and with ghee / butter smeared hand press it slightly.
8. After 25 - 30 minutes when the mixture starts to cool down, mark it with knife for making pieces.
9. Separate and remove the pieces as bars only after the mixture completely cools down.
10. From inside these bars are having slight stickiness as that of black raisins, so keep these bars in a container, cover it with lid and keep that container in refrigerator for 3 - 4 hours. The bars will be ready for eating only when it will come at normal temperature after removing from refrigerator.

Note - Do not always keep these bars in refrigerator. Cold bars just removed from refrigerator are somewhat hardy for eating. The taste of these bars increases when it is eaten at it's normal temperature stage. 
Related Posts Plugin for WordPress, Blogger...